UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू (Photo Credit - X)
युपीएल कंपनी जगभरातील १४० हून अधिक देशांमध्ये सक्रीय आहे. लहान शेतक-यांपासून ते मोठ्या व्यावसायिक उत्पादकांपर्यंत युपीएल कंपनी जोडली गेली आहे. जागतिक हवामान बदलांविषयक कृती करणे, अन्न सुरक्षा आदी घटकांना चालना देणारे कृषी विषयक शाश्वत उपाय राबवणे, त्यांना सक्षम करणे हे युपीएलचे उद्दिष्ट आहे. या उद्देशाखातर युपीएलने जगभरातील २० प्रेरणादायी शेतक-यांच्या अनुभवांचे संकलन केले आहे. हरितवायूंचे उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा सुरक्षा, जलसंधारण, मातीचे आरोग्य पुनर्संचयित करणे आणि जैवविविधता संरक्षण या पाच प्रमुख स्तंभांना कृषीविषयक उपाय फायदेशीर ठरतात, हे या शेतक-यांच्या कथांमधून मांडण्यात येईल. हे पाचही स्तंभ सीओपी३०मध्ये युपीएलच्या सहभागाचे मार्गदर्शन करत आहेत.
हवामानविषयक धोरणे ही शेतक-यांसाठी हितकारक असावीत, ग्राहकांनी शेतक-यांचे सामर्थ्य, लवचिकता, नावीन्यता ओळखा, शेतक-यांचा सन्मान करा याकरिता सर्वांना #AfarmerCan या मोहिमेअंतर्गत आवाहन केले जाईल. या मोहिमेचा भाग म्हणून युपीएलने शेतक-यांची लवचिकता आणि क्षमता वाढवण्यासाठी चार स्तंभीय प्रोत्साहन आराखडा प्रस्तावित केला आहे.
BPCL ‘अंकुर फंड’ अंतर्गत ‘एलिव्हेट’ कोहॉर्ट सुरू; ग्रीन टेक, सायबरसुरक्षा स्टार्टअप्सना निमंत्रण
ब्राझीलसह अनेक महत्त्वाच्या जागतिक बाजारपेठांमध्ये युपीएल कंपनी व्यापक स्तरावर आपल्या मोहिमेचा विस्तार करत आहे. या मोहिमेसाठी उच्च दर्ज्याचे ब्रँण्डिंग, डिजीटल सहभाग यांचा सुरेख मिलाफ आहे. ब्राझीलमधील बेलेम शहरांत ही मोहिम सुरु झाली आहे. बेलेम शहरातील विमानतळावर, १०००हून अधिक ब्रँण्डेड टॅक्सी आणि २०० बसेसवर ब्रँण्डचे चिन्ह लावण्यात आले आहे. या बसेसवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास शेतक-यांच्या कथा तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होतील. डिजिटल मोहिमा, सोशल मिडीया यांसह शेतक-यांना हवामानाचे नायक म्हणून दर्शवणारा एक भावनिक चित्रपटही सादर केला जाईल. या मोहिमेत टी-शर्ट, टोट बॅग आणि पाण्याच्या बाटल्या यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तूंचादेखील समावेश आहे.
सीओपी३० परिषदेदरम्यान, युपीएल कंपनी ब्लू झोनमध्ये उपस्थित असेल. हा ब्लू झोन संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजद्वारे औपचारिक वाटाघाटी आणि राष्ट्रीय दालनांसाठी आयोजित केलेले अधिकृत क्षेत्र आहे. यावेळी युपीएल ब्राझीलच्या मिओ ब्रँण्डची कार्बन स्मार्ट कॉफी सादर करेल. ही कॉफी उत्सर्जनापेक्षा कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. युपीएल परिषदेत सहभागी प्रतिनिधींना हवामानाला अनुकूल शेती जागतिक हवामान बदलांच्या लक्ष्याच्या दिशेने प्रगती करु शकते, हे दाखवून देईल. या प्रायोजकत्त्वाचा भाग म्हणून युपीएलने परिषदेच्या अधिकृत ब्रँण्डिंगचा वापर करण्याचे हक्कदेखील मिळवले आहे.
भारतीय बाजारात गाजणारी ‘अमृता चहा’! स्थानिक चवींच्या जाणिवेवर आधारित नवा पर्याय
युपीएल कंपनी, ब्राझील कृषी संशोधन महामंडळ (Embrapa)द्वारे आयोजित केलेल्या ऍग्रीझोन या प्रदर्शनस्थळी आपला ऍग्रोस्फियर नावाचा स्टॉल प्रदर्शित करेल. या ठिकाणी, युपीएल तज्ज्ञ पॅनेल आणि चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल. या ठिकाणी युपीएल तज्ज्ञांच्या सहभागाने विविध चर्चासत्रांचे आयोजन करेल. सीओपी३०मधील युपीएलच्या सहभागाचे मार्गदर्शन करणा-या पाच स्तभांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. युपीएल प्लॅनेटा कॅम्पो फोरममध्येही सहभागी होईल. यावेळी युपीएल कंपनीचे सदस्य भारतातील मिथेल वायू उत्सर्जन कमी करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण केस स्टडी सादर करतील.
‘#AFarmerCan’ या मोहिमेद्वारे युपीएल कंपनी शेतक-यांना हवामानाचे नायक आणि पृथ्वीचे संरक्षक म्हणून सन्मान देणारे जागतिक आंदोलन उभारण्याच्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती करत आहे.
युपीएल कंपनी बायोसोल्युशन्स आणि कृषीविषयक उपाययोजनंमध्ये जागतिक स्तरावरील अग्रेसर संस्था आहे. युपीएल कंपनी १४० हून अधिक देशांमध्ये विस्तारलेली आहे. या देशांमध्ये कंपनीचे ४३ उत्पादन केंद्रे आणि ५७ संशोधन व विकास केंद्रे कार्यान्वित आहेत. युपीएलकडे जगभरातील १५ हजारांहून अधिक नोंदणीकृत उत्पादनांचे मोठे पोर्टफोलिओ आहेत. या प्रचंड विस्ताराच्या माध्यमातून युपीएल जगभरातील शेतीला शाश्वत आणि प्रगत उपाय सूचवत आहे.
अधिक माहितीसाठी – ज्योती वड्डी – कॉप्रोरेट प्रमोशन प्रमुख – युपीएल लिमिटेड jyoti@upl-ltd.com






