Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Pipeline: आता डायरेक्ट होणार Gas चा पुरवठा, देशात पसरणार 2500 किमी लांबीची एलपीजी पाइपलाइन

संपूर्ण भारतात ₹१२,५०० कोटी खर्च करून २,५०० किलोमीटर लांबीचे एलपीजी पाईपलाईन नेटवर्क टाकण्यात येणार आहे. याचा अर्थ आता स्वयंपाकाचा गॅस टँकरऐवजी पाईपलाईनद्वारे पोहोचवला जाईल

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 18, 2026 | 10:34 AM
LPG पाईपलाईनबाबत भारत सरकारचे मोठे पाऊल (फोटो सौजन्य - iStock)

LPG पाईपलाईनबाबत भारत सरकारचे मोठे पाऊल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • भारत सरकारने एकूण २,५०० किलोमीटर लांबीच्या चार प्रमुख एलपीजी पाइपलाइनच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे
  • या प्रकल्पात अंदाजे १२,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल
  • या पाइपलाइन चेरलापल्ली-नागपूर, शिक्रापूर-हुबळी-गोवा, पारादीप-रायपूर आणि झाँसी-सितारगंज या मार्गांवर बांधल्या जातील.
अमेरिका – इराण युद्धामुळे भारतातही गॅसचा तुटवडा सहन करावा लागला. १ महिना लोकांचे हाल झाले आणि आता परिस्थितीमुळे भारत सरकारने देशाच्या एलपीजी पुरवठा साखळीत पूर्णपणे परिवर्तन घडवून आणण्याच्या आणि ती अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) देशाच्या विविध भागांत पसरलेल्या २,५०० किलोमीटर लांबीच्या चार प्रमुख एलपीजी पाइपलाइनच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

या संपूर्ण प्रकल्पात अंदाजे १२,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. हे पाऊल का मोठे समजले जाते हेदेखील आपण आता जाणून घेऊया. बिझनेसच्या दृष्टीकोनातून आणि लोकांच्या हितासाठी हा निर्णय नक्कीच योग्य ठरू शकतो. 

स्वस्त आणि मस्त! आता Gas Cylinder ची गरज नाही, ‘या’ पर्यायाची बाजारात एन्ट्री

रस्त्यांवरील गॅस टँकर कमी करणे, अपघातांचा धोका कमी करणे

सध्या, एलपीजीचा मोठा भाग रिफायनरी आणि बंदरांपासून बॉटलिंग प्लांटपर्यंत मोठ्या टँकरद्वारे रस्त्याने वाहून नेला जातो. PNGRB च्या मते, रस्त्यावरील अपघातांचा धोका कमी करण्यासाठी पाइपलाइन हे वाहतुकीचे सर्वात सुरक्षित आणि विश्वसनीय साधन आहे. पाइपलाइनद्वारे गॅस पाठवल्याने केवळ वाहतूक खर्चच कमी होणार नाही, तर कार्बन उत्सर्जनही कमी होईल.

या चार प्रमुख पाइपलाइनवर काम सुरू आहे:

या धोरणात्मक उपक्रमांतर्गत, रिफायनरी आणि आयात टर्मिनलना थेट बॉटलिंग प्लांटशी जोडणारे चार प्रमुख मार्ग निश्चित करण्यात आले आहेत:

  • चेरलापल्ली – नागपूर पाइपलाइन
  • शिक्रापूर – हुबळी – गोवा पाइपलाइन
  • पारादीप – रायपूर पाइपलाइन
  • झांसी – सितारगंज पाइपलाइन
पुरवठा संकटाच्या काळात साठवणुकीचे काम करणे

या पाइपलाइन केवळ गॅसची वाहतूकच करणार नाहीत, तर गरजेच्या वेळी साठवणुकीची सुविधा म्हणूनही काम करतील. जर मध्य पूर्वेतील तणावामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, तर या पाइपलाइन देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत करतील.

हे पाऊल का आवश्यक आहे?

भारत आपल्या एलपीजीच्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. सध्या, नऊ LPG पाइपलाइन प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत, त्यापैकी या चार प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. बंदरांना थेट बॉटलिंग प्लांटशी जोडल्याने गॅस वितरणाची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता लक्षणीयरीत्या वाढेल.

आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार Tax; शेजारी देशाच्या नव्या निर्णयामुळे व्यापारावर मोठा परिणाम

Web Title: Lpg pipeline update expansion of 12500 crore investment in india lpg gas supply pngrb safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Business News
  • LPG Crisis
  • LPG Gas

संबंधित बातम्या

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
1

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
2

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…
3

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
4

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.