
India's step towards energy revolution
IEA Global Outlook 2025 : भारत देश ऊर्जा क्षेत्रात प्रगती करत आहे. विकासाच्या दिशेने भारत पाऊल टाकताना दिसत आहे. यातच नुकताच, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी अर्थात IEA ने एक अहवाल सादर केला. ज्यात चीन, अमेरिकेला मागे टाकत भारत 2035 पर्यंत अव्वलस्थानी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताची अत्यंत आवश्यक उत्पादनासंबंधीत आयात देखील वाढत आहे.
IEA) च्या अहवालानुसार, येत्या दशकात भारत जगात तेलाची मागणी वाढवण्यात आघाडीवर असू शकतो. IEA च्या ग्लोबल एनर्जी आउटलुक 2025 यांच्या नवीन रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थासह औद्योगिकीकरण आणि रस्त्यावरील वाढत्या गाड्या इंधन उर्जेचा जास्त वापर करतात. यामुळे भारतात ऊर्जेची मागणी 2035 पर्यंत दरवर्षी सरासरी 3 टक्क्यांनी वाढू शकते. अशी माहिती IEA ने दिली आहे. विकसनशील देशांपेक्षा ही वाढ जास्त असून यामुळे जगात तेलाच्या वापरात 2035 पर्यंत झालेल्या वाढीत सगळ्यात मोठा वाटा भारताचा असेल. अगदीच, चीन आणि आशियाचा काही भाग मिळून होणाऱ्या वाढीपेक्षाही अधिक असेल. गेल्या काही दशकात चीनमुळे तेलाच्या मागणीत 75% पेक्षा जास्त वाढ झाली होती. आता, भारत प्रगती पथकावर असून हा देश नवे तेलाच्या मागणीत वाढ होण्याचे केंद्र बनू शकते.
हेही वाचा : Russian Oil Trade India Update: ट्रम्पच्या निर्बंधांमुळे भारताचा मोठा निर्णय! रशियाकडून भारताने…
भारत बनेल जागतिक तेल मागणीचा ‘अव्वल’
2024 मध्ये भारतात 5.5 दशलक्ष बॅरल तेल वापरले जाते. मात्र, 2035 पर्यंत याचा वापर 8 दशलक्ष बॅरल पर्यंत पोहचू शकतो. भारतीय जास्त गाड्या खरेदी करत आहेत, तसेच अनेक कारखान्यांची मागणी वाढत आहे. याच बरोबर विमानांसाठी इंधन व स्वयंपाकासाठी एलपीजी याचा सुद्धा वापर वाढला आहे. जगात तेलाच्या मागणीत 2035 पर्यंत जी अतिरिक्त मागणी असेल यात भारताचा जवळपास अर्धा वाटा असेल.
देशांतर्गत सरकार तेल उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. तरीही IEA चा असा अंदाज आहे की, भारत 2024 मध्ये 87% तेल मागवले आहे. जो 2035 पर्यंत 92% पर्यंत वाढू शकतो. भारताची रिफायनिंग क्षमता वाढत असून 2024 मध्ये 6 दशलक्ष बॅरल होती, जी आता 2035 पर्यंत 7.5 दशलक्ष बॅरल होऊ शकते. त्यामुळे वाहतूक इंधनाचा भारत मोठा निर्यातदार बनेल. तसेच, 2035 पर्यंत नैसर्गिक वायूची मागणी तब्बल अब्ज घनमीटर 140 अर्थात दुप्पट होऊ शकते.
सध्या जगात कोळशाचा वापर कमी असेल तरी भारतात त्याला मागणी आहे. 2035 पर्यंत भारतात 50 दशलक्ष टन कोळशाची मागणी वाढू शकते. IEA नुसार देशांतर्गत कोळशाची मागणी अधिक असून आयात मर्यादित ठेवता येईल. कोल इंडिया लिमिटेड गेवरा खाणीचा अजून विस्तार करून त्याची वार्षिक क्षमता 70 दशलक्ष टन करण्यावर भर देणार आहे. त्यामुळे आशियातील कोल इंडिया लिमिटेड सर्वात मोठी कोळशाची खाण म्हणून नावारुपला येईल. 36 नवीन कोळशाच्या खाणीही पुढील पाच वर्षांत उघडल्या जातील.