कर्ज महागले..! आता भरावा लागणार अधिकचा ईएमआय; 'या' बँकेकडून कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ!
स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) खातेदार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम ही बातमी वाचा. कारण आता एसबीआय बँकेकडून कर्जवारील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना आपल्या पूर्वीच्या व्याजापेक्षा अधिक व्याज भरावे लागणार आहे. अर्थात आता एसबीआय खातेदारांसाठी कर्ज महागले असून, त्यांना महागड्या व्याजदराने दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.
एमसीएलआर वाढवण्याची दुसरी वेळ
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना यापुढे वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांचा यात समावेश आहे. एसबीआयने एमसीएलआर वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. एसबीआयने सध्या एबीएलआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. एमसीएलआर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. कारण आता गृहकर्ज आणि कार लोन घेण्याच्या विचारात असलेल्या खातेधारकांना मोठा फटका बसणार आहे.
किती झालीये व्याजदरात वाढ?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेकडून आपल्या एमसीएलआरमध्ये बदल करण्यात आला आहे. बँकेकडून करण्यात आलेल्या या बदलामुळे आता बँकेच्या एमसीएलआरमध्ये 5 ते 10 आधार अंकांनी वाढ करण्यात आली आहे. अर्थात एमसीएलआर 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्के वाढ करण्यात आली आहे.
काय आहे नवीन व्याज दर?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन व्याजदरांनुसार, एका महिन्याच्या कर्जाच्या कालावधीवरील एमसीएलआर 5 बीपीएस पॉईंटने वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कर्ज कालावधीवर एमसीएलआर 10 बीपीएसने वाढवून 8.4 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या कर्ज कालावधीवर एमसीएलआर 10 bps ने वाढवून 8.75 टक्के करण्यात आला. एका वर्षाच्या कर्ज कालावधीवरील एमसीएलआर 10 बीपीएसने वाढवून 8.85 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या कर्जाच्या कालावधीवर एमसीएलआर 10 बीपीएसने वाढवून 8.95 टक्के करण्यात आला. तीन वर्षांच्या कर्जाच्या कालावधीवर एमसीएलआर 5 बीपीएसने वाढवून 9 टक्के करण्यात आला आहे.