Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खरेदी क्षमतेपेक्षा ‘एक्सेस’ला जास्त महत्त्व! भारतातील 13 हजार कोटींच्या लाईव्ह इव्हेंट मार्केटवर Kotak Mahindra Bankचा खुलासा

भारतात जशी खरेदी क्षमता वाढत आहे, तशी श्रीमंत ग्राहकांसाठी 'विशेषाधिकाराची' व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. आता केवळ प्रीमियम क्रेडिट कार्ड, विमानतळ लाउंज प्रवेश किंवा गोल्फ क्लबचे सदस्यत्व असणे पुरेसे राहिलेले नाही, तर दुर्मिळ कॉन्सर्ट्स, लाईव्ह शोज आणि खास डिनर इव्हेंट्समध्ये 'खात्रीशीर जागा' मिळवणे हा नवीन विशेषाधिकार बनला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 05:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • खरेदी क्षमतेपेक्षा ‘एक्सेस’ला जास्त महत्त्व!
  • Kotak Mahindra Bankचा खुलासा
  • भारतातील 13 हजार कोटींच्या लाईव्ह इव्हेंट मार्केट
Kotak Mahindra Bank: भारतात जशी खरेदी क्षमता वाढत आहे, तशी श्रीमंत ग्राहकांसाठी ‘विशेषाधिकाराची’ व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. आता केवळ प्रीमियम क्रेडिट कार्ड, विमानतळ लाउंज प्रवेश किंवा गोल्फ क्लबचे सदस्यत्व असणे पुरेसे राहिलेले नाही, तर दुर्मिळ कॉन्सर्ट्स, लाईव्ह शोज आणि खास डिनर इव्हेंट्समध्ये ‘खात्रीशीर जागा’ मिळवणे हा नवीन विशेषाधिकार बनला आहे.

Rules Change: सर्वसामान्यांना दणका? 1ऑगस्टपासून बदलणार हे नियम! LPG सिलिंडरपासून बँकिंगपर्यंत थेट खिशावर होणार परिणाम

प्रीमियम क्रेडिट कार्ड्स गोल्फ खेळाची संधी

कॉन्सर्ट्स, डायनिंग अनुभव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मागणी त्यांच्या उपलब्धतेपेक्षा वेगाने वाढत आहे, ज्यामुळे यांमध्ये सहभागाची खात्री असणे अधिकाधिक मोलाचे ठरत आहे, असे कोटक महिंद्रा बँकेने सांगितले. अनेक वर्षांपासून, भारतातील प्रीमियम क्रेडिट कार्ड्स गोल्फ खेळाची संधी, कॉन्सिअर्ज सेवा, रिवॉर्ड पॉइंट्स आणि विमानतळावरील लाउंज प्रवेश यांसारख्या फायद्यांद्वारे श्रीमंत वर्गाचा विशेषाधिकार दर्शवत होते. हे घटक अशा वेळी महत्त्वाचे होते जेव्हा श्रीमंती मर्यादित होती. कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, विशेषाधिकाराची ही व्याख्या आता बदलत आहे. मनोरंजन, डायनिंग आणि सांस्कृतिक अनुभवांच्या बाबतीत श्रीमंत ग्राहक वाढत्या प्रमाणात सर्वोत्तम क्षणांकडे आकर्षित होत आहेत, जे दुर्मिळ, स्मरणीय आणि पुन्हा अनुभवण्यास कठीण आहेत. अनेक वर्षांनंतर सादरीकरण करणारा एखादा आवडता कलाकार, कॉन्सर्टमधील समोरच्या रांगेतील जागा किंवा विशिष्ट कालावधीसाठी उपलब्ध असलेला खास मेजवानीचा मेनू यांना पैशांच्या व्यवहारापलीकडचे मोल असते.

