(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
खरं तर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने अॅनालॉग पनीरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. FSSAI चे CEO रजित पुन्हानी यांच्या मते, अॅनालॉग पनीरचा मुद्दा आता काही राज्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर आता तो संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. परिणामी, त्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा एक मोठा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यत आहे.
अॅनालॉग पनीर हे एक दूध नसलेला असा पदार्थ आहे. जो दिसायला आणि स्पर्शासाठी पनीरसारखा दिसतो. पण तो पूर्णपणे दुधाने बनवलेला नसतो. यामध्ये पारंपरिक दुधातील स्निग्ध पदार्थ आणि घन पदार्थांच्या जागी वनस्पती तेल किंवा इतर दुग्धविरहित घटक वापरले जातात. पण FSSAI ने अलीकडेच हे स्पष्ट केलं आहे की, अशी उत्पादने केवळ “पनीर” या नावाने विकली जाऊ शकत नाहीत.
महाराष्ट्र
छत्तीसगड
गुजरात
हिमाचल प्रदेश
मध्य प्रदेश
कर्नाटक
उत्तराखंड
पंजाब
हा मुद्दा केवळ पनीरच्या गुणवत्तेपुरता मर्यादित नाही. तर खोटी लेबले आणि टॅग वापरून ग्राहकांची फसवणूक करण्यात येते. विकल्या जाणाऱ्या इतर उत्पादनांच्या तक्रारी देखील चिंतेचा विषय आहेत. ज्यात अनेकदा त्यांना अस्सल पनीर म्हणून चुकीच्या पद्धतीने विकला जात आहे. यामुळेच अन्न नियामक आता ग्राहकांना अचूक उत्पादन माहिती देण्यावर भर देत आहे. जर केंद्र स्तरावर देशव्यापी बंदी लागू झाली, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायांना अॅनालॉग पनीरच्या वापरा आणि विक्रीसंदर्भात नवीन नियमांचे पालन करावे लागू शकते.






