Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

Pune Homes: पुण्यात एप्रिल-जून २०२५ मध्ये १५,९६२ घरांची विक्री झाली होती. यंदाच्या तिमाहीत हा आकडा १२,६४२ वर आला. म्हणजेच वर्षभरात पुण्यातील घरविक्रीत ३,३२० घरांची घट झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2026 | 05:34 PM
मुंबईत घर खरेदीत चांगली वाढ

मुंबईत घर खरेदीत चांगली वाढ

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात घरांच्या विक्रीला ब्रेक लागल्याने २१ टक्क्यांची घट
  • आठ प्रमुख शहरांतील विक्री घटली;
  • पुण्यात १२,६४२ घरांची विक्री
पुणे: जागतिक पातळीवरील अनिश्चितता, घरखरेदीदारांची सावध भूमिका आणि मागणीतील घट याचा परिणाम पुण्याच्या निवासी मालमत्ता बाजारावरही झाला आहे. एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीत पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्क्यांची  (Business) घट झाली. या कालावधीत पुण्यात १२,६४२ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत १५,९६२ घरांची विक्री झाली होती.

प्रॉपटायगरच्या ‘रिअल इनसाइट’ अहवालातून ही माहिती समोर आली आहे. देशातील आठ प्रमुख शहरांमधील निवासी मालमत्ता बाजाराचा या अहवालात आढावा घेण्यात आला आहे. या आठ शहरांमध्ये एप्रिल-जून २०२६ मध्ये एकूण ९१,७२९ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ९७,६७४ घरांच्या तुलनेत विक्री सहा टक्क्यांनी घटली आहे.

पुण्यातील विक्री ३,३२० ने घटली 

पुण्यात एप्रिल-जून २०२५ मध्ये १५,९६२ घरांची विक्री झाली होती. यंदाच्या तिमाहीत हा आकडा १२,६४२ वर आला. म्हणजेच वर्षभरात पुण्यातील घरविक्रीत ३,३२० घरांची घट झाली असून, प्रमाण २१ टक्के आहे. आठ प्रमुख शहरांमध्ये अहमदाबादनंतर पुण्यातील विक्रीतील घट मोठी आहे. जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थिती, पश्चिम आशियातील संघर्ष तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या परिस्थितीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबतची चिंता यामुळे संभाव्य घरखरेदीदार सावध झाले आहेत. त्याचा परिणाम घरांच्या मागणीवर आणि विक्रीवर होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन

चेन्नईत सर्वाधिक वाढीची नोंद

दरम्यान, पुण्यातील घसरणीच्या तुलनेत काही शहरांमध्ये घरबाजाराची स्थिती सकारात्मक राहिली. चेन्नईमध्ये घरांची विक्री ३६ टक्क्यांनी, तर हैदराबादमध्ये १५ टक्क्यांनी वाढली. दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेशात सात टक्के, दिल्ली-एनसीआरमध्ये सात टक्के, बंगळुरूमध्ये नऊ टक्के आणि कोलकात्यात नऊ टक्के घट झाली.

पुण्यातील घरविक्री

– एप्रिल-जून २०२५ : १५,९६२ घरे

– एप्रिल-जून २०२६ : १२,६४२ घरे

– घट : ३,३२० घरे

– विक्रीतील घट : २१ टक्के

– आठ शहरांतील एकूण विक्री : ९१,७२९ घरे

– आठ शहरांतील एकूण घट : ६ टक्के

LPG Connection New Rule: कधीपासून मिळणार एलपजी सिलेंडरचे नवे कनेक्शन, सरकारने दिली अपडेट

घरविक्रीची स्थिती

शहर                     एप्रिल-जून २०२५.    एप्रिल-जून २०२६.  बदल

दिल्ली – (एमएमआर)  २५,९३९.                  २४,११२.               ७%

एनसीआर.                  १०,०५१.                    ९,३५२.              ७%

बंगळुरू.                      १५,६२८.                  १४,१८६.              ९%

पुणे.                           १५,९६२.                  १२,६४२.             २१%

अहमदाबाद.                   ९,४५१.                    ७,५४१.            २०%

कोलकाता.                     ३,८४७.                    ३,५१७.               ९%

चेन्नई.                          ५,२८३.                    ७,१८३.            ३६%

हैदराबाद.                     ११,५१३.                  १३,१९६.             १५%

एकूण: ९१,७२९ घरांची विक्री; मागील वर्षाच्या तुलनेत ६% घट.

 

दुसऱ्या तिमाहीतील विक्रीच्या आकडेवारीवरून देशातील निवासी मालमत्ता बाजारपेठेत कमकुवतपणा नसून, बाजारपेठ अधिक स्थिर आणि परिपक्व होत असल्याचे दिसून येते.

– प्रकाश तेजवानी,
प्रॉपटायगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Pune real estate decreasing housing sale in 21 percent real estate business news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Business News
  • homes
  • pune news
  • real estate

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!
1

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद
2

Cricket: स्पार्टन मान्सून लीगमध्ये लेजेंड्सची बाजी; पुणे रेंजर्सला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…
3

पुण्यनगरीत तब्बल 4000 रोजगार! Maval मध्ये 2,500 कोटींची मोठी गुंतवणूक, मागील सात वर्षांत RMK गृपने…

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर
4

Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंगला ५७४ कोटींच्या नवीन ऑर्डर्स; चालू वर्षातील ऑर्डर बुक १,६०९ कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.