Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?

Gold Loan Business : भारतातील गोल्ड लोन क्षेत्रात सध्या एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मुथूट किंवा मणप्पुरम सारख्या कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या या बाजारात आता टाटा, गोदरेज आणि बिर्ला यांसारख्या भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट समूहांनी वेगाने पाऊल ठेवले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 02:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई?
  • टाटा, गोदरेज, बिर्ला…
  • मोठ्या समुहांची धडाधड एन्ट्री
Gold Loan Business : भारतात सोनं फक्त दागिना म्हणून नाही तर त्याच्याकडे मोठी गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे सोन्याची बाजारपेठही तितकीच मोठी आहे. आतापर्यंत मुथूट किंवा मणप्पुरम सारख्या कंपन्या भारतीय बाजारपेठांमध्ये गोल्ड लोन पुरवत होत्या पण या क्षेत्रात सध्या मोठा बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या क्षेत्राचं लक्ष्य मोठ्या आणि दिग्गज कॉर्पोरेट कंपन्या वेधून घेत आहेत. त्यामुळे या बाजारात आता टाटा, गोदरेज आणि बिर्ला यांसारख्या भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या वेगाने पावलं ठेवणार आहेत. पण देशातील दिग्गज उद्योगपती अचानक सोन्यावर कर्ज देण्याच्या व्यवसायाकडे काय आकर्षित होत आहेत? ( Gold Loan Business ) 

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

भारताची सुवर्ण कर्ज बाजारपेठ मोठ्या कंपन्यांचे लक्ष वेगाने वेधून घेत आहे. टाटा कॅपिटल, गोदरेज कॅपिटल आणि आदित्य बिर्ला कॅपिटल यांसारखे प्रमुख वित्तीय समूह आता सुवर्ण कर्ज व्यवसायाला एक छोटा किंवा प्रादेशिक व्यवसाय मानत नाहीत. गेल्या काही आठवड्यांत सुवर्ण कर्ज क्षेत्रात मोठे बदल होत आहेत.

केवळ गेल्या काही आठवड्यांत, टाटा कॅपिटलने केरळस्थित योगलोन्समध्ये हिस्सा विकत घेतला आहे. गोदरेज कॅपिटलने कनकदुर्गा फायनान्सचा सुवर्ण कर्ज व्यवसाय विकत घेतला. इतकेच नव्हे, तर आदित्य बिर्ला कॅपिटलने १,००० शाखांसह एका नवीन सुवर्ण कर्ज विभागाच्या निर्मितीची घोषणा केली.

दिग्गज समूहांकडून मोठी पावलं

टाटा कॅपिटल

टाटा कॅपिटलने केरळस्थित योग्लोन्समध्ये ८८.६% हिस्सा विकत घेतला आहे. यामुळे त्यांनी सुवर्ण कर्ज व्यवसायातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या अधिग्रहणामुळे कंपनीला १६० हून अधिक शाखा, अंदाजे ३२,००० ग्राहक आणि ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा पोर्टफोलिओ असलेला व्यवसाय मिळाला आहे. त्यामुळे या स्टेप्ससह कंपनीने सुवर्ण कर्ज बाजारपेठ क्षेत्रात मोठं पाऊल उचललं आहे.

गोदरेज कॅपिटल

गोदरेज कॅपिटलने कनकदुर्गा फायनान्सचा सुवर्ण कर्ज व्यवसाय विकत घेतला आहे. या अधिग्रहणामुळे कंपनीला अंदाजे २८० कोटी रुपयांचा सुवर्ण कर्ज पोर्टफोलिओ, अंदाजे १२,००० ग्राहक आणि ५४ शाखा मिळाल्या आहेत. गोदरेज कॅपिटलचे २०३१ पर्यंत आपला सुवर्ण कर्ज पोर्टफोलिओ ५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. यामुळे मोठी पायरी या क्षेत्रात गाठत समोर मोठं लक्ष्य ठेवलं आहे.

आदित्य बिर्ला कॅपिटल

या दोन्ही कंपन्यांच्या तुलनेत आदित्य बिर्ला कॅपिटलने एक वेगळी रणनीती अवलंबली आहे. कोणतीही कंपनी विकत घेण्याऐवजी कंपनीने देशभरात सुमारे १,००० शाखांचे जाळे उभारून आपला सुवर्ण कर्ज व्यवसाय वाढवण्याची योजना प्लॅन केली आहे.

या क्षेत्राकडे वळण्याची नेमकी कारणं काय?

गेल्या काही वर्षांत, वैयक्तिक कर्ज आणि ग्राहक पत यांसारख्या असुरक्षित कर्जांमधील नियम कठोरता आणि जोखीम वाढली आहे. या सगळ्याचा परिणाम कंपन्या सुरक्षित कर्ज क्षेत्राकडे वळल्या आहेत. जिथे सुवर्ण कर्ज हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय घरांमध्ये पडून असलेल्या सोन्यापैकी केवळ एक छोटासा भाग औपचारिक कर्जपुरवठा प्रणालीमध्ये आला आहे.

मे २०२६ पर्यंत, सोन्याच्या दागिन्यांवरील कर्जे अंदाजे ₹३.३ लाख कोटींपर्यंत पोहोचली, ज्यामुळे आर्थिक वर्ष २०२६ मध्ये जवळपास ५०% वाढ नोंदवली गेली. सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने कंपन्या केवळ सध्याच्या किमतीच्या चक्रावर अवलंबून नाहीत, तर त्या दीर्घकाळासाठी वितरण जाळे आणि पायाभूत सुविधा तयार करण्याबाबतही प्लॅन आखत आहेत.

TikTok Privacy Fine : टिकटॉकला मोठा दणका! भरावा लागणार 3300 कोटींचा दंड, लहान मुलांच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड? प्रकरण काय?

Web Title: Gold loan business tata godrej birla entering reasons and market analysis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Aditya Birla
  • Business
  • Business News
  • Digital Gold
  • Loan
  • Marathi News
  • Tata

संबंधित बातम्या

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द
1

Nagpur Sport :व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
2

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
3

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
4

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.