Hindu Cremation Rituals and Kapal Kriya Explained (फोटो सौजन्य-AI एआय)
चिता दहनाच्या वेळेची ही संबंधित एक प्रथा अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण करत असेल. चिता दहनाच्या वेळी कवटी फुटण्याची किंवा कवटीला तडे जाण्याची वाट का पाहिली जाते? काही हिंदू अंत्यसंस्कार परंपरांमध्ये कपालक्रियेला आत्म्याच्या मुक्तीशी जोडले जाते. पण ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली, तिच्यामागील आध्यात्मिक अर्थ काय आणि कवटी फुटण्याची घटना विज्ञान कशी समजावते, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
कवटी फुटण्याची वाट का पाहिली जाते?
बऱ्याच स्थानिक अंतिम संस्कारांच्या परंपरांमध्ये दहानावेली देहाची कवटी फुटण्याची वात पहिली जाते. शिवाय काही ठिकाणी त्यासाठी विधीही केला जातो ज्याला कपालक्रिया असेही म्हणले जाते.धार्मिक दृष्टीने मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले मानले जाते. मृत्यूनंतर शरीर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्त्वांमध्ये विलीन होते, अशी हिंदू तत्त्वज्ञानातील संकल्पना आहे. कपालक्रिया ही देहाचा नश्वरपणा आणि आत्म्याच्या पुढील प्रवासाचे प्रतीक मानली जाते.
कपालक्रिया म्हणजे काय?
कपालक्रिया या विधीला सरळ समजायला गेले तर ते असे कि. दहनाच्या वेळी मृतदेहावर तूप ओतून चितेला मुखाग्नी दिला जातो. चिता जळते समयी शरीरावरील उती अर्थात त्वचा, अवयव, मांस हा भाग लवकर जळतात, पण हाडे आणि मुख्यत्त्वे कवटीचे हाड लवकर जळत नाही. हिंदू समाजातल्या बऱ्याच अंतिम संस्कारांमध्ये चिता दहनानंतर कवटीला लाकडाच्या काठीच्या सहाय्याने तोडले किंवा फोडले जाते.
अशी मान्यता आहे कि कपाळ किंवा कपाल हे देहामधून जाणाऱ्या आत्म्याचे मोक्ष मार्गासाठी अंतिम चरण असते. मान्यतेनुसार कपाल किंवा कवटी ज्यात मेंदू म्हणजे चेतनेचे मुख्य अस्तित्त्व असते, ज्याला प्राण म्हणूनही संबोधले जाते, त्या प्राणाला मुक्त करण्यासाठी ही कपालक्रिया केली जाते.प्राचीन काळात कवटी दाह संस्कारात अखंडित राहिली तर त्याला ‘अपूर्ण दाह’ असे संबोधले जायचे.
मृत व्यक्तीच्या आत्म्याला देहबंधनातून मुक्त होण्यासाठी कपालक्रिया केली जाते. काही ठिकाणी हा विधी मृत व्यक्तीचा पुत्र किंवा अंत्यसंस्काराची जबाबदारी घेणारी व्यक्ती करते. पण ही प्रथा सर्व हिंदू समाजांमध्ये सारखी नाही.
अजून काही मान्यतेनुसार, न जळलेल्या अखंड कवटीचा वापर तांत्रिक चुकीच्या तंत्रकांड साठी वापरू नयेत यासाठी ही क्रिया केली जाते, असे सांगितले जाते. याशिवाय, जोपर्यंत मृतदेह संपूर्ण राखेत बदलत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या देहाशी असलेली शोक भावना, प्रेमभावना नात्याची ओढ संपुष्टात येऊ शकत नाही असेही मानके जाते. कपालक्रियेची प्रथा ही त्या व्यक्तीच्या भौतिक अस्तीत्वाची संपुष्टी दर्शवतो.
Ans: काही स्थानिक धार्मिक परंपरांमध्ये कवटीला तडे जाण्याच्या घटनेला कपालक्रियेशी जोडले जाते. पण सर्व हिंदू अंत्यसंस्कारांमध्ये कवटी फुटण्याची वाट पाहिली जातेच असे नाही.
Ans: काही धार्मिक श्रद्धांनुसार कपालक्रिया आत्ममुक्तीशी संबंधित आहे. पण आत्म्याच्या मुक्तीचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही.
Ans: चितेतील तीव्र उष्णतेमुळे कवटीच्या हाडांमध्ये आकुंचन, ताण आणि भौतिक बदल होतात. त्यामुळे हाडांना तडे जाणे किंवा त्यांचे तुकडे होणे शक्य असते.






