Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

Mirzapur Movie New Characters Reveal : ओटीटीवर तुफान गाजल्यानंतर आता 'मिर्झापूर' मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ॲमेझॉन MGM स्टुडिओजने चित्रपटातील नव्या व्यक्तिरेखांचे दमदार पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 04:40 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मोठ्या पडद्यावर रंगणार ‘मिर्झापूर’चा नवा खेळ!
  • रवी किशनसह ‘या’ कलाकारांची झलक
  • नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्सही आऊट
Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर’मधील ‘वुमन ऑफ मिर्झापूर’ला नुकतेच प्रकाशझोतात आणल्यानंतर, एक्सेल एंटरटेनमेंट आणि ॲमेझॉन MGM स्टुडिओजने आता ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील नव्या व्यक्तिरेखांचे पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना या फ्रँचायझीच्या जगाशी जोडलेल्या काही नव्या तसेच परिचित चेहऱ्यांची झलक पाहायला मिळत आहे. ( Mirzapur Movie New Characters Reveal ) 

‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्यावर कोसळला दु: खाचा डोंगर; वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती

या नव्या पोस्टर रिव्हीलची सुरुवात रवि किशन यांच्यापासून होते. त्यांच्या व्यक्तिरेखेचे पोस्टर ‘मिर्झापूर’च्या या बहुप्रतिक्षित मोठ्या पडद्यावरील अध्यायात त्यांच्या दमदार आणि रुबाबदार अंदाजाची झलक दाखवते. त्यानंतर बिरजू लोहार, भैरव सिंह आणि मुमताज बीबी यांच्या व्यक्तिरेखांचे पोस्टर्सही प्रदर्शित करण्यात आले आहेत. या व्यक्तिरेखा चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या विस्तृत विश्वाला आणि कथानकाला आणखी विस्तार देताना दिसत आहेत.

पुढील कथानकाचा भाग बनणाऱ्या व्यक्तिरेखांची झलक

हे नवे पोस्टर्स प्रेक्षकांना ‘मिर्झापूर’च्या पुढील कथानकाचा भाग बनणाऱ्या व्यक्तिरेखांची जवळून झलक देतात. त्याचबरोबर, या पोस्टर्समुळे चित्रपटाची कथा आणि त्यातील विविध व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध व समीकरणे याबाबतची उत्सुकताही आणखी वाढली आहे.

चित्रपटाबद्दलचा उत्साह सातत्याने वाढतोय

ट्रेलर, संगीत आणि व्यक्तिरेखांवर केंद्रित केलेल्या कॅम्पेनमुळे चित्रपटाबद्दलचा उत्साह सातत्याने वाढत आहे. अशातच, नव्या पोस्टर्सचे हे रिव्हील ‘मिर्झापूर: द मूव्ही’बद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवणारे ठरले आहे. स्ट्रीमिंगच्या जगात जबरदस्त लोकप्रियता मिळवल्यानंतर ही बहुप्रतिक्षित फ्रँचायझी पहिल्यांदाच थिएटरच्या मोठ्या पडद्यावर येत आहे आणि प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये मनोरंजनाची नवी अनुभूती देण्यासाठी सज्ज झाली आहे.

मिर्झापूर: द मूव्ही चित्रपटाची निर्मिती

ॲमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे, तर चित्रपटाची कथा आणि लेखन पुनीत कृष्णा यांनी केले आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी मिर्झापूर: द मूव्ही चित्रपटाची निर्मिती केली आहे. कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. चित्रपट ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tukaram Mundhe: भारतीयांच्या घराघरातील किचनचा प्रश्न ऐरणीवर? दिग्दर्शक कुणाल कोहलींनी तुकाराम मुंडेंना केली ‘ही’ खास विनंती

Web Title: Mirzapur movie new characters reveal posters out ravi kishan look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • amazon prime video
  • Bollywood
  • Hindi Movie
  • Marathi News
  • Mirzapur
  • Pankaj Tripathi
  • Web Series

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
3

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.