भारताला आर्थिक प्रगतीसाठी 'हे' करावेच लागणार; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांचा सल्ला
भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. माञ, सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला आपली आर्थिक गती कायम ठेवायची असेल तर नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीसह आणखी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या फर्स्ट डेप्युटी एमडी गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या फर्स्ट डेप्युटी एमडी गीता गोपीनाथ यांनी आज (ता.१७) केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भेट घेतली आहे. आर्थिक धोरणांमध्ये सातत्यपुर्ण सुधारणा केल्याने त्यांनी अर्थमंञी निर्मला सीतारामन यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत सहकार्य वाढवण्यासाठी भारत सरकार नवीन मार्ग शोधेल, असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा – येत्या आठवड्यात खुला होणार ‘हा’ आयपीओ, पैसे तयार ठेवा, गुंतवणुकीची मोठी संधी!
नवीन नोकऱ्या निर्माण कराव्या लागणार
यापुर्वी गीता गोपीनाथ यांनी सांगितले आहे की, भारताला 2030 पर्यंत तब्बल 6 ते 14 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण कराव्या लागणार आहेत. देशात दरवर्षी किमान १ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. असेही गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल.
सध्याच्या घडीला अनेक देशांमध्ये आर्थिक मंदीची चाहूल दिसून येत आहे. तर काही देशांमध्ये महागाईने डोके वर काढले आहे. तर काही देशांमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, तुलनेने भारतात महागाई दर नियंञणात असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
The First Deputy Managing Director @IMFNews, Ms. @GitaGopinath, called on the Union Finance Minister Smt. @nsitharaman, in New Delhi, today.
Ms. @GitaGopinath congratulated the Union Finance Minister on the policy continuity in the fiscal consolidation path followed by the… pic.twitter.com/T40ys37u9o
— Ministry of Finance (@FinMinIndia) August 17, 2024
अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा आवश्यक
सध्याच्या घडीला भारताचा आर्थिक विकास दर समाधानकारक आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी जवळपास 6.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत.
पण आर्थिक गती कायम ठेवायची असेल तर आणखी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. जीडीपी असाच वाढत राहिला तर दरडोई उत्पन्नही वाढेल. यासाठी भारताला दरवर्षी कोट्यावधींच्या संख्येने नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. यासाठी देशातील क्षेञांना घेऊन, केंद्र सरकारला सामुहिक प्रयत्न करावे लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा – मार्क झुकेरबर्ग यांनी उभारला पत्नीचा भव्य पुतळा, …म्हणतायेत प्राचीन इतिहासाशी आहे संबंध!
गुजरात, तामिळनाडूचे काम समाधानकारक
भारताला कॉर्पोरेट क्षेञातील गुंतवणूक वाढवावी लागेल. गुजरात आणि तामिळनाडू सारखी राज्य विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी चांगले काम करत आहेत. इतर राज्यांनाही हे करावे लागणार आहे. लोकांच्या कौशल्य विकासाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. याशिवाय कृषी उत्पादकता वाढविण्याकडेही केंद्र सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे. जमीन सुधारणांनाही गती द्यावी लागणार आहे. असेही गीता गोपीनाथ यांनी शेवटी नमुद केले आहे.