शक्तिपीठ महामार्ग शासनाने ताबडतोब रद्द केला पाहिजे त्याचबरोबर परभणी मध्ये पोलिसांकडून केल्या गेलेल्या मुस्कटदाबीचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली जिल्ह्यातील एकोणीस शक्तिपीठ बाधित गावातील शेतकऱ्यांनी पुढच्या काढून सरकारला जाब विचारला. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपूर्वी या शक्तिपीठ महामार्गाचे काम रद्द व्हावे यासंदर्भात रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली, परंतु मुख्यमंत्र्यांनी अजूनही याची दखल घेतली नाही. शासन हा निर्णय ताबडतोब मागे घेत नसेल तर पुढील काळात आमच्या मुलाबाळांना या शासनकर्त्यांच्या महालाबाहेर बसवू, परभणी मध्ये महिला शेतकऱ्यांना फरफटत नेणं ही खूप खालच्या पद्धतीची आणि लाजिरवानी गोष्ट आहे. अशा तीव्र प्रतिक्रिया सहभागी महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत.