Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री होणार बंद, “हे” आहे कारण

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 12, 2022 | 12:12 PM
जॉन्सन  अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री होणार बंद, “हे” आहे कारण
Follow Us
Follow Us:

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा सुगंध आला की अनेकजण आपल्या बालपणात हरवून जातात. आजही अनेक महिला लहान मुले जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरचा उपयोग करतात. मात्र येत्या काही दिवसात ही बेबी पावडर आपल्याला दुकानांमध्ये विक्रीसाठी पहायला मिळणार नाही. कारण ही बेबी पावडर बनवणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने पावडरचे उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील विक्री बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अनेक महिला आणि लहान मुलं जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरचा वापर करतात. परंतु या पावडरमुळे कर्करोगाचा धोका आहे, असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात अनेक न्यायालयात अनेक खटले दाखल झाले आहेत. याशिवाय जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोपही काही महिलांनी केला आहे. याआरोपांमुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावे लागत आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरवरील आरोपांमुळे या उत्पादनाच्या विक्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी घट झाली आहे. जागतिक स्तरावर व्यसायाचा विचार करता कंपनीनं २०२३ पर्यंत बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं पोर्टफोलिओ मुल्यांकनानंतर हा निर्णय घेतला आहे. यामध्ये भौगोलिक प्रदेश, उत्पादनांची मागणी आणि ग्राहकांचा कल या घटकांचा अभ्यास केला जातो. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर २०२० मध्ये बेबी पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याचा आरोप करण्यात आला होता. कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले. यानंतर कंपनीने अमेरिका आणि कॅनडामधून बेबी पावडरचे उत्पादन हटवले आहे.

कंपनीकडून आरोपांचं खंडन
दरम्यान जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं आरोपाचं वारंवार आरोपांचं खंडन केलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की त्यांच्या उत्पादनामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही घटक नाहीत. पावडरमधील सर्व घटक सुरक्षित असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

कंपनीने दिला २०० कोटी डॉलरचा दंड
अमेरिकन न्यायालयात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरोधात २२ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये न्यायालयाने कंपनीविरोधात निकाल देत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दंड ठोठावला होता. यामध्ये कंपनीला २०० कोटी डॉलरचा दंड द्यावा लागला आहे.

Web Title: Johnson johnson baby powder will stop selling this is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 12:12 PM

Topics:  

  • Johnson & Johnson Baby Powder
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news

संबंधित बातम्या

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
1

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
2

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?
3

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार
4

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.