Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

India Defence Export : अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांच्या तुलनेत शस्त्रास्त्र बाजारात भारत अजूनही खूप मागे आहे. जागतिक शस्त्रास्त्र बाजारातील पाकिस्तानची काही क्षेत्रांतील कामगिरी आणि भारतासमोरील आव्हाने यांवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 05, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानपेक्षाही मागे भारत
  • कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
  • का आहे पाकिस्तान भारताच्या पुढे?
India Defence Export : वाढत्या राजकीय तणावामुळे जागतिक स्तरावर संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ग्लोबल डिफेंस एक्सपोर्ट मार्केटचं वार्षिक मुल्य 138 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. सध्याची परिस्थिता पाहता येत्या काही वर्षांत या आकड्यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. सुरु असलेल्या क्षेत्रीय संघर्ष, सीमा वाद आणि बदलती पाव्हर डायनामिक्समुळे अनेक देश त्यांचं डिफेंस बजेट वाढवत आहेत. ( India Defence Export )

Sugar Price Mystery : दर कोसळले, 67 ची साखर 50 वर… तरीही सर्वसामान्यांना महागच खरेदी का करावी लागतेय? हा आहे बाजारातील खरा खेळ

स्वीडिश थिंक टँक सिप्री (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) च्या एका ताज्या अहवालानुसार, जागतिक संरक्षण निर्यातीच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या मागे आहे. ०.२% हिस्सेदारी घेऊन भारत २७ व्या क्रमांकावर आहे, तर ०.४% हिस्सेदारीमुळे पाकिस्तान २१ व्या क्रमांकावर आहे. हा आकडा आश्चर्यकारक वाटू शकतो, पण हे आकडे आणि परिस्थिती खरी आहे.

का आहे पाकिस्तान भारताच्या पुढे?

या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय समीकरण महत्त्वाची भूमिका बजावतात. संरक्षण निर्यातीत भारतावर पाकिस्तानच्या आघाडीमागे चीन हे सर्वात मोठे कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे, पाकिस्तान स्वतः कोणतीही शस्त्रे बनवत नाही; त्याऐवजी, ते चीनसोबत मिळून जेएफ-१७ थंडर लढाऊ विमानांची जुळणी करते. ही विमाने नंतर म्यानमार, नायजेरिया आणि अझरबैजानसारख्या देशांना विकली जातात. ही आकडेवारी पाकिस्तानच्या संरक्षण निर्यात खात्यात जोडली जाते. त्याचप्रमाणे, आफ्रिका आणि अनेक कमकुवत अर्थव्यवस्था असलेले देश कमी किमतीच्या चिनी शस्त्रांना प्राधान्य देतात आणि पाकिस्तानकडून शस्त्रे आयात करतात, ज्यामुळे त्यांच्या निर्यातीचे प्रमाण वाढलं आहे.

भारताचं लक्ष्य काय?

दुसरीकडे, भारताचे लक्ष निर्यातीवर नसून आपले सैन्य मजबूत करण्याकडे नेहमीच राहिले आहे. यामुळेच भारत अनेक दशकांपासून जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश राहिला आहे. पण अशातच आता अशातच या बाजारपेठेत आपला वाटा वाढवण्यासाठी भारताला एक मोठी संधी आहे. सरकार डिफेंस सेक्टरमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचे (FDI) नियम शिथिल करण्याचाही विचार करत आहे.

महाशक्ति बनण्याच्या वाटेवर भारत

ही परिस्थिती असली जागतिक संरक्षण निर्यातीत भारताचा वाटा सध्या ०.२% असला तरी, यावर्षी भारताने ३८,४२४ कोटी रुपये म्हणजे ४.६ अब्ज डॉलर्स इतकी आतापर्यंतची सर्वाधिक संरक्षण निर्यात नोंदवली आहे. भारत ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, आकाश हवाई संरक्षण प्रणाली आणि तोफांच्या माध्यमातून आपली संरक्षण निर्यात वेगाने वाढवत आहे. २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट सरकारचे समोर ठेवलं आहे.

अनेक आफ्रिकन देशांमध्ये मोठी मागणी

सध्या, जगभरातील ८० हून अधिक देश भारताकडून संरक्षण उपकरणे खरेदी करत आहेत. फिलीपिन्सने अलीकडेच भारतासोबत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रासाठी ३७५ दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. इंडोनेशियासोबत ३,८०० कोटी रुपये म्हणजेच ४४० दशलक्ष डॉलर्स किमतीचा एक मोठा करारही सध्या प्रगत टप्प्यात पोहोचला आहे. भारताच्या आकाश हवाई संरक्षण प्रणालीला आर्मेनियासह अनेक आफ्रिकन देशांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे भारत आता बाजारपेठेतमध्ये आपले पाय हळूहळू पसरवत आहे.

आर्मेनिया हा भारताकडून पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरचा एक प्रमुख खरेदीदार देश देखील आहे. भारताकडून संरक्षण उपकरणे खरेदी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि फ्रान्स यांचाही समावेश आहे, जे भारताकडून मोठ्या प्रमाणावर विमानाचे भाग, विमानाचे मुख्य सांगाडे, मिश्रधातू, इलेक्ट्रॉनिक उप-प्रणाली, उच्च दर्जाची संरक्षण-संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सॉफ्टवेअर घटक खरेदी करतात.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 14 लाख रुपये; पाहा पगाराचं संपूर्ण कॅलक्युलेशन

Web Title: India defence export comparison with pakistan and global market realities marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Defence Sector
  • india
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?
1

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
2

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
4

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.