२४ कॅरेट सोन्यात मोठी उसळी, चांदीही झाली महाग (फोटो-सोशल मीडिया)
Todays Gold-silver Price: आजच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने १,२७,२००रुपये. प्रति १० ग्रॅमवर पोहोचले असून सध्या लगीनसराई सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. चांदीचा दर वाढला असून १,६७,१०० रु. प्रति किलोवर स्थिर आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत कमी झाल्यानेही त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाला आहे.
सोन्याच्या किमती काही दिवस घसरण सुरू होती. मात्र, आता ती घसरण थांबली असून सोन्याच्या भावात उसळली मारली आहे. २६ नोव्हेंबर रोजी देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. लग्नाच्या हंगामात देशांतर्गत सोन्याच्या दागिन्यांची बाजारात वाढलेली मागणी याला मुख्य कारण आहे. सोने-चांदीच्या किमती नेहमीच देशांतर्गत आणि जागतिक दोन्ही घटकांवर अवलंबून असतात.
हेही वाचा : Global Job Crisis 2025: एआयमुळे HP ची मोठी नोकर कपात! 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात
आज, २६ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२७,२०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, अन्य मुंबई, चेन्नई आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२७,०५० रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भावही वाढला आहे, तो दिल्लीत प्रति १० ग्रॅम १,१६,६१० रुपयांवर पोहोचला आहे.
दिल्ली: २४ कॅरेट – १,२७,२०० रु., २२ कॅरेट – १,१६,६१० रु.
मुंबई/चेन्नई/कोलकाता: २४ कॅरेट – १,२७,०५० रु., २२ कॅरेट – १,१६,४६० रु.
पुणे/बेंगळुरू: २४ कॅरेट – १,२७,०५० रु., २२ कॅरेट – १,१६,४६०रु.
सोन्याच्या किमती वाढण्याची मुख्य कारणे
सध्या देशात लग्नाचा हंगाम सुरू असल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे किमती वाढणार हे निश्चित आहे. तसेच, डॉलर (अमेरिकन चलन) जागतिक स्तरावर कमकुवत झाले आहे. जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोने स्वस्त होते, त्याची मागणी वाढते आणि भारतीय रुपयांमध्ये त्याचे मूल्य वाढते.
हेही वाचा : भारती Airtel मध्ये 3.5 कोटी शेअर्सची विक्री, स्टॉक्समध्ये 2% घसरण; वाचा आजचे Stock Market
सोन्याप्रमाणेच, आज चांदीच्या किमतींमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चांदीची किंमत प्रति किलो ग्रॅम १,६७,१०० रुपयांपर्यंत वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, न्यू यॉर्कमध्ये चांदीची स्पॉट किंमत देखील प्रति औंस $५१.१५ वर पोहोचली आहे. देशांतर्गत मागणी व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय चलनविषयक धोरणे आणि बाजारातील चढउतारांचा सोने आणि चांदीच्या किमतींवर थेट परिणाम होत आहे.






