Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold & Copper Production: बाप रे… भारताच्या जमिनीतून तब्बल इतकं सोनं आणि तांबं निघतं! ५ वर्षांचा रिपोर्ट पाहून थक्क व्हाल

भारताकडे प्रत्यक्षात सोन्याचा साठा किती आहे? आणि ज्या 'तांब्या'ला म्हणजेच Copper ला पंतप्रधानांनी 'भविष्याचे सोने' म्हणून गौरवलेले आहे, त्या तांब्याची सध्याची स्थिती नेमकी काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात...

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 11, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मोदींकडून जनतेला वस्तू वापराबाबत संयम बाळगण्याचं आवाहन
  • सोन्यासंदर्भात मोदींनी काय केलं मार्गदर्शन?
  • २८ सोन्याच्या आणि ११ तांब्याच्या खाणपट्ट्यांचे वाटप
Gold & Copper Production:  भारतच नाही तर संपूर्ण जग सध्या जागतिक स्तरावर सुरु असलेल्या युद्धाचा सामना करत आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची टंचाई पाहायला मिळत आहे. याचा परिणाम महागाईचा भडका, आणि वस्तूंचा तुटवडा यांच्या स्वरुपात होताना दिसत आहे. आखाती संकटामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वस्तूंच्या वापराबाबत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनादरम्यान, त्यांनी लोकांना पुढील वर्षभर सोन्याची खरेदी करणे टाळण्याचीही विनंती केली; कारण अशा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर्समध्ये पैसे मोजावे लागतात आणि याचा परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावर होत असतो. यामुळे साहजिकच हा प्रश्न उपस्थित होतो की भारताकडे प्रत्यक्षात सोन्याचा साठा किती आहे? आणि ज्या ‘तांब्या’ला म्हणजेच Copper ला पंतप्रधानांनी ‘भविष्याचे सोने’ म्हणून गौरवलेले आहे, त्या तांब्याची सध्याची स्थिती नेमकी काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात…

Share Market Today: घसरणीसह उघडणार सेन्सेक्स-निफ्टी? तज्ज्ञांनी दिला ‘या’ शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

सोन्यासंदर्भात मोदींनी काय केलं मार्गदर्शन?

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्यांनी सोन्याच्या संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, भारत हा या मौल्यवान धातूचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. सोन्याच्या खरेदीसाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावे लागते. परिणामी, आपण सोन्याची खरेदी एक वर्षाच्या कालावधीसाठी पुढे ढकलावी असं आवाहन त्यांनी केलं. असं केलं तरच आपण अब्जावधी डॉलर्सच्या परकीय चलनाची बचत करू शकू. त्याचप्रमाणे, त्यांनी तांब्याबाबत बोलताना महत्त्वाची गोष्ट नमून केली की तांब्याला भविष्याचे सोनं असं संबोधण्यात आलं. त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की, या डिजिटल युगात इलेक्ट्रिक वाहने आणि सौर पॅनेलसाठी तांबे हे एक अत्यावश्यक घटक बनले आहे. म्हणूनच, देशांतर्गत खाणकामावर भर दिला पाहिजे आणि परदेशातून तांब्याची आयात करण्यापेक्षा देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य दिले पाहिजे. तरचा या महत्त्वाच्या घडीला भारत टिकून राहू शकतो आणि या घडीचा सामना करु शकतो.

भारतात सोनं आणि तांब्याचं उत्पादन

वर्ष गोल्ड/किलोग्राम कॉपर/टन
2020-21 1127 108718
2021-22 1407 115313
2022-23 1433 112745
2023-24 1586 125230
2024-25  1627 105012

दरम्यान, २०२३-२४ या वर्षात सोन्याचे उत्पादन १,५०० किलोग्रॅमचा टप्पा ओलांडून पुढे गेले होतं. त्या वर्षात सोन्याचे उत्पादन १,५८६ किलोग्रॅम इतके नोंदवण्यात आलं होतं. २०२४-२५ मध्ये, सोन्याचे उत्पादन वाढून १,६२७ किलोग्रॅमवर ​​पोहोचलं होतं.

२८ सोन्याच्या आणि ११ तांब्याच्या खाणपट्ट्यांचे वाटप

केंद्र सरकारने नमूद केले की, सोने आणि तांबे यांसह विविध खनिजांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये Exploration Licence regime चा समावेश केला गेला आहे. ही प्रणाली महत्त्वपूर्ण आणि भूगर्भात खोलवर असलेल्या क्षेत्रांमध्ये खनिजांचे प्राथमिक सर्वेक्षण आणि शोधकार्य करण्यास परवानगी देते. हे कार्य ‘अधिसूचित खाजगी अन्वेषण संस्थां’द्वारे म्हणजेच NPEAs संस्थेद्वारे पार पाडले जाते आणि त्यासाठी लागणारा निधी ‘राष्ट्रीय खनिज अन्वेषण आणि विकास न्यासा’द्वारे पुरवला जातो.
सरकारने पुढे असेही नमूद केलंय की, २०१५ पासून आतापर्यंत तांब्याच्या ११ आणि सोन्याच्या २८ खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात आला आहे.

तांब्याच्या उत्पादनामधील चढ-उतार

तांब्याच्या उत्पादनाचा विचार करता, तांब्याच्या खनिजाच्या उत्खनन कार्याची उत्पादकता आणि सुरक्षा या दोन्ही बाबी वाढवण्यासाठी अत्याधुनिक ‘पेस्ट फिल’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. २०२०-२१ या वर्षात तांब्याचे उत्पादन १,०८,७१८ टन इतकं होतं, तर २०२१-२२ मध्ये ते वाढून १,१५,३१३ टन इतकं झालं आहे. २०२२-२३ मध्ये उत्पादन १,१२,७४५ टनांपर्यंत आणि २०२३-२४ मध्ये १,२५,२३० टनांपर्यंत पोहोचले. पण २०२४-२५ या वर्षात उत्पादनात घट झाली असून, केवळ १,०५,०१२ टन तांब्याचे उत्पादन झाले.
खाण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली ‘हिंदुस्तान कॉपर लिमिटेड’ ही संस्था तांब्याच्या उत्खनन कार्यात सक्रियपणे सहभागी आहे आणि तांब्याच्या खनिजाचे उत्पादन वाढवण्यासाठी तिने विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. असे असले तरी, HCL च्या निर्गुंतवणुकीबाबतचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किरकोळ घसरण, चांदीच्या किंमतीतही झाला बदल! किती आहे 22 कॅरेटचा भाव?

Web Title: How much gold and copper production in india pm narendra modi appeal not purchase sona middle east crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Business News
  • Gold
  • Marathi News
  • narendra modi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
1

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
2

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
3

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
4

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.