मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठेत पतंग खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. बाजारात १० रुपयांच्या छोट्या पतंगांपासून ते ८ ते १० फूट लांबीच्या भव्य आणि खास डिझाइनच्या पतंगांपर्यंत विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. कार्टून कॅरेक्टर, धार्मिक चिन्हे, बटरफ्लाय, खाटू श्याम तसेच युट्युब डिझाइनच्या पतंगांना विशेष मागणी आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या खास डिझाइनच्या पतंगांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पतंगांच्या किमती यंदा स्थिर असून पतंग, मांजा आणि इतर साहित्याच्या विक्रीमुळे येत्या काही दिवसांत बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होणार आहे.