डिजिटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 कम्युनिकेशनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची निराश केला आहे. ह्या शेअर्सचे गुरूवारी शेअर बाजारात लिस्टिंग झाले. या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात १,९५५ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात १,९५० रुपयांवर नोंद झाली. म्हणजेच ते IPO मधील किमतीपेक्षा ९ टक्के कमी लिस्टींग आहे. सध्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३५० रुपयांचा फटका बसला आहे. हा शेअर्स १३ टक्क्यांनी खाली आला आहे.
पेटीएमच्या शेअर्सने १,६५७ रुपयांचा नीचांक आणि १,९६१ रुपयांचा उच्चांक गाठला. त्याची मार्केट कॅप १.१६ लाख कोटी रुपये होती. तर लिस्टिंगपूर्वी मार्केट कॅप १.४८ लाख कोटी राहण्याचा अंदाज होता. विशेष म्हणजे हा शेअर त्याच्या इश्यू किमतीलाही स्पर्श करू शकला नाही. सबस्क्रिप्शन आणि लिस्टिंग या दोन्ही बाबतीत हा शेअर्स अलीकडच्या काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा ठरला आहे.
ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने म्हटले आहे की पेटीएमचा शेअर्स ४४ टक्के आपटू शकतो. हा शेअर १,२०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. याचा अर्थ भविष्यात यातही गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कंपनीसाठी नफा मिळवणे हे मोठे आव्हान आहे. यासोबतच नियमन आणि स्पर्धाही यासाठी चिंतेचा विषय आहे.
पेटीएमच्या शेअर्सचे वाटप २१५० रुपये प्रति शेअर दराने करण्यात आले आहे. ग्रे मार्केटमधील शेअरचा प्रीमियम अलॉटमेंट प्राइस पेक्षा २०-२५ रुपये कमी आहे. कंपनीने म्हटले आहे की आयपीओद्वारे उभारलेल्या पैशांपैकी ४,३०० कोटी रुपये पेमेंट इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी वापरले जातील. कंपनी आपल्या व्यापारी आणि ग्राहकांना तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांवर अधिक सुविधा देईल.नवीन व्यवसाय उपक्रम आणि धोरणात्मक भागीदारीसाठी कंपनी २,००० कोटी रुपये वापरणार आहे. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल.