Housing.com द्वारे मेगा होम उत्सव 2025 ची घोषणा
हाऊसिंग डॉटकॉम या देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मने आपल्या बहु-प्रतीक्षित वार्षिक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. “मेगा होम उत्सव २०२५” या प्रॉपर्टी फेस्टिव्हलची नववी आवृत्ती १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सणासुदीच्या काळात आयोजित केली जात आहे. या अनोख्या उपक्रमामुळे देशभरातील घर खरेदीदारांना योग्य मालमत्तांच्या खास ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवात मोठ्या प्रमाणावर प्रतिसादाची अपेक्षा आहे. मागील आवृत्तीत तब्बल ५३ मिलियनपेक्षा अधिक यूझर्सने सहभाग नोंदवला होता. यंदा ही संख्या ५५ मिलियन पार करेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यामुळे हाऊसिंग डॉटकॉम हे देशातील सर्वात विश्वासार्ह प्रॉपर्टी प्लॅटफॉर्म असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या डिजिटल फेस्टिव्हलमध्ये ३८०० हून अधिक विकासक आणि चॅनल पार्टनर्स सहभागी होत असून मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगळूर, पुणे, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या ३० पेक्षा जास्त शहरांचा समावेश आहे. या माध्यमातून खरेदीदारांना आपल्या पसंतीनुसार घर सहज शोधता येईल.
यंदा खरेदीदारांच्या अनुभवात भर घालण्यासाठी हाऊसिंग डॉटकॉमने अनेक नवे फीचर्स सादर केले आहेत. व्यक्तीविशिष्ट शिफारसी, स्मार्ट सर्च टूल्स, “हाऊसिंग शॉर्ट्स” सारखे आकर्षक व्हिडिओ फॉरमॅट्स आणि ऑडिओ वॉकथ्रू यामुळे घर शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेधक झाली आहे.
Piyush Goyal यांनी मोदींना दिले जीएसटी कपातीचे श्रेय; म्हणाले- ‘शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार’
या उपक्रमाबद्दल हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिस अमित मसलदान म्हणाले, “घर शोधणे ही प्रक्रिया तणावपूर्ण न राहता पारदर्शक आणि सोपी व्हावी हा आमचा उद्देश आहे. मेगा होम उत्सव २०२५ मधून आम्ही खरेदीदारांना बेजोड पर्याय, खास ऑफर्स आणि विश्वासार्ह यादी देत आहोत. हा उपक्रम म्हणजे केवळ एक इव्हेंट नसून विकासक, ब्रोकर्स आणि चॅनल पार्टनर्ससह केलेला एकत्रित प्रयास आहे. या माध्यमातून लाखो लोकांच्या स्वप्नातील घर खरेदीचा प्रवास अधिक सोपा आणि आत्मविश्वासपूर्ण होईल.”
फेस्टिव्हलमध्ये कासाग्रँड, हिरानंदानी डेव्हलपर्स, प्रेस्टीज ग्रुप, सोभा लिमिटेड, राहेजा, गेरा डेव्हलपमेंट्स, आशियाना, प्रॉव्हीडेन्ट हाऊसिंग, ॲसेट्झ, कल्पतरू यांसारखे नामांकित विकासक आपली प्रकल्पे सादर करत आहेत. खरेदीदारांसाठी आकर्षक ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, ॲसेट्झ प्रॉपर्टी ग्रुप निवडक घरांवर ३६ महिन्यांचा प्री-ईएमआय हॉलिडे देत आहे, तर टीजी डेव्हलपर्स 12 महिन्यांचा ईएमआय हॉलिडे ऑफर करत आहेत. ब्रिगेड ग्रुपने खरेदीदारांना फक्त 20% रक्कम आत्ता देऊन उर्वरित मार्च 2026 पर्यंत भरण्याची सुविधा दिली आहे. याशिवाय, “९६ अवर्स ऑफर” सारखे अल्पावधी लाभही उपलब्ध आहेत.