• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Fake Recovery In Sugar Mills Farmers In Marathwada Raise Serious Allegations

Marathwada Sugar Factory Politics: मराठवाड्यात साखर उद्योगात खोट्या रिकव्हरीचा खेळ? शेतकऱ्यांचा संताप

रिकव्हरी कमी दाखवल्याने एफआरपी देण्याची प्रक्रिया उशिरते, दर कमी होतात आणि शेतकऱ्याऱ्यांना वर्षानुवर्षे थकबाकीसाठी कारखान्यांची धावपळ करावी लागते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 05, 2025 | 05:00 PM
Marathwada Sugar Factory Politics:

मराठवाड्यात साखर उद्योगात खोट्या रिकव्हरीचा खेळ? शेतकऱ्यांचा संताप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मराठवाड्यात उसापासून विष तयार होते काय-मराठवाड्यातील शेतकरी- कामगारांचा सवाल
  • नफ्यातील कारखानदारी ‘तोट्यात’ दाखविण्याचा उद्योग
  • केवळ शेतकऱ्यांना कमी भाव देण्यासाठी तयार केलेली थाप”
Nanded News: “पश्चिम महाराष्ट्रात उसापासून साखर तयार होते मग मराठवाड्यात उसापासून विष तयार होते काय?” असा सवाल आज मराठवाड्यातील शेतकरी व सहकारी क्षेत्रातील कामगारवर्गात जोरदार चर्चेत आहे. कारण साखर उद्योगातील ‘खोट्या रिकव्हरी’च्या आरडाओरडीमागे स्वतः साखर कारखानदारच असल्याचा आरोप समोर येत आहे.

इथेनॉल प्रकल्प, व्यवस्थापनातील अपारदर्शकता, नफ्यातील व्यवहार तोट्यात दाखविण्याचा उद्योग आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशावर गंडा घालण्याचे कारनामे, यामुळे मराठवाड्यातील साखर उद्योगाचे काळे अध्याय पुन्हा समोर आले आहेत.

थंडीत भाज्यांना नाकारून कसं चालेल, राजस्थानी स्टाईलची ‘बेसन पालक भाजी’ खाल तर बोटंच चाटत रहाल

इथेनॉल प्रकल्प जोडल्यानंतर रिकव्हरी कमी? की हेतूपुरस्सर प्रचार ?

अवघ्या काही वर्षांत साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर मराठवाड्यातील बहुतेक कारखानदारांनी शेकडो कोटींची गुंतवणूक करून हे प्रकल्प सुरू केले. इथेनॉल उत्पादन हे साखरेपेक्षा अधिक नफ्याचे असल्यामुळे अनेकांनी गुपचूप या क्षेत्राकडे मोर्चा वळवला. मात्र, आता काही कारखानदारांच्याच तोंडून “इथेनॉलमुळे साखरेची रिकव्हरी कमी होते” अशी ओरड सुरू झाली आहे.

उद्योगतज्ज्ञांच्या मते, उसातून प्रथम रस काढून साखर निर्मिती होते आणि उर्वरित गाळपातून इथेनॉल तयार केले जाते. त्यामुळे रिकव्हरी कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया नसून “केवळ शेतकऱ्यांना कमी भाव देण्यासाठी तयार केलेली थाप” आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, इथेनॉल प्रकल्प आमचाच, साखर कारखाना आमचाच मग नुकसान कोण करतंय? स्वतःच्याच कारखान्यावर आरोप करून आमचा हक्क पळवायचा हा प्रकार आता उघड होऊ लागला आहे.”

Akola: कासवगतीचा इंटरनेट स्पीड; मोबाइल नेटवर्क कोलमडल्याने नागरिकांचे ऑनलाइन व्यवहार खोळंबले!

नफ्यातील कारखानदारी ‘तोट्यात’ दाखविण्याचा उद्योग

मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांची गेल्या पाच वर्षांची बॅलन्सशीट पाहिली तर इथेनॉल विक्री, बॅगॅस, प्रेसमड आणि पॉवर जनरेशनमधून प्रचंड नफा दिसून येतो. तरीही वार्षिक सभांमध्ये, सरकारसमोरील अहवालांमध्ये आणि शेतकऱ्यांसमोर मात्र “तोटा, कमी रिकव्हरी, मंदी” अशा कारणांचा पाढा वाचला जातो.

एफआरपी उशिरा, दर कमी, बोनसचा प्रश्न कायम

रिकव्हरी कमी दाखवल्याने एफआरपी देण्याची प्रक्रिया उशिरते, दर कमी होतात आणि शेतकऱ्याऱ्यांना वर्षानुवर्षे थकबाकीसाठी कारखान्यांची धावपळ करावी लागते. इथेनॉलमध्ये दरवर्षी प्रचंड वाढलेली उत्पादनक्षमता आणि केंद्र सरकारकडून मिळणारी हमीभावाची खात्री लक्षात घेता, अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, “जर उद्योग इतका फायदेशीर आहे तर शेतकऱ्याना योग्य मोबदला देण्यात कंजूषी का? सरकार व सहकार विभागाची भूमिका प्रश्नचिन्हात अनेक वेळा कारखानदार राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असल्याने रिकव्हरी चाचणी, लेखापरीक्षण आणि इथेनॉल उत्पादनाचा अहवाल तपासणारे अधिकारीही मूकदर्शक राहतात, कारखानदारांच्या दडपणाखाली अनेक तथ्ये दडवली जातात, अशी टीका शेतकरी संघटनांनी केली आहे.

