
2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता
Petrol-Diesel Rate: भारतासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत गुडन्यूज समोर आली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत भारतीयांना चिंता करायची आता गरज नाही. कारण, 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकन दिग्गज जे.पी. मॉर्गन यांनी यासंबधित भाकीत केले असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
कच्च्या तेलाच्या घसरणीचा मोठा फायदा हा थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणार आहे. अमेरिकन दिग्गज जेपी मॉर्गन यांनी असा दावा केला आहे की, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती 2027 पर्यंत अंदाजे 30 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. कारण, सध्या मागणीपेक्षा तेलाचा पुरवठा अधिक असून याचा सगळ्यात जास्त परिणाम भारतावर होणार आहे. कारण, भारत तेलाच्या गरजेच्या अधिक म्हणजे 85 टक्क्यांपेक्षा जास्त आयात करत असून यासाठी सरकार मोठी रक्कम मोजू शकते. म्हणूनच, कच्च्या तेलाचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या भावात होईल.
हेही वाचा : Todays Gold-silver Price: २४ कॅरेट सोन्यात मोठी उसळी, चांदीही झाली महाग! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
तेल उत्पादन वाढल्याने किंमती कमी
जेपी मॉर्गन यांच्या मते, पुढील 3 वर्षात मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर वाढेल, यामुळे तेलाचे उत्पादन अधिक वेगाने होईल. विशेषतः, इतर देश देशील तेलाचे उत्पादन वाढण्यावर भर देतील. या वाढत्या उत्पादनामुळे बाजारपेठात त्याचे प्रमाण वाढेल. ज्यामुळे त्याच्या किंमतीत घट होईल. जागतिक तेलाची 2025 मध्ये दररोज 0.9 दशलक्ष बॅरल इतकी मागणी वाढेल. ज्याचा वापर तब्बल 105.5 दशलक्ष बॅरल इतका होईल.
जे.पी. मॉर्गन यांच्या अंदाजानुसार, 2027 पर्यंत 42 डॉलरपर्यंत सरासरी किमती घसरून त्या वर्षाच्या अखेरीस 30 डॉलरच्याही खाली सुद्धा येऊ शकतात. आता, ब्रेंट क्रूड ऑइल सध्या प्रति बॅरल 60 डॉलरपेक्षा अधिक आहे. यामुळे सरकारी खर्च कमी होऊन तेल कंपन्यांना याचा नफा मिळेल. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्याच्या पातळीपेक्षा अजून निम्म्या होऊ शकतात.
हेही वाचा : खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण
जेपी मॉर्गन यांनी 2027 पर्यंत एकूण पुरवठ्यामधील अंदाज गृहीतकावर आधारित असून खोल समुद्रातील तेल काढण्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे आणि जगभरात वाढत असलेल्या शेल ऑइलच्या उत्पादनामुळे असल्याचा अंदाज आहे. आता, खोल समुद्रातील तेल काढण्याचा मार्ग परवडणारा असून यामुळे 2029 पर्यंत बहुतेक तेल काढण्याची जहाजे आधीच कार्यान्वित होऊ शकतात.