Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर! जाहिराती, हॉटेल्स अन्…अब्जाधीश फुटबॉल स्टार्सच्या कमाईचा काय फॉर्म्युला?

फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या निमित्ताने संपूर्ण जगात फुटबॉलचा फिव्हर पाहायला मिळत आहे. मात्र, मैदानावरील गोल आणि टॅकलशिवाय फुटबॉलर्सवर होणारा अब्जावधी रुपयांचा वर्षाव हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. खेळाडूंची केवळ क्लब सॅलरीच नाही, तर मैदानाबाहेरील बिझनेस आणि ब्रँड एंडोर्समेंट्स हे त्यांच्या अफाट संपत्तीचे खरे रहस्य आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 13, 2026 | 07:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर!
  • जाहिराती, हॉटेल्स अन्…
  • ब्जाधीश फुटबॉल स्टार्सचा कमाईचा फॉर्म्युला
FIFA World Cup चं क्रेझ सध्या शिगेला पोहोचलं आहे. जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचत आहेत तसतशी उत्सुकता आणखीनच वाढत आहे. पण फुटबॉल हा केवळ जगातील सर्वात लोकप्रिय खेळच नाही, तर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळांपैकीही एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील अव्वल फुटबॉलपटू हे केवळ फुटबॉल खेळण्यापलीकडेही कमाई करतात? नेमके कोणते मार्ग आहेत ज्यामुळे हे खेळाडू इतके अब्जाधीश आहे. नेमके कोणते खेळाडू आहेत जे या लिस्टमध्ये पहिल्या काही नंबरवर येतात जाणून घेऊया.

Tata Motors चा मोठा धमाका! ‘कौशल्य’ उपक्रमातून 23000 तरुणांना ट्रेनिंग; 5000 पेक्षा जास्त जणांना मिळाली रोजगाराची संधी

जगातील अव्वल फुटबॉलपटू हे केवळ फुटबॉल खेळामुळेच अब्जावधीश बनले नाहीत. तर त्यापलीकडे त्यांचे वेगवेगळे स्त्रोत आहेत. श्रीमंत फुटबॉलपटू व्यवसाय, ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया आणि गुंतवणुकीतूनही कमाई करतात. अनेक खेळाडूंच्या स्वतःच्या कंपन्या आहेत, ज्यातून ते दरवर्षी लाखो आणि अब्जावधी रुपये कमावतात.

१. क्रिस्टियानो रोनाल्डो

क्रिस्टियानो रोनाल्डोचा उल्लेख केल्याशिवाय जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलपटूंबद्दल चर्चा करणे अशक्य आहे. सौदी क्लब अल-नस्रकडून खेळणारा रोनाल्डो दरवर्षी अब्जावधी रुपये कमावतो. फुटबॉलच्या पलीकडे, रोनाल्डो नायकीसोबतचा आजीवन करार, CR7 ब्रँड, सोशल मीडिया प्रमोशन, फिटनेस आणि हेल्थ व्यवसाय, तसेच हॉटेल्स आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून कमाई करतो.

२. लियोनेल मेस्सी

अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी केवळ मैदानावरच नव्हे, तर कमाईच्या बाबतीतही एक नेता आहे. इंटर मियामीकडून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त, तो अनेक मोठ्या ब्रँड्सकडून कमाई करतो. मेस्सी केवळ मैदानावर खेळत नाही, तर तो ॲडिडास, ॲपलसोबतचे मोठे करार, MLS स्ट्रीमिंग रेवेन्यू शेअर, पेप्सी, लेज आणि गेटोरेडसोबतचे ब्रँड करार आणि त्याच्या हॉटेल व्यवसायातूनही कमाई करतो. मेस्सी आलिशान मालमत्तांमधील गुंतवणुकीतूनही कमाई करतो.

३. नेमार ज्युनियर

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार त्याच्या जीवनशैली आणि ब्रँड व्हॅल्यूसाठी प्रसिद्ध आहे. मैदानाबाहेरील त्याची कमाईही प्रचंड आहे. नेमारचा प्यूमासोबत कोट्यवधी डॉलर्सचा करार आहे आणि तो रेड बुलसारख्या इतर अनेक जागतिक ब्रँड्सच्या जाहिरातीतूनही कमाई करतो. याशिवाय, सोशल मीडिया प्रमोशन, गेमिंग आणि ई-स्पोर्ट्समधील गुंतवणूक हे देखील नेमारच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.

४. किलियन एम्बाप्पे

फ्रान्सचा तरुण स्टार एम्बाप्पेला जगातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्याचे ब्रँड मूल्य झपाट्याने वाढत आहे. तो नायकीच्या जाहिराती, हब्लॉट आणि ओकलेसारख्या ब्रँड्ससोबतची भागीदारी, व्हिडिओ गेम्स, तसेच जाहिरात आणि गुंतवणुकीतून भरीव उत्पन्न मिळवतो.

५. करीम बेन्झेमा

सौदी अरेबियामध्ये खेळल्यानंतर बेन्झेमाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. तो ॲडिडाससारख्या अनेक लक्झरी ब्रँड्सचे एंडोर्समेंट करतो आणि मालमत्तेतही गुंतवणूक करतो. सोशल मीडिया प्रमोशनमधूनही त्याच्या उत्पन्नात भर पडते.

मैदानाबाहेरील कमाई का वाढतेय?

आज फुटबॉलपटू केवळ खेळाडू नाहीत, तर जागतिक ब्रँड आहेत. लाखो फॉलोअर्स असल्यामुळे, कंपन्या त्यांच्यासोबत जाहिरात करण्यास उत्सुक आहेत. यामुळेच अनेक खेळाडू त्यांच्या मैदानातील कमाईपेक्षा व्यवसाय, ब्रँड डील्स आणि सोशल मीडियामधून जास्त कमाई करत आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कापूस लागवडीसाठी सरकारकडून मिळणार तब्बल ‘इतकी’ मदत; जाणून घ्या कोण करु शकतं अर्ज?

Web Title: Fifa world cup 2026 richest footballers and their off field earnings see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Business News
  • Cristiano Ronaldo
  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • Instagram followers
  • Lionel Messi
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
1

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर
2

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!
3

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज
4

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.