Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे काय हा प्रकार! Blinkit-Zepto वरुन Melody चॉकलेट झालं Out of Stock, मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या भेटीनंतर…

पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान मेलोनी यांना 'Parle' च्या 'Melody' टॉफींचे एक पाकीट भेट म्हणून दिले. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच, संपूर्ण भारतात 'Melody' चॉकलेट खरेदी करण्याचा एकच धुरळा उडाला आहे. नेमकं काय घडलं मार्केटमध्ये? समजून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 20, 2026 | 07:02 PM
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • Melody चॉकलेट झालं Out of Stock
  • हा संपूर्ण प्रकार कसा सुरू झाला?
  • सोशल मीडियावर पुन्हा ‘Melodi’चा ट्रेंड
Melody Out Of stock : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्री अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. मात्र, यावेळी या मैत्रीचा प्रभाव थेट भारतीय बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. इटलीच्या दौऱ्यावर असताना, पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान मेलोनी यांना ‘Parle‘ च्या ‘Melody’ टॉफींचे एक पाकीट भेट म्हणून दिले. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच, संपूर्ण भारतात ‘Melody’ चॉकलेट खरेदी करण्याचा एकच धुरळा उडाला आहे.

SIP नेहमीच फायदेशीर नसते? Mutual Fund कंपन्या ‘या’ 5 गोष्टी तुमच्यापासून नेहमी लपवतात; Investment पूर्वी नक्की वाचा

Melody चा साठा Out Of Stock

‘Business Today’ च्या एका अहवालानुसार, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, देशातील अनेक शहरांमध्ये विविध ‘क्विक-कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सवर म्हणजेच जसे की Blinkit, Zepto आणि Instamart यांच्यावर अवघ्या काही तासांतच ‘Melody’ टॉफींचा साठा पूर्णपणे संपला. तो out of stock झाला. एका रुपयापेक्षाही कमी किंमत असलेल्या या साध्याशा टॉफीने इंटरनेटवर अशी काही क्रेझ निर्माण केली, जी मोठ्यामोठ्या जाहिरातीमधून कधी साध्य झालं नाही.

हा संपूर्ण प्रकार कसा सुरू झाला?

बुधवारी, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांना ‘मेलोडी’ टॉफी देताना दिसून आले. या व्हिडिओसोबतच त्यांनी लिहिले, “भेटवस्तूसाठी धन्यवाद.” या दोन्ही नेत्यांमध्ये दिसून आलेल्या सौहार्दाचे लोकांनी भरभरून कौतुक केले. यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, भारत आणि इटली यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

सोशल मीडियावर पुन्हा ‘Melodi’चा ट्रेंड

व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर ‘Melodi’चा ट्रेंड पुन्हा एकदा जोर धरू लागला. लोकांनी या संदर्भात अनेक मजेशीर memes आणि पोस्ट्स शेअर केल्या. त्याच वेळी, हजारो वापरकर्त्यांनी तत्काळ आपली ॲप्स उघडून ‘Melody’ कँडीची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. परिणामी, Blinkit, Zepto आणि Instamart यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी या कँडीचा स्टॉक संपला.

पंतप्रधान मोदी इटलीच्या दौऱ्यावर

सध्या पंतप्रधान मोदी इटलीमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या पाच युरोपीय देशांच्या दौऱ्याचा हा अंतिम टप्पा आहे. भारतीय आणि इटालियन अशा दोन्ही देशांतील प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या एका संयुक्त लेखात, मोदी आणि मेलोनी यांनी असे नमूद केले आहे की, हे दोन्ही देश आता केवळ मित्र राहिले नसून, त्यांचे रूपांतर strategic partners मध्ये झाले आहे. आगामी काळात तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सामरिक क्षेत्रांमधील सहकार्यामुळे या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Meta Layoffs: पहाटेचा ईमेल 8000 लोकांची झोप उडवून गेला, Meta कडून एका झटक्यात मोठी नोकरकपात

Web Title: Pm modi giorgia meloni melody chocolate out of stock blinkit zepto marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Blinkit
  • Business News
  • Giorgia Meloni
  • Marathi News
  • narendra modi
  • Zepto

संबंधित बातम्या

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
1

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
2

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
3

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं
4

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.