Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Tourism: महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड जगात पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रसिद्धीवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश

Maharashtra Tourism : महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी व नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 05, 2026 | 06:46 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड जगात पोहोचणार
  • त्यासाठी डिजिटल प्रसिद्धीवर भर
  • पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश
Maharashtra Tourism : महाराष्ट्राचा पर्यटन ( Maharashtra Tourism )  ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी, प्रभावी जनसंपर्क आणि नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव आधुनिक माध्यमांतून जगासमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

IndiGo Free Tickets : वाहह…! 20000 मोफत विमान तिकिटं देतंय इंडिगो, कुठे मिळणार ऑफरचा लाभ, काय आहे प्रोसेस?

शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन संचालनालयामार्फत सन २०२६-२७ या वर्षातील जनसंपर्क विभाग आणि सामाजिक माध्यमांअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे (भा.प्र.से.), पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे (भा.प्र.से.), पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता आकाश चकोर तसेच संबंधित मीडिया एजन्सींचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा

बैठकीत महाराष्ट्र पर्यटनाच्या प्रसिद्धी, जनसंपर्क आणि सामाजिक माध्यमांवरील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पर्यटकांना अचूक, विश्वासार्ह आणि आकर्षक माहिती वेळेत उपलब्ध करून देणे, पर्यटन विभागाची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट करणे तसेच राज्यातील पर्यटनस्थळांची देश-विदेशात प्रभावी प्रसिद्धी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा अधिक परिणामकारक वापर करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

महाराष्ट्राची पर्यटन क्षेत्रातील स्पर्धात्मक ओळख

यावेळी नाविन्यपूर्ण जनजागृती मोहिमा, दर्जेदार डिजिटल आशय निर्मिती, सामाजिक माध्यमांवरील प्रभावी धोरण, माध्यमांमधील समन्वय तसेच पर्यटनविषयक माहितीचे नियोजनबद्ध आणि वेळेवर प्रसारण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची वैशिष्ट्ये अधिक प्रभावीपणे पर्यटकांपर्यंत पोहोचविणे, राज्याचा पर्यटन ब्रँड अधिक सक्षम करणे आणि डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने महाराष्ट्राची पर्यटन क्षेत्रातील स्पर्धात्मक ओळख अधिक दृढ करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Top Woman Entrepreneurs In India: उद्योग जगतावर अधिराज्य गाजवतात ‘या’ महिला; ‘कँडेरे हुरुन इंडिया’ कडून यादी जाहीर

Web Title: Maharashtra tourism to boost global branding through digital media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Business News
  • Digital news
  • Marathi News
  • Shambhuraj Desai
  • tourism
  • Tourism news

संबंधित बातम्या

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
2

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
3

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
4

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.