M1xchange (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) M1xchange (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
M1xchange हा भारतातला RBI ने मान्यता दिलेला TReDS प्लॅटफॉर्म आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, हा प्लॅटफॉर्म छोट्या उद्योगांचे बिल लवकर पैशात बदलून देतो. आता या प्लॅटफॉर्मवर दोन नवीन गोष्टी सुरू झाल्या आहेत. एक म्हणजे CGTMSE ची गॅरंटी आणि दुसरी म्हणजे स्मॉल-टू-स्मॉल म्हणजेच S2S फायनान्सिंग. या दोन गोष्टींमुळे महाराष्ट्रातल्या MSME उद्योगांना खूप फायदा होणार आहे. M1xchange Maharashtra
उद्यम पोर्टलवर बघितलं तर महाराष्ट्रात 1.20 कोटीपेक्षा जास्त MSME रजिस्टर आहेत. संपूर्ण देशात सगळ्यात मोठी संख्या आपल्याच राज्यात आहे. इथे मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, ऑटो पार्ट्स, औषधं बनवणाऱ्या कंपन्या, कापड उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर असे सगळ्या प्रकारचे उद्योग आहेत. त्यामुळे इथे खेळत्या भांडवलाची गरज पण खूप जास्त आहे.
M1xchange ने आधीपासूनच महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जे MSME जोडलेले आहेत त्यापैकी 18 टक्के एकट्या महाराष्ट्रातले आहेत. आणि जे मोठे कॉर्पोरेट्स आहेत त्यापैकी 20 टक्के पण महाराष्ट्रातलेच आहेत. या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 75 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे इनव्हॉइस महाराष्ट्रातूनच आले आहेत. आता कंपनीला मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई सारख्या औद्योगिक भागात अजून खोलवर जायचं आहे.
यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे TReDS वर आता CGTMSE ची गॅरंटी मिळणार आहे. M1xchange हा देशातला पहिला प्लॅटफॉर्म आहे ज्याने अशा गॅरंटीचा वापर करून व्यवहार पूर्ण करून दाखवला आहे.याचा फायदा असा की, बँका आणि फायनान्स कंपन्या आता जास्त आत्मविश्वासाने छोट्या उद्योगांना पैसे देतील. कारण त्यांना सरकारची गॅरंटी मिळतेय. इनव्हॉइस चेक करणं आणि गॅरंटी मिळवणं हे सगळं आता डिजिटल झालंय, त्यामुळे काम खूप फास्ट होतं.
आधी काय व्हायचं, फक्त मोठी कंपनी आणि छोटी कंपनी यांच्यातच बिलाचे व्यवहार व्हायचे. पण आता S2S मुळे छोटा उद्योग दुसऱ्या छोट्या उद्योगाचं बिल पण डिस्काउंट करू शकतो. म्हणजे एक MSME दुसऱ्या MSME कडून पैसे लवकर घेऊ शकतो.महाराष्ट्रात या S2S मधून आतापर्यंत 360 पेक्षा जास्त MSME ना 400 कोटी रुपयांचं फायनान्सिंग मिळालं आहे आणि 2600 पेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत
.याबद्दल बोलताना M1xchange चे S2S बिझनेस हेड मनीष अरोरा म्हणाले, “महाराष्ट्रात देशातली सगळ्यात मोठी आणि वैविध्यपूर्ण MSME इकोसिस्टम आहे. राज्याचं 1 ट्रिलियन डॉलरचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सप्लाय चेनच्या शेवटच्या घटकापर्यंत पैसा पोहोचला पाहिजे. CGTMSE आणि S2S या दोन्हीच्या मदतीने आम्ही अगदी छोट्यातल्या छोट्या पुरवठादारापर्यंत पोहोचू शकतो.”एकंदरीत बघायला गेलं तर M1xchange ने आतापर्यंत 3 लाख 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बिलांचे पैसे उद्योगांना मिळवून दिले आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 80 पेक्षा जास्त बँका, 15 हजार कॉर्पोरेट्स आणि 1 लाख 10 हजार MSME जोडलेले आहेत. आणि या सगळ्यात महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात मोठा असणार आहे.






