Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US – Iran तणावाचा फटका! दुबईच्या विमान प्रवासाचे दर 80 टक्क्यांनी वाढले, युरोपलाही जाणं झालं महाग

इराण, इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य-पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या तणावामुळे भारतापासून युरोप आणि दुबईकडे जाणाऱ्या विमान सेवांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 07, 2026 | 06:58 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • थेट परिणाम आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर
  • गेल्या आठवड्यापेक्षा 40 टक्क्यांनी भाडे वाढलं
  • या’मुळे तिकीट दर चढे राहिले
Iran Isarael war impact : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य-पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून, त्याचा थेट परिणाम आता आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर होताना दिसत आहे. या तणावामुळे भारतापासून युरोप आणि दुबईकडे जाणाऱ्या विमान सेवांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांत युरोपला जाणाऱ्या अनेक फ्लाइट्सचे भाडे 40 टक्क्यांहून अधिक वाढले आहे, तर दुबईच्या मार्गावर तर 80 टक्क्यांपर्यंत दरवाढ झाल्याने प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. विशेषतः पुढील 15 दिवसांच्या कालावधीसाठी तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना या वाढीव दरांचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

Iran Israel War : संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात! ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाकडून अतिरिक्त गॅस पुरवठ्याचं आश्वासन

गेल्या आठवड्यापेक्षा 40 टक्क्यांनी भाडे वाढलं

‘पिकयुअरट्रेल’ या ट्रॅव्हल कंपनीच्या आकडेवारीनुसार, दुबईच्या मार्गावर विमानांची उपलब्धता मर्यादित झाल्याने एका बाजूच्या प्रवासाचे भाडे ६० ते ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, या आठवड्यात होणाऱ्या एकूण विमान रद्द होण्यामागे 50 ते 65 टक्के वाटा केवळ दुबई मार्गावरील फ्लाइट्सचा आहे. जर्मनी आणि पोर्तुगालसारख्या युरोपीय देशांत जाणेही आता अत्यंत खर्चीक झाले आहे. 1 ते 5 मार्च दरम्यानच्या बुकिंगमध्ये गेल्या आठवड्यापेक्षा 40 टक्क्यांनी भाडे वाढले असून, दिल्ली-फ्रँकफर्टसारख्या महत्त्वाच्या मार्गावर इकॉनॉमी क्लासचे तिकीट दीड लाख रुपयांच्या घरात पोहोचले आहे. अनेक तारखांना तर विमानांत एकही सीट शिल्लक नसल्याचे चित्र दिसत आहे.

‘या’मुळे तिकीट दर चढे राहिले

या विमान दरवाढीमागे मध्य-पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद होणे आणि सुरक्षेचे वाढलेले धोके हे प्रमुख कारण आहे. हवाई सुरक्षा धोक्यात आल्यामुळे विमान कंपन्यांना विमाने लांबच्या पर्यायी मार्गांनी उडवावी लागत आहेत. याचा परिणाम थेट इंधन खर्चावर आणि विमान प्रवासाच्या वेळेवर होत आहे. याव्यतिरिक्त विमानांचा विमा उतरवण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे, तसेच जेट इंधनाच्या दरात झालेली वाढ आणि मर्यादित जागा यामुळे तिकीट दर चढे राहिले आहेत. ‘इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स’चे अध्यक्ष रवी गोसाईं यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान वेळापत्रकातील वारंवार होणारे बदल आणि कनेक्टिंग फ्लाइट्सच्या उपलब्धतेत आलेली कमतरता यामुळे काही मार्गांवर टूर पॅकेजेस आणि तिकिटे तात्पुरती महाग झाली आहेत.

काही ट्रॅव्हल कंपन्यांचा पुढाकार

या कठीण परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी काही ट्रॅव्हल कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘पिकयुअरट्रेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हरि गणपति यांनी सांगितले की, प्रभावित प्रवाशांसाठी ‘री-रूटिंग’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे प्रवाशांना काही तासांत पर्यायी मार्गांचा अवलंब करून प्रवास करणे शक्य होत आहे. तसेच, रिफंडेबल हॉटेल्स, रिफंडेबल फ्लाईट्स आणि जादा ट्रॅव्हल इन्शुरन्स यांसारख्या सोयी उपलब्ध करून देऊन प्रवाशांचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मध्य-पूर्वेतील परिस्थिती जोवर निवळत नाही, तोवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या आर्थिक आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

म्युच्युअल फंडमधील तुमची गुंतवणूक आता अधिक सुरक्षित; SEBIने गुंतवणूकदारांना दिलं ‘डेबिट फ्रीज’चं नवं फिचर!

Web Title: Iran isarael war impact flight fares jumps from india to europe and dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Dubai
  • Iran Israel Conflict
  • Iran News

संबंधित बातम्या

Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…
1

Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!
2

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप
3

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम
4

Iran Israel War : ‘कोल्हापुरी’ उद्योगांना युद्धाचा फटका; कच्च्या मालाच्या किमतींमुळे मंदीचे गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.