Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Economy Growth : जागतिक संकटातही भारताची आर्थिक घोडदौड कायम; विकासदर ६.८% पर्यंत वाढणार

India Economy Growth : भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.५% ते ६.८% दराने वाढू शकते, असे जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी डेलॉइट इंडियाने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 02:51 PM
India Economy Growth

India Economy Growth

Follow Us
Follow Us:
  • जागतिक संकटातही भारताची आर्थिक घोडदौड कायम
  • विकासदर ६.८% पर्यंत वाढणार
  • डेलॉइटचा अहवाल
India Economy Growth नवी दिल्ली : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी डेलॉइट इंडियाच्या अंदाजानुसार, २०२६-२७ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.५% ते ६.८% दराने वाढू शकते. कंपनीचा विश्वास आहे की वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आर्थिक घडामोडींना आणखी गती मिळेल. सणासुदीच्या काळात वाढलेली खरेदी, व्याजदरातील सवलत आणि जागतिक परिस्थितीत हळूहळू होणारी संभाव्य सुधारणा ही याची प्रमुख कारणे असू शकतात.

Bharat Tex 2026 : कापड पुनर्वापरासाठी ReFiber चा पुढाकार; मुंबईत 2.7 टन कापड कचऱ्याचे यशस्वी संकलन, विशेष अहवाल सादर

जागतिक संकटाचा परिणाम

डेलॉइटने आपल्या ‘इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालात म्हटले की, २०२६ च्या सुरुवातीला भारताची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी संतुलित स्थितीत होती. तथापि, त्यानंतर मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीवर परिणाम झाला. होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गावर परिणाम झाला, त्यामुळे कच्च्या तेलाच्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये अस्थिरता वाढली.

याचा परिणाम भारताची व्यापार तूट, परकीय गुंतवणूक आणि रुपयाच्या मूल्यावरही जाणवला, भारतीय रिझव्हं बैंकने अलीकडेच चालू आर्थिक वर्षांसाठीचा आपला जीडीपी वाढीचा अंदाज ६.९% वरून ६.६% पर्यंत कमी केला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२५ २६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.७९% दराने वाढली होती, डेलॉइटच्या अर्थतज्ञ्ज रुमकी मजूमदार म्हणतात, जागतिक वातावरण पूर्वर्वीपेक्षा अधिक अनिश्चित झाले आहे.

तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेची धोरणे आणि सरकारी कृती या आव्हानांना काही प्रमाणात कमी करू शकतात. मात्र, एल निनोमुळे कमकुवत मान्सून, घटलेले कृषी उत्पादन आणि वाढत्या अन्नधान्याच्या किमती हे सर्वांत मोठे धोके आहेत.

गुंतवणूक वाढवणे आवश्यक

भारतासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे सरकार अनेक देशासोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी सातत्याने आणि वेगाने काम करत आहे. यामुळे भारतीय कंपन्यांसाठी नवीन परदेशी बाजारपेठा खुल्या होतील आणि निर्यात वाढण्यास मदत होईल, तथापि, अहवालात असे नमूद केले आहे की केवळ नवीन बाजारपेठा मिळवणे पुरेसे नाही.

भारताला आपले उद्योग बळकट करणे, उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणे, देशांतर्गत पुरवता साखळी मजबूत करणे, व्यावसायिक नियम सोपे करणे आणि नवीन तंत्रज्ञान व कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.

8th Pay Commission मध्ये मोठा बदल! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते मोठी वाढ, जाणून घ्या नवीन अपडेट

Web Title: India economy growth gdp likely to reach 6 8 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Business News
  • GDP
  • India Economy

संबंधित बातम्या

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
1

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
2

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार
3

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च
4

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.