Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Post Office च्या ‘या’ योजनेत पंतप्रधान मोदीही करतात गुंतवणूक, केवळ व्याजातून होते लाखोंची कमाई

पोस्ट ऑफिसची 'राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र' म्हणजेच NSC (National Savings Certificate) ही एक अशी सरकारी योजना आहे, ज्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुंतवणूक केली आहे. सरकारी हमी आणि उत्कृष्ट परतावा यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही योजना देशभरात प्रचंड लोकप्रिय आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 03, 2026 | 05:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

सुरक्षित भविष्यासाठी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपत्तीजन्य परिस्थिती समोर येईल तेव्हा पैशांची गरज भासल्यास कोणाकडे पैसे मागायची गरज पडणार नाही. जर तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एखादी चांगली योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना खूप उपयुक्त ठरू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या योजनेत गुंतवणूक करतात. नेमकी काय आहे योजना आणि किती मिळतो रिटर्न?

Trump Crypto Profit: ट्रम्प यांच्या क्रिप्टो नफ्यामागे ‘पाकिस्तानी कनेक्शन’? केली होती सीक्रेट डील? नेमका काय आहे दावा?

पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना केवळ तिच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर तिच्या भरघोस परताव्यासाठीही प्रसिद्ध आहे. ही पोस्ट ऑफिस आणि भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक सुरक्षित योजना असून, ती बाजारातील जोखमीपासून मुक्त आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत किमान ₹१,००० पासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि यासाठी कोणतीही कमाल गुंतवणूक मर्यादा नाही. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही गुंतवणूक करू शकता.

रिटर्न किती मिळतो?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ७.७% दराने वार्षिक चक्रवाढ व्याज देते. गुंतवणुकीच्या रकमेवर मिळणारे व्याज वाढत जाते, ज्यामुळे ७.७% परतावा मिळतो. लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे. जर तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी ₹५ लाख गुंतवले, तर मुदतपूर्तीनंतर तुम्हाला एकूण ₹७,२४,५१७ मिळतील, म्हणजेच तुम्हाला फक्त ₹२,२४,५१७ चा परतावा मिळेल.

या योजनेचा लाभ काय?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना कर लाभ देखील देते. जुन्या कर प्रणालीनुसार, कलम ८०सी अंतर्गत ₹१.५ लाख पर्यंतची गुंतवणूक कर सवलतीसाठी पात्र आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे वार्षिक व्याज आपोआप पुन्हा गुंतवले जाते, त्यामुळे पहिल्या चार वर्षांत मिळणारे व्याज करमुक्त असते. फक्त पाचव्या वर्षी मुदतपूर्तीच्या रकमेवर मिळणारे व्याज करपात्र असते.

पंतप्रधान मोदींचीही गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेतही गुंतवणूक केली आहे. त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र  मध्ये ९.१२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. २०१९ च्या निवडणुकीदरम्यान त्यांची गुंतवणूक ७.६१ लाख रुपये होती, जी आता वाढून ९.१२ लाख रुपये झाली आहे.

चालती E-Riksha रिमोटने होतेय बंद! केंद्र सरकारकडून मोठी कारवाई; ॲपवर गुगल आणि ॲपल स्टोअरवरून हटवण्याचे निर्देश

Web Title: Post office nsc scheme pm modi investment bumper returns marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • Business News
  • Govt Scheme
  • Marathi News
  • narendra modi
  • post office

संबंधित बातम्या

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच
1

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य
3

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट
4

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.