Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infosys Layoff: 6 महिन्याआधीच कामावर रुजू झालेल्या 700 फ्रेशर्सला इन्फोसिसने दिले नारळ

इन्फोसिस कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याचे कारण म्हणजे नुकतेच कंपनीने 700 फ्रेशर्सला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. चला या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2025 | 11:10 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अनेक IT कंपन्या आहेत, पण त्यातही अनेक तरुण Infosys मध्ये काम करण्यास जास्त उत्सुक असतात. अनेकदा सोशल मीडियावर Infosys च्या वर्कप्लेस संबंधित व्हिडिओज व्हायरल होत असतात. ज्यामुळे अनेक आयटी इंजिनिअर इन्फोसिसमध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी जास्त उत्सुक असतात. पण आजच्या जमान्यात, कधी कोणाला आपली नोकरी गमवावी लागेल हे सांगता येत नाही. अशीच काहीशी घटना इन्फोसिसमधील 700 फ्रेशर्ससोबत घडली आहे. नेमके घडलं काय चला जाणून घेऊया.

भारतातील आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने त्यांच्या म्हैसूर कॅम्पसमधून सुमारे 700 फ्रेशर्सना काढून टाकले आहे. आयटी कर्मचारी संघटना नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (nites) ने शुक्रवारी ही माहिती देताना म्हंटले की कंपनीत सामील झाल्यानंतर काही महिन्यांतच या फ्रेशर्सना काढून टाकले जात आहे.

Donald Trump यांचा ‘हा’ एक निर्णय आणि Adani Group ला मिळाला दिलासा, शेअर्समध्ये सुद्धा वाढ

फक्त 6 महिन्याचे सोबती

पदवीधर झाल्यानंतर दोन वर्षांची दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सप्टेंबर 2024 मध्ये इन्फोसिसमध्ये काम करण्याची संधी 700 फ्रेशर्सला मिळाली होती. पण आता अवघ्या सहा महिन्यांत त्यांना ही संधी गमवावी लागली आहे. ही बातमी त्यांच्या कुटुंबियांना कशी कळवायची याची आता त्या फ्रेशर्सना चिंता आहे.

NITES ने कामगार मंत्रालयासमोर मागणी

NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे धक्कादायक आणि अनैतिक देखील आहे. इन्फोसिसने काही महिन्यांपूर्वीच नियुक्त केलेल्या सुमारे 700 कॅम्पस रिक्रूटला कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

पट्ठ्याने सोडला स्पर्धा परीक्षेचा नाद, उतरला व्यावसायिकांच्या स्पर्धेत ; आता महिन्याला छापतोय लाखो!

कामगार मंत्र्यांना पत्र लिहीत केल्या या मागण्या

या प्रकरणाची अधिक चौकशी करावी आणि औद्योगिक वाद कायदा, 1947 चे उल्लंघन केल्याबद्दल इन्फोसिसवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.

कायदेशीर चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील कर्मचाऱ्यांची कपात थांबवावी.

सर्व काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भरपाईसह पुन्हा कामावर घेण्यात यावे.

NITES ने इन्फोसिसवर केला हा आरोप

NITES ने आरोप केला आहे की कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या प्रक्रियेदरम्यान धमकावण्यासाठी बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात केले होते. याबद्दल सोशल मीडियावर गदारोळ सुरू आहे. एका युजरने राग व्यक्त करत लिहिले, “हे हृदयद्रावक आहे.” इन्फोसिसकडून ऑफर लेटर मिळाल्यानंतर, या फ्रेशर्सनी २-२.५ वर्षे वाट पाहिली आणि अखेर सप्टेंबर 2024 मध्ये ते कंपनीत सामील झाले. आता, फक्त सहा महिन्यांनंतर, यापैकी 700 लोकांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. त्यांच्यापैकी बरेच जण असतील ज्यांनी या ऑफरसाठी इतर नोकरी नाकारली असेल.

Web Title: Infosys has fired 700 freshers who joined the company 6 months ago

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 11:10 PM

Topics:  

  • Business News
  • IT compony

संबंधित बातम्या

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?
1

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….
2

Anil Agarwal Son Death: वेदांता ग्रुपचे अध्यक्ष Anil Agarwal यांना पुत्रशोक! भावनिक प्रतिक्रिया देत म्हणाले, “मी 75% संपत्ती….

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट
3

प्लास्टिक कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती! Avro India उभारणार देशातील सर्वात मोठा रिसायकलिंग प्लांट

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता
4

Union Budget 2026: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा दिलासा? करसवलत आणि व्याजदर बदलाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.