(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध?
चीनने बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांच्याशी तीस्ता प्रकल्पावरुन संवाद साधला आहे. चिनचे राजदूत याओ वेन यांनी नुकतीच ढाका येथे बांगलादेशच्या नव्या परराष्ट्र मंत्री खलीलुर्रहमान यांची भेट घेतली. या भेटीनंतर चीनने तीस्ता प्रकल्पाबाबात मोठी घोषणा केली. चीन तीस्ता नदी व्यापक व्यवस्थापन आणि पुनर्संचित प्रकल्पात मोठी भूमिका बजावणार असल्याचे संकेत दिले आहेत. चीनने म्हटले आहे की, प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ संपला असून लवकरच दोन्ही देशांतील तीस्ता प्रकल्पाचे काम लवकर सुरु करण्यात येईल.
मात्र चीनच्या या हालचालींमुळे भारताच्या चिकन नेक ज्याला सिलगुडी कॉरिडॉर म्हणूनही ओळखले जाते त्या क्षेत्रात मोठा धोका निर्माण झाला आहे. हे क्षेत्र भारताच्या सीमांना ईशान्येकडील आठ राज्यांशी जोडते. यामध्ये सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या देशांचा समावेश आहे. या मार्गावरुन भारत या देशांशी थेट व्यापार करु शकतो.
तर वायव्येला नेपाळ आणि ईशान्येला भूतानचे खोरे आहे. या अरुंद मार्गावरुन रस्ते, महत्वाचे रेल्वे मार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन, उच्च व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन ग्रिड, फायबर ऑप्टिक केबल्स आहेत. या भागात चीनचा वाढता प्रभाव हा भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानला जातो.
हसीना सरकारच्या काळात बांगलादेशने या प्रकल्पात भारताला साथ दिली होती. मात्र त्यांच्या पतनानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आणि त्यांनी भारतविरोधी भूमिका घेत चीनला पाठिंबा दिला. सध्या नव्या सरकारने भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली आहे. परंतु चिनी राजदूतांच्या भेटीवरुन त्यांचाही झुकाव भारतविरोधी दिसून येत आहे. यामुळे भारताच्या चिंतेत अधिकच भर झाली आहे.
युनूसची नवी खेळी? चीनसोबत मिळून तिस्तावर आखली मोठी योजना; भारतासाठी धोक्याची घंटा
Ans: : तीस्ता प्रकल्प हा भारत आणि बांगलादेशचा पाणी वाटप प्रकल्प आहे, परंतु यामध्ये चीनच्या सहभागामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Ans: चिकन नेक हा सिलगुडी कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर भारताच्या मुख्य ईशान्य राज्यांशी जोडणार मार्ग आहे.
Ans: तीस्ता प्रकल्प हा चिकन नेक जवळ असूनचीनच्या येथील हालचाली भारताच्या धोरणात्मक सुरक्षिसाठी धोकादायका मानल्या जात आहे.
Ans: बांगलादेश तीस्ता नदीवर चीनच्या मदतीने मोठे धरण बांधण्याची आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे, ज्यातून भारतावरील अवलंबित्व कमी होईल.






