Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ONGC कडून प्रोजील ग्रीन एनर्जीला 2,000 कोटी रुपयांहून अधिकचा पवन ऊर्जा प्रकल्प; IPO पूर्वी मोठी कामगिरी

नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील Prozeal Green Energy ला Oil and Natural Gas Corporation (ONGC) कडून 2,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा 250 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प मिळाला आहे. या प्रकल्पासाठी कंपनीला अधिकृत 'नोटिफिकेशन ऑफ अवॉर्ड' (NOA) प्राप्त झाले असून तो IPO पूर्वीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2026 | 05:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील वेगाने प्रगती करणाऱ्या Prozeal Green Energy ला देशातील आघाडीची ऊर्जा कंपनी Oil and Natural Gas Corporation (ONGC) कडून 2,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ONGC साठी भारतात 250 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह आणि ISTS-कनेक्टेड पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम प्रोजील ग्रीन एनर्जीकडे सोपविण्यात आले आहे. या संदर्भात ONGC कडून कंपनीला अधिकृत ‘नोटिफिकेशन ऑफ अवॉर्ड’ (NOA) प्राप्त झाले आहे. आगामी IPO च्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा मोठा प्रकल्प प्रोजील ग्रीन एनर्जीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे कंपनीची भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील प्रमुख ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाने आपल्या नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पासाठी प्रोजीलवर दाखवलेला विश्वास हा कंपनीच्या अभियांत्रिकी कौशल्य, प्रकल्प अंमलबजावणी क्षमता आणि उद्योगातील विश्वासार्हतेचा पुरावा आहे. या प्रकल्पामध्ये केवळ पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीच नव्हे तर संपूर्ण अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) कामांचा समावेश आहे.

अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम?

विशेष म्हणजे, हा प्रकल्प प्रोजील ग्रीन एनर्जीचा युटिलिटी-स्केल पवन ऊर्जा क्षेत्रातील पहिला मोठा प्रवेश ठरणार आहे. याआधी कंपनीने प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. आता पवन ऊर्जा क्षेत्रातही कंपनीने पाऊल टाकल्याने तिच्या व्यवसायाच्या विस्ताराला नवे परिमाण मिळणार आहे. या कंत्राटामध्ये प्रकल्प उभारणीनंतर 10 वर्षांसाठी व्यापक ऑपरेशन आणि मेंटेनन्स (O&M) सेवांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेची जबाबदारीही कंपनीकडे राहणार आहे. अशा प्रकारच्या दीर्घकालीन करारामुळे कंपनीला स्थिर महसूल मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.

भारत सरकारने स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांसाठी नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्पांची संख्या वाढत असून मोठ्या उद्योगसमूहांकडूनही हरित ऊर्जेकडे कल वाढताना दिसत आहे. ONGC सारख्या ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनीकडून मिळालेला हा प्रकल्प देशाच्या हरित ऊर्जा संक्रमणाला गती देणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे. प्रोजील ग्रीन एनर्जीने या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, “ऊर्जा सुरक्षित आणि पर्यावरणपूरक भारत घडविण्याच्या दिशेने हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक टर्बाइनसोबत अधिक हरित भविष्य घडविण्याचे आमचे ध्येय कायम राहील,” असे म्हटले आहे.

मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा

या करारामुळे कंपनीची ऑर्डर बुक मजबूत होण्यास मदत होणार असून, आगामी IPO पूर्वी गुंतवणूकदारांमध्ये कंपनीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधींचा फायदा घेण्यासाठी कंपनी सज्ज असल्याचेही या प्रकल्पातून स्पष्ट होत आहे.

Web Title: Ongc awards wind energy project worth over 2000 crore to prozeal green energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Business News
  • IPO

संबंधित बातम्या

RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय?
1

RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय?

मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा
2

मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा

अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम?
3

अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम?

Petrol News: खुशखबर! पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा
4

Petrol News: खुशखबर! पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.