Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Lottery Results: म्हाडा सोडतीचा मोठा दिवस! 2,640 सदनिकांचा निकाल घरबसल्या LIVE पाहा

MHADA Lottery Results: मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी MHADA मुंबई मंडळाच्या 2026 गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत आज पार पडत आहे. या योजनेत 2,640 सदनिकांचा समावेश असून, हजारो अर्जदारांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 06, 2026 | 02:22 PM
MHADA Lottery Results: म्हाडा सोडतीचा मोठा दिवस!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

MHADA Lottery Results: म्हाडा सोडतीचा मोठा दिवस!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Mumbai MHADA Lottery Results 2026: मुंबईत स्वतःच्या घराची वाट पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) मुंबई मंडळाच्या 2026 गृहनिर्माण योजनेतील 2,640 घरांची संगणकीय सोडत आज पार पडत आहे. या सोडतीकडे राज्यभरातील अर्जदारांचे लक्ष लागले असून, अनेकांच्या आयुष्यात आज आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

यंदाच्या योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच हजारो लोकांनी नोंदणी केली. अंतिम आकडेवारीनुसार 97 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यापैंकी आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या 69 हजारांपेक्षा जास्त अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीत आपला सहभाग निश्चित केला.

‘या’ ठिकाणी होणार सदनिकांची सोडत

आजची सोडत मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात दुपारी आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया संगणकीय पद्धतीने आणि पारदर्शक प्रणालीद्वारे पार पडणार आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्या अर्जदारांसाठी थेट प्रक्षेपणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या प्रत्येकाला निकाल पाहता येणार आहे.

सोडतीचा निकाल जाहीर होताच अर्जदारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज क्रमांकाच्या मदतीने आपले नाव तपासता येईल. त्यामुळे निकालासाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. (MHADA Lottery Results:)

‘या’ भागासाठी सदनिकांचा महत्त्वाची

यंदाच्या योजनेत मुंबईतील अनेक महत्त्वाच्या भागांतील सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. दादर, वांद्रे, वडाळा, चेंबूर, पवई, गोरेगाव, विक्रोळी, बोरीवली, गोराई आणि घाटकोपरसारख्या परिसरात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या उत्पन्न गटातील नागरिकांना आपल्या बजेटनुसार घर मिळण्याची संधी आहे.

Share Market Opening: RBI च्या निर्णयाने बदलला बाजारचा मूड, Sensex मध्ये 160 अंकांची उसळी

घरांची किंमत काही कोटी रुपयांपर्यंत

या गृहनिर्माण योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांपासून उच्च उत्पन्न गटापर्यंत सर्वांसाठी पर्याय उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तुलनेने कमी किमतीची घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी मोठ्या आकाराच्या आणि अधिक सुविधायुक्त सदनिकांचाही समावेश करण्यात आला आहे. काही घरांची किंमत काही कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याने विविध आर्थिक स्तरातील नागरिकांना या योजनेत स्थान मिळाले आहे.

घरांसाठी काहीकाळ प्रतिक्षा

मात्र, या घरांपैकी सर्व घरे तातडीने ताब्यात मिळणार नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, अनेक सदनिका अद्याप बांधकामाच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे सोडतीत नाव लागलेल्या काही लाभार्थ्यांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. तरीही मुंबईसारख्या शहरात तुलनेने परवडणाऱ्या दरात घर मिळण्याची संधी असल्यामुळे नागरिकांमध्ये या योजनेबद्दल मोठी उत्सुकता आहे.

Oil Company: 8 मोठ्या तेल कंपन्यांना तब्बल रू. 8,18,00,00,00,00,000 चा 3 महिन्यात नफा, जगाचे डोळेच विस्फारले

अनेकांसाठी मोठा आधार

गेल्या काही वर्षांत मुंबईतील घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वतःचे घर घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे MHADA च्या गृहनिर्माण योजना अनेकांसाठी मोठा आधार ठरत आहेत. विशेषतः पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही योजना आशेचा किरण मानली जाते.

आजची सोडत अनेकांच्या नशिबाचा निर्णय घेणार आहे. ज्यांचे नाव यादीत येईल त्यांच्यासाठी घराचे स्वप्न साकार होण्याची सुरुवात होईल, तर इतर अर्जदार पुढील योजनांची वाट पाहतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, मुंबईत स्वतःच्या घरासाठी MHADA ची लॉटरी आजही सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि महत्त्वाचा पर्याय मानली जाते.

Web Title: Mumbai mhada lottery results 2026 watch live results draw status

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • MHADA Homes
  • MHADA Houses
  • MHADA Lottery 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.