उलवे पोलिसांचे पथक रात्री पेट्रोलिंगसाठी निघाले असता, संविधान चौकाजवळ एका व्यक्तीच्या हातात पिस्तुल आढळले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ८ जिवंत काडतुसे मिळाली, तर पिस्तुलामध्ये ३ काडतुसे होती. चौकशीत समोर आले की, हे पिस्तूल विकास त्रिपाठी याचे असून, त्याच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचा परवाना आहे. मात्र हा परवाना केवळ उत्तर प्रदेश राज्यापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्र पोलिसांची परवानगी न घेता, तो हे पिस्तुल इथे घेऊन आला होता. आणि त्याने ते पिस्तुल प्रवीण पांडे याला ठेवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून कारसह सुमारे ६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.