1.77 लाखाचे झाले 984 कोटी रुपये, 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदार अल्पावधीत मालामाल!
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगलेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच आता एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना थोडाथीडका नाही तर तब्बल कोट्यवधींचा परतावा मिळवून दिला आहे. एल्सिड इन्वेस्टमेंट्स लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून, या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच 900 कोटी रुपयांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.
50,000 शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे
मुंबई शेअर बाजारामध्ये (बीएसई) सूचीबद्ध असलेल्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सहा महिन्यांत तब्बल 55,751 पट परतावा मिळवून दिला आहे. सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस, कंपनीकडे केवळ 322 सार्वजनिक भागधारक होते. त्यात सहा प्रवर्तक जोडल्यास, एकूण भागधारकांची संख्या 328 होते. तर कंपनीचे बाजार भांडवल 3,804 कोटी रुपये आहे. कंपनीतील केवळ 50,000 शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत, ज्यांच्याकडे कंपनीत 25 टक्के हिस्सा आहे. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे शेअर्स असलेले 284 किरकोळ गुंतवणूकदार, ज्यांचे कंपनीत 7.43 टक्के हिस्सा आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये किरकोळ भागधारकांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही.
1.77 लाखाचे झाले 984 कोटी रुपये
आपण ज्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. त्याची अलीकडेच खूप चर्चा होत आहे. हा भारतातील सर्वात महागडा शेअर आहे. ज्याचे नाव एलसिड इन्व्हेस्टमेंट शेअर्स असे आहे. गेल्या जून महिन्यामध्ये हा शेअर केवळ 3.53 रुपयांवर होता. या कंपनीत 322 सार्वजनिक भागधारकांकडे केवळ 1.77 लाख रुपयांचे शेअर्स होते. आज त्यांचे मूल्य तब्बल 984 कोटी रुपये आहे.
2024 या वर्षातील या शेअरची पहिली ट्रेडिंग 21 जून रोजी झाली. 2023 मध्ये फक्त दोन दिवस आणि 2021 मध्ये नऊ दिवस व्यापार झाला. गेल्या काही वर्षांत हा शेअर 2.00-3.50 रुपये प्रति शेअर या दराने व्यापार करत होता. परंतु एल्सिड इन्वेस्टमेंट्स किमान 2006 पासून एशियन पेंट्स लि.च्या प्रवर्तकांपैकी एक आहे. 30 सप्टेंबरपर्यंत पेंट्स निर्मात्यामध्ये 2.95 टक्के हिस्सा होता. किंवा 2.5 टक्के 83,13,860 समभाग होते.
गुरुवारी (ता.१९) एकट्या एशियन पेंट्सच्या या 2,83,13,860 शेअर्सचे मूल्य 6,490 कोटी रुपये इतके राहिले. याशिवाय, त्याच्या दोन उपकंपन्या मुरहर इन्व्हेस्टमेंट्स अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड आणि सुप्तस्वार इन्व्हेस्टमेंट्स अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड यांनी दुसऱ्या तिमाहीत एशियन पेंट्समध्ये अनुक्रमे 0.60 टक्के आणि 0.68 टक्के हिस्सेदारी ठेवली होती. 2023-24 च्या वार्षिक अहवालानुसार, या दोन भागांची किंमत 2,818 कोटी रुपये आहे. ते अधूनमधून व्यापार करत होते. कारण तेथे खरेदीदार होते, परंतु विक्रेते नव्हते.
29 ऑक्टोबर रोजी विशेष लिलावाचे आयोजन
सेबीने याची दखल घेतली आणि काही सूचीबद्ध आयसी आणि आयएचसीमध्ये अनियमितपणे व्यवहार होत असल्याचे सांगून जूनमध्ये सूचीबद्ध गुंतवणूक कंपन्या आणि गुंतवणूक धारण करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्ससाठी विशेष कॉल लिलाव जाहीर केले. विशेष लिलावानंतर त्याच्या शेअरची किंमत सध्याच्या मूल्यावर आली आहे. विशेष लिलावात सूचीबद्ध झाल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी अल्सिड इन्व्हेस्टमेंट्सने जवळपास 67,000 टक्क्यांनी उडी घेतली आहे. ती 2,36,250 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत, शेअरने 3,32,399.95 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. परंतु नंतर काही सुधारणा दिसून आल्या आहे.