donald trump on Russian oil (photo - social media)
America On Russian Oil : अमेरिका रशियन तेलावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी करत आहे. रशियाच्या सुप्रसिद्ध तेल कंपन्यांना लक्ष्य केले जाणार असून २१ नोव्हेंबरपासून रोसनेफ्ट आणि लुकोईलवर अमेरिकेची नजर असेल. याच पार्श्वभूमीवर, भारतातील तेल कंपन्यांनी रशियन तेल खरेदीत वाढ केली आहे. रशियन पुरवठ्यावर निर्बंध घातले तर तेलाचा पुरवठा कायम राहण्यासाठी अमेरिका इराक आणि सौदी अरेबिया या देशातून तेल खरेदी करत आहेत.
अमेरिका रशियन तेलावर निर्बंध लावणार असल्याने भारताची गोची होऊ शकते. त्यासाठी भारताकडून तेल शुद्धीकरण कंपन्यांना सुरू ठेवण्यासाठी रशियन तेलाच्या खरेदीत वाढ केली आहे. या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी अजूनही मोदी सरकारकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नाहीये. नेमका सरकारचा काय प्लॅन आहे ते अजूनही गुलदस्त्यात आहे.
भारताने गेल्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल १६.२ लाख बॅरल रशियन खनिज तेलांची खरेदी केली आहे. अगदी सप्टेंबर इतकाच हा आकडा असला तरी अमेरिकेच्या निर्णयामुळे सुद्धा यात वाढ करण्यात येऊ शकते. नोव्हेंबरच्या अखेरीस अमेरिका रशियन तेलावर निर्बंध लावू शकते. त्यामुळे तेल शुद्धीकरण कंपन्या कच्च तेल सुरक्षित आणि घाईने मागवून घेतलं आहे. त्यामुळे आयातीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Gopichand Hinduja : हिंदुजा ग्रुपचे सर्वेसर्वा जीपी हिंदुजाची संपत्ती किती? काय आहे इतिहास..
सरकारी आणि खासगी ऑइल कंपन्या अर्थात भारत पेट्रोलियम, नायरा एनर्जी व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या तेल पुरवठा कायम ठेवण्यासाठी रशियातून आधीच जास्तीचं तेल मागवत आहेत. ऑफिस ऑफ फॉरेन एसेट्स कंट्रोल या अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाकडून रशियन तेलावर निर्बंध लागू करण्यात आले असून युक्रेनसोबत युद्ध करत असलेल्या रशियाला आर्थिक धक्का बसावा म्हणून हे निर्बंध लादण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्बंधात मुख्य:त रशियन तेलाची निर्यात करत असलेल्या कंपन्याना सहभागी करण्यात आले असून त्यांच्या आर्थिक धोरणाला सुद्धा लक्ष्य केले आहे.
भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती पुरवली आहे. भारत सरकार ऊर्जा सुरक्षा व ग्राहकांच्या हिताला प्रथम प्राधान्य देत असून आमची ही भूमिका कायम असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्या तेल शुद्धीकरण यांना चालना देण्यासाठी काम करत आहेत. खनिज तेल मिळवण्यासाठी तेल शुद्धीकरण कंपन्यांना सरकारने व्यवहार्य स्रोतांकडून तेल विकत घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जर नोव्हेंबरमध्ये रशियन तेलावर निर्बंध लावले तर रशियन तेलात घट होईल. ज्याने पश्चिम आफ्रिका, सौदी अरेबिया, लॅटिन अमेरिकासह इराक, यूएई या देशांतून तेल आयात मोठ्या प्रमाणात वाढेल. भारताने अमेरिकेकडून मागच्या महिन्यात तब्बल तिप्पट खनिज तेलाची आयात केली होती ज्याने अमेरिकेचा आकडा ५,६८,००० बीपीडीवर गेला होता.
हेही वाचा : ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ! Experian कडून ‘ग्रामीण स्कोअर’चे अनावरण; कर्ज उपलब्धता होणार झटपट






