Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oracle Layoffs 2026: एक ईमेल अन् 30000 कर्मचाऱ्यांना काढलं कामावरून, काय आहे ‘या’ कंपनीचं नवं धोरण?

Oracle Layoffs 2026: आयटी क्षेत्रात नोकरकपातीचे प्रमाण प्रचंड वाढले असताना आता आणखी एका आयटी कंपनीने तब्बल 30000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2026 | 02:34 PM
एक ईमेल अन् 30000 कर्मचाऱ्यांना काढलं कामावरून, काय आहे 'या' कंपनीचं नवं धोरण?

एक ईमेल अन् 30000 कर्मचाऱ्यांना काढलं कामावरून, काय आहे 'या' कंपनीचं नवं धोरण?

Follow Us
Follow Us:
  • एक ईमेल अन् 30000 कर्मचाऱ्यांना काढलं कामावरून
  • काय आहे ‘या’ कंपनीचं नवं धोरण
  • आयटी उद्योगात खळबळ
Oracle Layoffs 2026 News IN Marathi: जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. ओरॅकलने आपल्या जगभरातील कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांना एका ईमेलद्वारे अचानकपणे याची माहिती देण्यात आली, ज्यामध्ये आज त्यांचा शेवटचा कामाचा दिवस असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. या निर्णयामुळे आयटी उद्योगात खळबळ उडाली आहे.

अमेरिकन आयटी कंपनी ओरॅकलने जगभरात अंदाजे 30,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या कर्मचारी कपातीचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशातील अंदाजे 12,000 कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. शिवाय, कंपनी एका महिन्याच्या आत कर्मचारी कपातीची दुसरी फेरी पार पाडण्याची शक्यता आहे. ओरॅकलचे भारतात अंदाजे 30,000 कर्मचारी आहेत. प्रभावित कर्मचाऱ्यांनुसार, कंपनीने त्यांना ईमेलद्वारे कळवले की काही संघटनात्मक बदल केले जात आहेत. त्यात म्हटले आहे, “या बदलांमुळे, कामकाज सुव्यवस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आणि दुर्दैवाने, तुम्ही सध्या भूषवत असलेले पद रद्द केले जाईल.”

New Rules From 1 April 2026 : ATM कॅश काढण्याच्या लिमिटमध्ये बदल, F&O ट्रेडिंग आता पडणार महाग, जाणून घ्या नवे नियम

ईमेलमध्ये काय म्हटलं?

ओरॅकलने ईमेलमध्ये म्हटलं की, ज्या कर्मचऱ्यांना कामावरून कमी केले, त्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीने सांगितले की, कंपनीमध्ये संघटनात्मक बदल करण्यात येत असून ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम करण्यासाठी काही पदे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांची पदे redundant (अनावश्यक) ठरत असल्याचे कंपनीने मत आहे. दरम्यान, कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने काही आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

अमेरिकेत नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक भारतीय

मिळालेल्या माहितीनुसार, ओरॅकलचे माजी कर्मचारी मेरुगु श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत काम करणाऱ्या बहुतेक भारतीय कर्मचाऱ्यांवर या कर्मचारी कपातीचा परिणाम झाला आहे. याचे कारण असे की, अमेरिकन नागरिकांना कामावरून काढून टाकण्याच्या बाबतीत अमेरिकेतील स्थानिक कामगार कायदे अधिक कठोर आहेत. भारतातील १६ तासांच्या कामाच्या शिफ्टला विरोध केल्यामुळे श्रीधर यांना गेल्या सप्टेंबरमध्ये कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. ब्लूमबर्गने एका अहवालात असा अंदाज वर्तवला आहे की, मार्च २०२६ पर्यंत ओरॅकलमधील हजारो नोकऱ्या कमी होऊ शकतात. कंपनी मोठ्या प्रमाणावर आपले एआय डेटा सेंटर विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे कंपनीला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे.

या प्रकरणाशी संबंधित लोकांचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, ही कर्मचारी कपात ओरॅकलच्या सर्व विभागांवर परिणाम करेल आणि मार्च महिन्यापासूनच लागू केली जाऊ शकते. यापूर्वी, टीडी कोवेनने (TD Cowen) असा अंदाज वर्तवला होता की ओरॅकलमध्ये २०,००० ते ३०,००० लोकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. यू.एस. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे (U.S. Securities and Exchange Commission) दाखल केलेल्या वार्षिक माहितीनुसार, ३१ मे २०२५ पर्यंत ओरॅकलमध्ये अंदाजे १,६२,००० पूर्ण-वेळ कर्मचारी होते.

Petrol-Diesel Price Hike: महागाईचा ट्रिपल अटॅक, कमर्शियल सिलेंडर, ATF नंतर आता पेट्रोल डिझेलदेखील महागलं

Web Title: Oracle has fired 30000 employees approximately 12000 affected in india another round of layoffs expected within a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Business News
  • Job
  • layoffs
  • Oracle

संबंधित बातम्या

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी
1

आधी नफा देऊन विश्वास जिंकला, मग २.४७ कोटी हडपले; पेट्रोल पंपाच्या आमिषाने ज्येष्ठ व्यावसायिकाची महाठगी

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
2

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर
3

AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला
4

World Bank Report 2026: फ्रेशर्ससाठी धोक्याची घंटा! एआयमुळे भारतातील २०% एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकटात; वर्ल्ड बँकेचा खुला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.