Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामगिरी सुधारा नाहीतर…; केंद्र सरकारचा BHEL आणि SAIL ला कडक अल्टीमेटम! काय नेमकं प्रकरण?

सरकारी मालकीच्या दोन प्रमुख आणि महत्त्वाच्या कंपन्या BHEL Bharat Heavy Electricals Ltd आणि SAIL Steel Authority of India Ltd यांना सरकारकडून थेट अल्टीमेटम देण्यात आला आहे. या कंपन्यांचा 'महारत्न' दर्जा धोक्यात असल्याचंही बोललं जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 06, 2026 | 02:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

BHEL and SAIL Maharatna Tag: सरकारी मालकीच्या दोन प्रमुख आणि महत्त्वाच्या कंपन्या BHEL Bharat Heavy Electricals Ltd आणि SAIL Steel Authority of India Ltd यांना सरकारकडून थेट अल्टीमेटम देण्यात आला आहे. या कंपन्यांचा ‘महारत्न’ दर्जा धोक्यात असल्याचंही बोललं जात आहे. केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना एक वर्षाची नोटीस बजावली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? समजून घेऊयात.

DA Hike : महागाई भत्त्यात 2% वाढ जाहीर; जुलै महिन्यापासून ‘या’ कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार मोठी रक्कम

नेमकी कुठे होतेय चूक?

कॅबिनेट सचिव डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका आढावा बैठकीत असे दिसून आले की, दोन्ही कंपन्या ‘महारत्न’ दर्जासाठी असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या आर्थिक निकषाची पूर्तता करण्यात अपयशी ठरत आहेत.
‘महारत्न’ दर्जा टिकवून ठेवण्यासाठी, एखाद्या कंपनीचा मागील तीन वर्षांतील सरासरी वार्षिक निव्वळ नफा म्हणजेच करपश्चात नफा – PAT हा ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. याउलट, देशातील १४ महारत्न कंपन्यांपैकी केवळ BHEL आणि SAIL या कंपन्या नफ्याचे हे तीन वर्षांचे उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरत आहेत.

‘महारत्न’ दर्जा काढून घेतल्यास काय होईल?

जर या कंपन्यांनी एका वर्षाच्या आत सरासरी वार्षिक निव्वळ नफा म्हणजेच आपली नफाक्षमता सुधारली नाही, तर त्यांना ‘नवरत्न’ श्रेणीतून काढून टाकलं जाईल. यामुळे त्यांच्या बोर्डची वित्तीय स्वायत्ता मर्यादा कमी होईल.
सध्या, ‘महारत्न’ कंपन्या म्हणून या दोन्ही कंपन्या सरकारची मंजुरी न घेता ५,००० कोटी रुपयांपर्यंतचे गुंतवणूक किंवा व्यवसायाशी संबंधित निर्णय घेऊ शकतात. ‘नवरत्न’ दर्जा मिळाल्यास त्यांची ही गुंतवणूक मर्यादा कमी होऊन केवळ १,००० कोटी रुपयांवर येईल, ज्याचा परिणाम त्यांच्या मोठ्या प्रकल्पांवर होण्याची शक्यता आहे.

सरकारची नेमकी यावर भूमिका काय?

एखाद्या सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला आपला ‘महारत्न’ दर्जा काढून घेण्याबाबतचा इतका कठोर इशारा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन कंपन्यांची कामगिरी सुधारण्यासाठी विस्तृत रिवाइवल प्लान पेश करण्यास जड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालयाला सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नियमांची अंमलबजावणीही अधिक कडक केली आहे; आता सीएसआर निधीशी संबंधित त्रुटी आणि एमएसएमई विक्रेत्यांना वेळेवर देयके न देणे यांसारख्या बाबींसाठी या कंपन्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शेअर बाजारात धाकधूक? गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

Web Title: Government ultimatum to bhel and sail maharatna status in danger marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
1

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
2

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
4

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.