Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loan Recovery Rule : कर्जाचा EMI थकला तर घाबरू नका! आता बँकेची मनमानी चालणार नाही, रिकव्हरी एजंटबाबत RBI चे नवे नियम जाणून घ्या..

Loan Recovery Rule : जर तुमचा बँकेचा ईएमआय वेळेवर भरला गेला नाही, तर आता बँकांना किंवा त्यांच्या रिकव्हरी एजंट्सना मनमानी करता येणार नाही. RBI ने कर्ज वसुलीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना मानसिक त्रास कमी होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 03:38 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कर्जाचा EMI थकला तर घाबरू नका!
  • आता बँकेची मनमानी चालणार नाही
  • रिकव्हरी एजंटबाबत RBI चे नवे नियम
Loan Recovery Rule : तुम्हीही बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आपण बँकेकडून लोन घेतो EMI वेळेत भरतो. पण कधीतरी अशी परिस्थिती येते ज्यावेळेला आपल्याला EMI भरायला उशीर होतो. त्यावेळी वसुलीसंदर्भात बँकेचे रिकव्हरी एजंट लगेल आपल्याला कॉल करतात. पण आता या सगळ्यावर RBI ने कर्ज वसुलीसंदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. या नियमामुळे आता कर्ज वसुलीच्या नावाखाली ग्राहकांसोबत होणारा छळ बदं होणार आहे. नेमके काय आहेत नियम? सविस्तर जाणून घेऊयात. ( Loan Recovery Rule ) 

Ghee Sale Ban : पनीरनंतर आता तूप ‘टार्गेट’वर, झाली कठोर कारवाई, ‘या’ राज्यात थेट 1 वर्षाची बंदी

RBI कडून कर्ज वसुलीसंदर्भात महत्त्वाचे नियम

भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने कर्ज वसुलीसंदर्भात महत्त्वापूर्ण नवीन नियम जारी केले आहेत. कर्ज वसुलीच्या नावाखाली ग्राहकांसोबत होणारा छळ आणि अन्यायकारक पद्धतींना प्रतिबंध करणं हा या नियमांचा उद्धेश आहे. हे नवे नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू करण्यात येतील. हे नियम बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या असलेल्या जुन्या पद्धतींमध्ये पूर्णपणे बदल घडवून आणतील. नवे येणारे नियम हे बँका आणि वसुली एजंटांना पालन करावे लागतील. या सगळ्यात वसुलीदरम्यान ग्राहकांना होणार त्रास आता कमी होणार आहे. ग्राहकांची माहिती, गोपनीयता, प्रतिष्ठा आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेचाही या नियमांमध्ये विचार करण्यात आला आहे.

कोड ऑफ कंडक्ट गरजेचा

RBI ने बँकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि बाह्य वसुली एजंटांसाठी एक स्पष्ट आचारसंहिता म्हणजेच कोड ऑफ कंडक्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये राहूनच पुढे प्रक्रिया होईल. त्याचबरोबर वसुली एजंटांना प्रशिक्षण घेणं गरजेचं असणार आहे.
एजंट्सना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स म्हणजेच IIBF कडून कर्ज वसुलीचं प्रशिक्षण घेणे देखील आवश्यक असणार आहे. जर एखादी बँक बाह्य एजन्सीचा वापर करत असेल, तर ती एजन्सी नियमांचे पालन करते याची लेखी हमी बँकेने त्या एजन्सीकडून घेणं गरजेचं असेल.

एजंटची ओळख सांगणं बंधनकारक

बँकांनी ग्राहकांना त्यांच्या कर्ज वसूल करण्यासाठी कोणता एजंट किंवा कोणती एजन्सी जबाबदार आहे याची माहिती बँकेने ग्राहकाला देणे आवश्यक आहे. जर एजन्सी बदलली किंवा तिच्यासोबत असलेला करार संपुष्टात आला तर त्या संदर्भातील माहिती देखील ग्राहकांना देणं गरजेचं असणार आहे. वसुली एजंट जेव्हा वसुलीसाठी ग्राहकाला भेटेल त्यावेळी त्याच्याकडे त्याचं ओळखपत्र आणि बँक किंवा एजन्सीकडून मिळालेलं अधिकृत पत्रदेखील सोबत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे बँकेने यासंदर्भातील जारी केलेली नोटीसची प्रत आणि तक्रार निवारण अधिकाऱ्याकडून दिला गेलेला विस्तृत तपशीलदेखील सोबत असणं आवश्यक आहे.

