Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरणकडून महत्त्वाची बातमी! राज्यात बसवले 1.14 कोटी स्मार्ट मीटर, घरगुती ग्राहकांना प्रति युनिट मिळणार तब्बल ‘इतकी’ सवलत

राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील ४७.३१ टक्के वीज ग्राहक स्मार्ट मीटरिंग यंत्रणेशी जोडले गेले आहेत. सर्वाधिक ४३ लाख ३ हजार ३०३ स्मार्ट मीटर बसवून कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 03, 2026 | 03:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील ४७.३१ टक्के वीज ग्राहक स्मार्ट मीटरिंग यंत्रणेशी जोडले गेले आहेत. सर्वाधिक ४३ लाख ३ हजार ३०३ स्मार्ट मीटर बसवून कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  या मोहिमेचं नेमकं काय आहे महत्त्व जाणून घेऊयात.

स्मार्ट मीटरची मोहीम का?

महावितरणच्या माहितीनुसार, ग्राहकांना अचूक बिलिंग, वीज वापरावर नियंत्रण आणि ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) सवलतीचा लाभ मिळावा यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. ही मीटरे ग्राहकांना कोणतेही शुल्क न आकारता बसवून दिली जात आहेत.

यंत्रणेची महत्त्वाची भूमिका

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना दर तासाला त्यांच्या मोबाईलवरील अॅपच्या माध्यमातून घरातील किंवा कार्यालयातील वीज वापराची माहिती मिळते. त्यामुळे वीज वापराचे नियोजन करणे सोपे होत असून अनावश्यक वापर टाळण्यास मदत होत आहे. तसेच वीज वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्याबरोबरच वीजगळती रोखण्यातही या यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

टीओडी’ सवलत म्हणजे काय :

विजेचा वापर कोणत्या वेळेला झाला? त्यानुसार वीजदरात सवलत देण्याला टाईम ऑफ डे (टीओडी) सवलत
म्हणतात. स्मार्ट मीटरमध्ये अशा प्रकारे वेळेनुसार वीजवापर मोजण्याची सुविधा आहे. ग्राहकांनाही त्यांच्या मोबाईल फोनमधील अॅपमध्ये दर तासाला घरात अथवा कार्यालयात किती वीज वापर होत आहे, हे समजते. स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांनाही टीओडी सवलत सुरू केली आहे.

घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८० पैशांची सवलत:

स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसाच्या ठरावीक कालावधीत झालेल्या वीज वापरावर प्रति युनिट ८० पैशांपर्यंत टीओडी सवलत दिली जात आहे. याशिवाय औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत होणाऱ्या वीज वापरासाठी वीजदरात सवलतीचा लाभ मिळत आहे.
महावितरणच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग, वीज वापरावरील नियंत्रण आणि सवलतीच्या दरांचा लाभ मिळत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.

“स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिलिंग, वीज वापराचे रिअल-टाइम निरीक्षण आणि ‘टाइम ऑफ डे’ (टीओडी) सवलतीचा लाभ मिळत आहे. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ८० पैशांपर्यंत सवलत मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असून राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला चांगला वेग मिळाला आहे”, असं विधान महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केलं आहे.

चौकट:
कोणत्या भागात किती स्मार्ट मीटर :
छ. संभाजीनगर झोन. ४,८१,२६१
लातूर झोन. ५,०६,६७५
नांदेड झोन. ३,५३,५८०
छ. संभाजीनगर विभाग. ,४१,५१६
भांडूप झोन. १०,४०,३६५
जळगाव झोन. ६,५९,५६७
कल्याण झोन. १४,८६,३२२
रत्नागिरी झोन. ३,२८,५६९
नाशिक झोन. ७,८८,४८०
कोकण विभाग. ४३,०३,३०३
अकोला झोन. ४,०६,९०९
अमरावती झोन. ४,०७,३९४
चंद्रपूर झोन. ३,७५,७७२
गोंदिया झोन. ३,३२,५७५
नागपूर झोन. ७,२२,७१६
नागपूर विभाग. २२,४५,३६६
बारामती झोन. १०,२२,७११
कोल्हापूर झोन. ११,५७,०९५
पुणे झोन. १३,७४,७७२
पुणे विभाग. ३५,५४,५७८

Web Title: Msedcl smart meter installation crosses 1 crore tod bill discount marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Business News
  • electricity
  • Electricity Bill
  • Electricity Rate
  • Marathi News
  • smart meter

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi:  एशियन गेम्समध्ये भारताला दोन रौप्य पदके
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: एशियन गेम्समध्ये भारताला दोन रौप्य पदके

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
2

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
3

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
4

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.