लाइव्ह-इव्हेंटची बाजारपेठ जवळपास १३,००० कोटी रुपयांची

अनुभव हीच आजही मुख्य महत्त्वाकांक्षा आहे; बदलली आहे त्याभोवती असणारी स्पर्धा. अनुभवांना वाढते महत्त्व दिले जात आहे, कारण बहुतांश उत्पादनांपेक्षा वेगळे म्हणजे, हे अनुभव एका विशिष्ट वेळेत आणि क्षणाशी बांधलेले असतात. एखादे उत्पादन नंतरही खरेदी केले जाऊ शकते, पण एखादी कॉन्सर्ट, शेफच्या नेतृत्वाखालील खास भोजनाचा कार्यक्रम किंवा एखादे सांस्कृतिक सादरीकरण नंतर मिळू शकत नाही, असे बँकेने नमूद केले आहे. त्यांचे आकर्षण केवळ त्यांच्या दुर्मिळतेमध्येच नाही, तर इव्हेण्‍ट संपल्यानंतरही दीर्घकाळ टिकणाऱ्या आठवणी, चर्चा आणि कथांमध्ये असते. अहवालांनुसार, २०२५ पर्यंत भारतातील लाइव्ह-इव्हेंटची बाजारपेठ जवळपास १३,००० कोटी रुपयांची झाली होती, आणि ग्राहक अभ्यास अजूनही दर्शवतात की, उत्पादनांपेक्षा अनुभवांवर खर्च करण्याला ग्राहकांची भरपूर पसंती आहे. अधिकाधिक ग्राहक अशाच प्रकारच्या अनुभवांचा शोध घेतात, तसतसे ही मागणी मर्यादित संख्येने उपलब्ध असलेल्या इव्हेण्‍ट्सवर, जागांवर आणि क्षणांवर येऊन केंद्रित होते.

जेव्हा खरेदी क्षमता अडचण राहत नाही

कोटक महिंद्रा बँकेने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कलाकार आणि प्रीमियम लाइव्ह इव्हेण्‍ट्सशी जोडले जाण्यास सुरुवात केली, तेव्हा भारतातील आंतरराष्ट्रीय कलाकारांचे सादरीकरण बऱ्यापैकी कमी प्रमाणात होत असे. तेव्हापासून, भारतात जागतिक दर्जाच्या कलाकारांचे पुनरागमन मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे, काही केसेसमध्ये तर कित्येक दशकांनंतर हे घडून आले आहे. अशा इव्हेंट्सचा तक्ता वाढत गेला, तसतसा एक स्पष्ट ट्रेंड समोर आला: सर्वात जास्त मागणी असलेल्या तिकिटांच्या श्रेणी नियमितपणे सर्वात आधी विकल्या गेल्या.

दहा शहरांमध्ये जवळपास एक लाख प्रेक्षकांना आकर्षित

ऋषभ ऋखिराम शर्मा यांच्या अलीकडील दौऱ्यादरम्यान कोटकने याचे निरीक्षण केले, जिथे मुंबई आणि दिल्लीतील शोची पूर्व-विक्री २४ तासांच्या आत पूर्ण झाली. या दौऱ्याने दहा शहरांमध्ये जवळपास एक लाख प्रेक्षकांना आकर्षित केले. मागणी उपलब्धतेपेक्षा जास्त होत आहे, तसतसा सहभाग अधिकाधिक मौल्यवान बनत चालला आहे. अनेक केसेसमध्ये, आता उपलब्ध जागांपेक्षा अनुभव परवडू शकणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक आहे.