वसुलीसाठी फोन आणि भेटीचा वेळ निश्चित

RBI ने वसुलीसाठीचे फोन आणि ग्राहक भेटींची वेळ देखील ठरवली आहे. त्यामुळे वसुली एजंटनी हा वेळ पाळणं बंधनकारक असणार आहे. वसुली एजंट वसुलीसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेतच ग्राहकांना भेटू शकतात किंवा त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. इतर कोणत्याही वेळी संपर्क साधणं नियमांच्या विरोधात ठरेल फक्त ग्राहकाने स्वतः मागणी केली तर ते अवेळी फोन करु शकतात.

वसूलीसाठी केलेला प्रत्येक कॉल होणार रेकॉर्ड

बँकांना वसुलीसाठी केलेले प्रत्येक कॉल रेकॉर्ड केले जाणार आहेत आणि हे रेकॉर्डिंग जवळजवळ सहा महिन्यांसाठी ठेवणं बंधनकारक असणार आहे. जेव्हा कॉल रेकॉर्ड केला जाईल तेव्हा त्याची माहिती ग्राहकांना असण आवश्यक आहे. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर बँका आणि वसुली एजन्सी करू शकत नाही. यापुढे फक्त वसुलीसाठी आवश्यक असलेली माहितीच एजन्सीला दिली जाईल.

धमक्या आणि गैरवर्तनावर पूर्णपणे आळा

नवीन नियमांनुसार, वसुली एजंट आणि बँकेचे कर्मचारी ग्राहकांना घाबरवणारे किंवा त्रास देणारी पद्धत आता यापुढे वापरु शकणार नाही, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये खालील गोष्टींना मनाई आहे.

  • अपमानास्पद भाषा वापरणे किंवा धमक्या देणे
  • ग्राहकांना वारंवार फोन करून त्रास देणे
  • ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त फोन करणे
  • ग्राहकाच्या नातेवाईक, मित्रांना त्रास देणे
  • हिंसेची धमकी देणे
  • ग्राहकाची बदनामी करण्याची धमकी देणे
  • सोशल मीडियावर खाजगी फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ पोस्ट करणे
    आक्षेपार्ह मॅसेज पाठवणे
वसुली एजंटने केवळ कर्ज वसुलीच्या संदर्भातच ग्राहक किंवा जामीनदाराशी बोलणं करावं आणि यावेळी त्यांनी नीट सभ्यतेचे पालन करावे.

मालमत्ता किंवा तारण ताब्यात घेण्यासंबंधी नियम

जर बँकेने कर्जाची वसुली करण्यासाठी कोणतीही मालमत्ता किंवा (सिक्योरिटी) तारण ताब्यात घेण्याचा अधिकार वापरला, तर याबाबत कर्ज करारामध्ये कायदेशीररित्या वैध आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे. करारावर स्वाक्षरी करताना ग्राहकाला याची नीट माहिती दिली पाहिजे.

मोबाईल फोनसारख्या कर्जांमध्ये मनमानी नाही

जर बँकेने मोबाईल फोन किंवा इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी कर्ज दिले असेल, तर काही परिस्थितीत बँक त्या उपकरणाची काही कार्ये मर्यादित करू शकते. पण हे बँकेला हे हक्क वापरण्यासाठी देखील काही कठोर नियम निश्चित करण्यात आले आहेत. कर्ज ३० दिवस थकीत राहिल्यानंतर काही निर्बंध लादले जाऊ शकतात. आणि तरीही ६० दिवसांपर्यंत विलंब झाला तर मग संपू्र्ण बंदीचा हक्का बँकेला वापरता येऊ शकतो. त्याअगोदर बँक आपली कोणतीही मनमानी करु शकत नाही.

ग्राहक तक्रार करू शकतात

RBI चे हे नवीन नियम वसुली प्रक्रियेतील एजंटची मनमानी रोखण्यासाठी करण्यात आले आहेत. बँकांना आता कर्ज वसुलीसाठी आदरपूर्वक आणि पारदर्शक दृष्टिकोनाचा वापर करणं आवश्यक आहे. जर या नियमांचे उल्लंघन झाल्यास, ग्राहक पुराव्यासह बँकेच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे किंवा थेट आरबीआयकडे तक्रार दाखल करू शकतात.

Fake Paneer Ban News : देशभरात पनीरवर येणार बंदी? राज्यांनंतर केंद्र सरकार उचलणार मोठे पाऊल; बनावट पनीरवर कडक कारवाई

Web Title: Loan recovery rule agent rbi new guidelines and borrower rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Loan
  • RBI Action
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Business Loan : सरकारचा महत्त्वाचा निर्णय! MSME ला मिळणार मोठा निधी! ग्रामीण भागात सहज कर्ज होणार उपलब्ध
1

Business Loan : सरकारचा महत्त्वाचा निर्णय! MSME ला मिळणार मोठा निधी! ग्रामीण भागात सहज कर्ज होणार उपलब्ध

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?
2

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.