
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
एलआयसी भारतीय आयुर्विमा महामंडळ ही एक सरकारी मालकीची विमा कंपनी आहे, म्हणजेच तिच्या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करण्यात कोणताही धोका नाही. त्यामुळे यात गुंतवणूक हा महत्त्वाचा आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो. ज्यांना निवृत्तीनंतर हमी वार्षिक उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल त्यांनी एलआयसी जीवन उमंग योजनेत गुंतवणूक करवी. ही एक संपूर्ण आयुष्य विमा योजना आहे जी पॉलिसीधारकांना त्यांच्या वयाच्या 100 वर्षांपर्यंत संरक्षण देणार आहे. जर तुम्ही दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला वयाच्या 100 वर्षांपर्यंत निश्चित असं वार्षिक उत्पन्न मिळणार आहे.
या योजनेच्या होल्डरना 100 वर्षांचं प्रोटेक्शन मिळतं. पण तुम्हाला आयुष्यभर या योजनेत पैसे भरावे लागत नाहीत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार १५, २०, २५ किंवा ३० वर्षांच्या प्रीमियम भरण्याच्या मुदती निवडू शकता.
प्रीमियम भरण्याचा कालावधी संपल्यानंतर, एलआयसी तुम्हाला आयुष्यभर ‘सर्व्हायव्हल बेनिफिट’ म्हणून दरवर्षी मूळ विमा रकमेच्या ८% रक्कम देत राहील.
आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, प्रीमियम भरणं हे कलम ८०सी अंतर्गत कर-वजावटीस पात्र आहे आणि मुदतपूर्ती/परतावा कलम १०(१०डी) अंतर्गत कर-वजावटीस पात्र आहे. पॉलिसी सुरू झाल्यापासून दोन वर्षांनंतर गरज भासल्यास तुम्ही त्यावर कर्ज देखील घेऊ शकता.
एखाद्या व्यक्तीने वयाच्या ३० व्या वर्षी ही पॉलिसी घेतली आणि २० वर्षांसाठी प्रीमियम भरायचं ठरवलं, तर त्यांच्या ५,००० च्या मासिक गुंतवणुकीतून त्याला वार्षिक ₹६०,००० मिळतील. या प्रीमियममुळे अंदाजे ₹१० लाखांचे जीवन विमा संरक्षण तयार होईल. याचा अर्थ असा की, २० वर्षांनंतर, जेव्हा पॉलिसीधारक ५० वर्षांचा होईल आणि ५१ वर्षांचा होईल, तेव्हा त्यांना १०० वर्षांचे होईपर्यंत किंवा त्यांचा मृत्यू होईपर्यंत, ₹१० लाखांच्या ८% म्हणजेच वार्षिक ₹८०,००० ची निश्चित रक्कम मिळेल.
जर पॉलिसीधारक १०० वर्षांपेक्षा जास्त जगला, तर त्याला विमा रकमेची एकरकमी रक्कम, एलआयसीने घोषित केलेला कोणताही बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस, मुदतपूर्ती लाभापोटी एकरकमी मिळतो. जर पॉलिसीधारकाचा वयाच्या ५० वर्षांनंतर कधीही मृत्यू झाला, तर त्यांच्या नॉमिनीला ₹१० लाखांची संपूर्ण विमा रक्कम आणि अनेक वर्षांपासून जमा झालेली सर्व रक्कम एकाच वेळी मिळेल. त्यामुळे तुम्हालाही वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत रक्कम हवी असेल तर आताच ही योजना सुरु करा.