Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुपयाची ऐतिहासिक घसरण! 10 वर्षातील सर्वात मोठी घसरगुंडी, पुढे रुपयाची कामगिरी राहणार तरी कशी?

भारतीय चलन सातत्याने घसरत आहे. शुक्रवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. भारतीय बाजाराची स्थितीही नाजूक असून मार्केटही क्रॅश झाल्याचे समोर आले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 28, 2026 | 02:30 PM
भारतीय रुपयांची नीचांकी घसरण (फोटो सौजन्य - iStock)

भारतीय रुपयांची नीचांकी घसरण (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय रुपयाची घसरण 
  • १० वर्षातील निचांक पातळी 
  • कशामुळे होतोय परिणाम 
भारतीय चलनात सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. त्याने प्रथमच ९४ चा टप्पा ओलांडला. दिवसभरात तो ९४.८४ पर्यंत घसरला आणि अखेरीस ९४.८१ वर बंद झाला. इतकंच नाही तर याचा संपूर्ण परिणाम हा शेअर बाजारावही झाल्याचे दिसून येत आहे. मात्र भारतीय रुपयाची घसरण गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच इतकी झाली असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता महागाई वाढण्याची शक्यता आहे. 

परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी सततची विक्री, तसंच परदेशी गुंतणुकदारांनी मार्केटमधून काढून घेतलेला पैसा आणि इराणमधील वाढता तणाव यांचा रुपयावर स्पष्टपणे परिणाम होत आहे. आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात आतापर्यंत रुपया सुमारे ११ टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. गेल्या दशकाहून अधिक काळातील भारतीय चलनाची ही सर्वात मोठी कमजोरी मानली जात आहे. चला, यावर अधिक जाणून घेऊया.

Currency Crisis : रुपयाची ऐतिहासिक घसरण! Dollar च्या तुलनेत 95वर पोहोचला दर; अस्थिर बाजारात मात्र गुंतवणूकदारांसाठी नवा पर्याय?

रुपयाच्या घसरणीची कारणे

१. तज्ज्ञांच्या मते रुपयाची घसरण ही कच्च्या तेलाच्या किमतीतील बदलांमुळे झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती अनेक आठवडे प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त राहू शकतात, ज्यामुळे देशात महागाईचा धोका वाढत आहे. याचा थेट परिणाम रुपयावर होत आहे.

२. दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदार भारतीय देशांतर्गत बाजारापासून अधिकाधिक दूर जात आहेत. आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या एका महिन्यात भारतीय शेअर बाजारातून अंदाजे १३ अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत, ज्यामुळे रुपयाची घसरण सुरूच आहे.

३. मध्य-पूर्वेतील तणावामुळे रुपयावर दबाव आहे. युद्ध सुरू झाल्यापासून रुपया अंदाजे ४ टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीमुळे सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डगमगला आहे.

रुपया ‘शतकी’ टप्प्याच्या आणखी जवळ… डॉलरच्या तुलनेत ९४ ची पातळी ओलांडली; जाणून घ्या सविस्तर

रुपयाची पुढील वाटचाल कशी असेल?

विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध संपेपर्यंत रुपयामध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता नाही. तथापि, सरकार आपल्या स्तरावर रुपयाला आधार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही हा प्रयत्न किती यशस्वी होऊ शकतो, यावर अनेक तज्ज्ञांमध्येही मतभेद आहेत. सध्या अमेरिका-इराण-इस्रायलच्या युद्धामुळे जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत आणि भारतालाही त्याचा फटका पडलेला दिसून येत आहे. 

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तथापि, या निर्णयाचा सरकारी तिजोरीवर परिणाम होऊ शकतो आणि सरकारी महसुलात घट होऊ शकते.

Web Title: Indian rupee 10 years low falls record 94 against 1 dollar know the reason behind it iran israel us war crude oil impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Business News
  • dollar
  • indian rupee

संबंधित बातम्या

क्यूबेक सोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात होणार मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास!
1

क्यूबेक सोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात होणार मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास!

India Policy मध्ये अचानक मोठा ‘टर्न’! चिनी कंपन्यांना थेट सरकारी प्रकल्पांमध्ये बोली लावायला दिली?
2

India Policy मध्ये अचानक मोठा ‘टर्न’! चिनी कंपन्यांना थेट सरकारी प्रकल्पांमध्ये बोली लावायला दिली?

केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे कोट्यवधी Aadhaar धारकांना मोठा दिलासा! अवघ्या 48 तासांत 2.5 लाख ईमेल बदलले; काय आहे नवीन फिचर?
3

केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे कोट्यवधी Aadhaar धारकांना मोठा दिलासा! अवघ्या 48 तासांत 2.5 लाख ईमेल बदलले; काय आहे नवीन फिचर?

Post Office च्या ‘या’ योजनेत पंतप्रधान मोदीही करतात गुंतवणूक, केवळ व्याजातून होते लाखोंची कमाई
4

Post Office च्या ‘या’ योजनेत पंतप्रधान मोदीही करतात गुंतवणूक, केवळ व्याजातून होते लाखोंची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.