Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकांची सरशी; मालमत्तेत मोठी वाढ, निव्वळ नफ्यातही रेकॉर्डब्रेक सुधारणा

चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत भारतीय बँकिंग क्षेत्राने दमदार कामगिरी नोंदवली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB), आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या प्रमुख बँकांच्या निव्वळ नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 19, 2026 | 07:38 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बँकांचा एनपीए घटला
  • मालमत्तेत मोठी  वाढ
  • तिमाही निकालांत बँकांची सरशी
चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल-जून तिमाहीत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांनी दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. पंजाब नॅशनल बैंक (पीएनबी), अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक या चारही बँकांच्या निव्वळ नफ्यात लक्षणीय वाढ झाली. कर्जवाटप आणि व्याज उत्पन्नातही वाढ दिसून आली. मात्र, काही बँकांच्या निव्वळ व्याज मार्जिनवर दबाव कायम राहिला, तर मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा आणि अनुत्पादक कर्जात घट ही सकारात्मक बाब ठरली.

Success Story: 38 हजारची नोकरी सोडून सुरू केली चहाची टपरी, लोकांनी वेड्यात काढलं; पण आज कमवतोय दरमहा 100000 रुपये

पंजाब नॅशनल बँकः सार्वजनिक

क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेचा चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत नफा तिप्पटीहून अधिक वाढून ५ हजार २५३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या याच तिमाहीत बँकेचा नफा १,६७५ कोटी रुपये होता. जून २०२६ मध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न ३७ हजार २३१ कोटी रुपयांवर स्थिर राहिले. पण बँकेचे व्याज उत्पन्न किंचित वाढून ३२,८९७ कोटी रुपये झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीत ३१,९६४ कोटी रुपये होते. या कालावधीत बँकेचा परिचालन नफा ७,५१९ कोटी रुपयांपर्यंत वाढला, तर मागील वर्षी याच तिमाहीत तो ७,०८१ कोटी रुपये होता. बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली.

तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील बैंक

अॅक्सिस बँक तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील बैंक असलेल्या अॅक्सिस बँकेने, चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल-जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २२.२३% वाढ नोंदवत तो ७,६३२.३१ कोटींवर पोहोचल्याचे जाहीर केले. २०२५-२६ च्या याच तिमाहीत बँकेचा एकत्रित नफा ६.२४३.७२ कोटी होता. या तिमाहीत बँकेचा स्वतंत्र नफा २३ टक्क्यांनी वाढून ७ हजार ११४ कोटींवर पोहोचला. कर्ज वितरणात १९% वाढ झाल्यामुळे, या तिमाहीत बँकेचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) ८ टक्क्यांनी वाढून १४ हजार ६४६ कोटींवर पोहोचले. पण बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) वार्षिक ३.८०% वरून ३.४६% पर्यंत घसरले. जानेवारी-मार्च २०२६ च्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन ३.७३ टक्के होते. बँकेने सांगितले, एप्रिल-जून तिमाहीत, कॉर्पोरेट कर्जामधील ३८ टक्के वाढीचा एकूण कर्जवाढीत सर्वाधिक वाटा होता, तर किरकोळ कर्जे केवळ आठ टक्क्यांनी वाढली.

आयसीआयसीआय बँक

दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील बैंक असलेल्या आयसीआयसीआय बँकेचा एकत्रित नफा, चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल-जून तिमाहीत १३.८८ टक्क्यांनी वाढून १५,४४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या याच तिमाहीत बँकेचा एकत्रित निव्वळ नफा १३,५५८ कोटी रुपये होता. शनिवारी शेअर बाजारात दिलेल्या सूचनेत बँकेने म्हटले, चालू तिमाहीत तिया स्वतंत्र निव्वळ नफा १५.९५ टक्क्यांनी वाढून १४,८०४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल-जून तिमाहीत १२,७६८ कोटी रुपये होता. समीक्षाधीन तिमाहीत बँकेचे मुख्य निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक तुलनेत १२.७ टक्क्यांनी वाढून २४,३८४ कोटी रुपये झाले.

कोटक महिंद्रा बँक

आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत २२.५५ टक्क्यांनी वाढून ५,४८० कोटी झाला, खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेचा एकत्रित नफा आर्थिक वर्ष २०२६-२७ व्या पहिल्या तिमाहीत २२.५५ टक्क्यांनी वाढून ५,४८०.४६ कोटी झाला. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या याच तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचा नफा ४,४७२.१८ कोटी होता.
जून २०२६ मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचा नफा ४,१२२.९६ कोटी होता, तर आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या याच तिमाहीत तो ३,२८१.६८ कोटी होता. बँकेचे मूळ व्याज उत्पन्न आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीतील ७, २५९ कोटींच्या तुलनेत, या तिमाहीत वार्षिक ९ टक्क्यांनी वाढून ७ हजार ९२८ कोटी झाले.
तथापि, बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन जून तिमाहीत ४.५३ टक्क्यांपर्यंत घसरले, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ४.६५ टक्के आणि मागील मार्च तिमाहीत ४.६७ टक्के होते. गुंतवणूकदारांना सादर केलेल्या एका सादरीकरणानुसार, बँकेच्या एकूण ठेवी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीतील ४.९२ लाख कोटीवरून आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक १४ टक्क्यांनी वाढून ५.५९ लाख कोटी झाल्या.

IRCTC New Chairman: शिक्षणामध्ये नेहमीच टॉपर; आता सांभाळणार IRCTC ची कमान! जाणून घ्या कोण आहेत नवे CMD राहुल हिमालियन

Web Title: Pnb icici axis kotak bank q1 results net profit rises npa decreases marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • axis bank
  • Bank
  • bank RBI
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2

Prajakta Mali: प्राजक्ताची ललितसाठी खास पोस्ट; ‘हँडसम’ म्हणत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात
3

Entertainment News: १२ वर्षांचा अनुभव, आता स्वतःचं क्लिनिक! अभिनेत्याची गणेशोत्सवात नवी सुरुवात

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील
4

Jai Jai Swami Samarth Marathi Serial: ज्याला देव मान्य नाही, त्याच्याच घरी बाप्पा! स्वामींची लीला पाहून थक्क होतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.