
School Diwali Vacation (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळांना 2 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच 15 दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच माध्यमिक शाळांना 2 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल एकूण 16 दिवस शाळा बंद असतील. प्राथमिक शाळा 18 नोव्हेंबरला भरतील आणि माध्यमिक शाळा 19 नोव्हेंबरला भरतील. दोन्हीमध्ये एक दिवसाचा फरक आहे.
खर तर शिक्षक संघटनांनी अनेकवेळा मागणी केली होती की प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळांना एकाच दिवशी सुट्टी द्या. वेगवेगळ्या तारखा ठेवल्यामुळे पालकांचा आणि शिक्षकांचा गोंधळ उडतो. एकाच घरात एक मुलगा प्राथमिकमध्ये आणि एक माध्यमिकला असेल तर त्यांची सुट्टी वेगवेगळ्या दिवशी संपते. पण तरीही सरकारने यंदा पण एक दिवसाचा फरक ठेवलाच आहे.
दरवर्षी शाळांना उन्हाळ्याची आणि दिवाळी अशा दोन मोठ्या सुट्ट्या असतात. पण दिवाळीची सुट्टी सगळ्यांना जास्त आवडते. फटाके, नवीन कपडे, फिरायला जाणे यामुळे मुले या सुट्टीची आतुरतेने वाट बघतात.
सुट्टी जाहीर झाली तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आराम नाही. कारण सुट्टी संपली की लगेच संकलित चाचणी – 1 आणि सहामाही परीक्षा सुरू होईल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे SCERT ने सांगितले आहे की, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संकलित चाचणी घ्यायची आहे. याच अर्थ शाळा उघडल्या उघडल्या 8-10 दिवसातच परीक्षा.
यात गणित, इंग्रजी आणि मराठी या तीन विषयांची चाचणी SCERT घेणार आहे. बाकीच्या विषयांची परीक्षा शाळा स्वतः घेतील. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत मजा जरी असली तरी अभ्यास पण करावाच लागणार आहे. शिक्षकांना पण काम जास्त आहे. सुट्टीतून आल्यावर लगेच पेपर काढणे, तपासणे, मार्क भरणे हे सगळे करावे लागेल.
Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
2 नोव्हेंबरपासून सुट्टी सुरू होत असल्याने अनेक कुटुंबांनी गावी जाण्याचे किंवा फिरायला जाण्याचे प्लॅन केले आहेत. दिवाळी यंदा थोडी उशिरा आहे त्यामुळे थंडी पण सुरू झालेली असेल. 15 दिवसांची सुट्टी असल्याने लांबच्या प्रवासाचे नियोजन करता येईल.पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुट्टीत मुलांनी अभ्यासाकडे पण लक्ष द्यावे. कारण शाळा उघडल्या की लगेच परीक्षा आहे. फक्त खेळण्यात आणि फोन बघण्यात सुट्टी घालवली तर नंतर पळापळ होईल.एकूण काय तर 2 नोव्हेंबर ते 17-18 नोव्हेंबर पर्यंत शाळांना मस्त सुट्टी मिळणार आहे. प्राथमिकचे 15 दिवस आणि माध्यमिकचे 16 दिवस. पण ही सुट्टी संपली की लगेच अभ्यासाला लागावे लागणार आहे.
Ans: २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे.
Ans: प्राथमिक शाळा १८ नोव्हेंबरला, तर माध्यमिक शाळा १९ नोव्हेंबरला सुरू होतील.
Ans: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संकलित चाचणी घेण्याचे SCERT ने सांगितले आहे.