फोटो सौजन्य - Social Media
या विशेष समारंभात व्यासपीठावर केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर. पाटील, राज्यमंत्री ना. व्ही. सोमन्ना, राज्यमंत्री ना. डॉ. राजभूषण चौधरी, सचिव व्ही.एल. कंथाराव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेचे अति. शहर अभियंता अरविंद शिंदे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्थापन आणि पाण्याचा पुनर्वापर यांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सर्वंकष विचार करून देशातील अग्रगण्य स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून हा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबई शहराचा राष्ट्रीय पातळीवर झालेला हा गौरव शहराची मान उंचावणारा असून, त्याबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
तसेच, या यशात नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत, आयुक्तांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत. यापुढील काळात महानगरपालिका शहर विकासाला सुसंगत धोरणात्मक वाटचाल करेल आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर भर देईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.