पारंपारिक घटक अजूनही मौल्यवान

श्रीमंत ग्राहकांशी असलेल्या आपल्या संवादातून कोटक महिंद्रा बँकेला हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. जे अनुभव पूर्वी कधीतरी घेतले जाणारे आनंद मानले जात होते, त्यांचे नियोजन आता खूप आधीपासून केले जाते, विशेषतः जेव्हा उपलब्धता मर्यादित असते. बँकेने म्हटले आहे की, यामुळे लाउंज प्रवेश, कॉन्सिअर्ज सेवा आणि गोल्फ खेळाचे विशेषाधिकार यांसारखे पारंपारिक घटक अजूनही मौल्यवान असले, तरी ते आता पूर्वीसारखा विशेष दर्जा दर्शवत नाहीत हे स्पष्ट होते. त्यांची व्यापक उपलब्धता यामुळे एका ग्राहकाला दुसऱ्या ग्राहकापासून वेगळे ओळखण्याची त्यांची क्षमता कमी झाली आहे.

श्रीमंत ग्राहक आपला विशेषाधिकार कसा व्यक्त करत?

कोटक सॉलिटेअरच्या ग्राहकांसाठी, म्हणजेच बँकेच्या समृद्ध विभागातील केवळ निमंत्रणाद्वारे प्रवेश मिळणाऱ्या एका खास वर्गासाठी हा ट्रेंड विशेष प्रकर्षाने दिसून येत आहे. बँक आपल्या क्रेडिट-कार्ड पोर्टफोलिओमध्ये पूर्व-विक्री सुविधा उपलब्ध करून देते, ज्यामुळे ग्राहकांना सार्वजनिक विक्री सुरू होण्यापूर्वी तिकिटे मिळवणे शक्य होते. मागणीमुळे तिकिटांच्या वाटपावरही परिणाम झाला आहे. पूर्व-विक्री साधारणपणे एकूण तिकिटांच्या २० ते ३० टक्‍के असते, तिथे अलीकडील काही विशिष्ट इव्हेण्‍ट्ससाठी हे वाटप ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
कोटकने म्हटले आहे की, श्रीमंत ग्राहक सहभागाच्या खात्रीला अधिकाधिक महत्त्व देत आहेत. एखादी जागा निश्चित करणे हा आता त्या अनुभवाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे.”श्रीमंत ग्राहक अशा अनुभवांमध्ये सहभागी होण्याला अधिक महत्त्व देत आहेत, जे वेगळे, स्मरणीय आणि पुन्हा मिळवण्यास कठीण वाटतात,” असे कोटक महिंद्रा बँकेच्या अॅफ्लुएंट अँड सॅलरीड प्रपोझिशनच्या प्रमुख ज्योती समाजपती म्हणाल्या. “या क्षणांबाबत मागणी वाढत आहे, तसतसे सहभागाची खात्री अधिकाधिक मौल्यवान बनत चालली आहे. ग्राहकांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनुभवांचा भाग बनू शकू हा आत्मविश्वास पाहिजे, आणि तो अनुभव मिळवून देण्यात प्रवेश, वेळ व सुलभता महत्त्वाची भूमिका बजावतात.”

Monsoon Small Business: पावसाळ्यात कमी खर्चात सुरू करा ‘हे’ 5 व्यवसाय; होईल तुफान कमाई! जाणून घ्या सविस्तर

Web Title: Guaranteed access to premium experiences is new privilege kotak mahindra bank report marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Business News
  • Cultural Event
  • Kotak
  • Kotak Bank
  • Kotak Mahindra Bank
  • Marathi News
  • trends

संबंधित बातम्या

Satara Voter List Row: सातारा जिल्ह्यात ५६ हजार दुबार मतदार! काँग्रेसचा प्रशासनावर गंभीर आरोप, पुरावे सादर
1

Satara Voter List Row: सातारा जिल्ह्यात ५६ हजार दुबार मतदार! काँग्रेसचा प्रशासनावर गंभीर आरोप, पुरावे सादर

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! युरियाची टंचाई आता कायमची संपणार! ‘या’ नवीन खताला मिळाली मंजुरी
2

Agriculture News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! युरियाची टंचाई आता कायमची संपणार! ‘या’ नवीन खताला मिळाली मंजुरी

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव
3

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप
4

Chandrapur News: चिखलमय रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; दमपूर-मोहद्यात ग्रामस्थांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.