मराठवाड्यातील साखर उद्योग हा आजही मोठा रोजगारदाता व अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा स्तंभ आहे. पण नफ्यातील उद्योग पुन्हा-पुन्हा तोट्यात दाखवला जात असेल, इथेनॉलच्या नावाखाली रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर हा प्रश्न उभा राहतो. मराठवाड्यात उसापासून साखरव तयार होते पण खोट्या आकड्यांमुळे तोट्याचे विष कोण पाजत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार? चव्हाणांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा खळबळजनक

विश्लेषणानुसार संपूर्ण खेळ तीन टप्प्यांत चालतो

साखरेची वास्तविक रिकव्हरी लपविणे.

इथेनॉलमधील नफा वेगळ्या अकाउंटमध्ये दाखवणे,

कारखाना तोट्यात दाखवून शेतक-यांना कमी एफआरपी देणे किवा उशिराने देणे.

या युक्तीमुळे कारखानदाराना कोट्यवधीचा फायदा होतो, तर शेतक-यांच्या घासावर डोळा ठेवला जातो, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. ‘उंदराला मांजर साक्ष’ साखर उद्योगातील दुटप्पी भूमिका मराठवाड्यातील काही साखर कारखान्यांमध्ये इटिपी ( दूषित पाणी शुद्धीकरण प्रकल्प), ईथेनॉल निर्मिती प्लांट आणि साखर निर्मिती हे एकाच गटाच्या मालकीचे आहेत, त्यामुळे खरे नुकसान झाले तरी ते घरातच जमा होते, पण बाहेर मात्र शेतकऱ्यांना तोट्याची भीती दाखवून कमी दर, बोनस न देणे किया शेतकऱ्यांना कर्जाच्या फेऱ्यात अडकवणे असा प्रकार सुरू आहे.

स्थानिक पातळीवर हेच कारखानदार राजकीय पातळीवर स्वतः साठी सुविधा, अनुदान, वीजदरात सवलत, व्याजमाफी अशा मागण्या करतात आणि साखर उद्योग संकटात असा सूर लावतात, यावर एका शेतकऱ्याचे बोलके विधानही चर्चेत आहे.

साखर कारखाना आमचा तोट्यात, पण कारखानदारांची बंगले, वाहने, निवडणुका घडतो?” मात्र रोज वाढत्या नफ्यात हा चमत्कार कसा घडतो?

 

 

Web Title: Fake recovery in sugar mills farmers in marathwada raise serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 05:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हेमा मालिनी यांना लागला ‘दुसरी बायकोचा’ टॅग, तरीही धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा का घेतला निर्णय?

हेमा मालिनी यांना लागला ‘दुसरी बायकोचा’ टॅग, तरीही धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा का घेतला निर्णय?

Dec 05, 2025 | 05:12 PM
Satara News : मतपेट्या सीलबंद करण्यावर आक्षेप, तातडीने दुरुस्तीची मागणी; अपक्ष उमेदवारांचा प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज

Satara News : मतपेट्या सीलबंद करण्यावर आक्षेप, तातडीने दुरुस्तीची मागणी; अपक्ष उमेदवारांचा प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज

Dec 05, 2025 | 05:06 PM
Simone Tata: पंतप्रधान नेहरूंने केलेले आवाहन आणि भारतीय सौंदर्य उद्योगाला नवा चेहरा देणाऱ्या उद्योजिका सिमोन टाटा कोण होत्या?

Simone Tata: पंतप्रधान नेहरूंने केलेले आवाहन आणि भारतीय सौंदर्य उद्योगाला नवा चेहरा देणाऱ्या उद्योजिका सिमोन टाटा कोण होत्या?

Dec 05, 2025 | 05:06 PM
प्रीमियम लूक आणि किंमत 2 लाखांच्या आत! Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट झाला लाँच

प्रीमियम लूक आणि किंमत 2 लाखांच्या आत! Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट झाला लाँच

Dec 05, 2025 | 05:01 PM
संसदेत ‘डिलिव्हरी बॉईज’चा मुद्दा; राघव चढ्ढा म्हणाले, ‘त्यांची स्थिती रोजंदारी कामगारांपेक्षाही वाईट’

संसदेत ‘डिलिव्हरी बॉईज’चा मुद्दा; राघव चढ्ढा म्हणाले, ‘त्यांची स्थिती रोजंदारी कामगारांपेक्षाही वाईट’

Dec 05, 2025 | 05:00 PM
Marathwada Sugar Factory Politics: मराठवाड्यात साखर उद्योगात खोट्या रिकव्हरीचा खेळ? शेतकऱ्यांचा संताप

Marathwada Sugar Factory Politics: मराठवाड्यात साखर उद्योगात खोट्या रिकव्हरीचा खेळ? शेतकऱ्यांचा संताप

Dec 05, 2025 | 05:00 PM
Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

Dec 05, 2025 | 04:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.