
‘स्पार्टन मानसून लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा
पुण्यात स्पार्टन मानसून लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा
लेजेंड्स स्पोर्ट्स क्लब संघाला विजेतेपद
ऐश्वर्य खोपकर आणि अच्युत मराठे यांनी केली अचूक गोलंदाई
पुणे/Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे तर्फे आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत ऐश्वर्य खोपकर आणि अच्युत मराठे यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे लेजेंड्स स्पोर्ट्स क्लबने पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचा तीन गडी राखून पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्या वर्षी पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचा डाव १७.३ षटकात ११९ धावांवर मर्यादित राहीला. श्रीहर्ष पाटील २६ धावा आणि कौस्तुभ बाकरे २० धावा या दोघांनी संघाचा डाव उभा केला. लेजेंड्स संघाच्या ऐश्वर्य खोपकर आणि अच्युत मराठे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून पुणे रेंजर्सचा डावाला वेसण घातले. षटकामागे सरासरी सहा धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या लेजेंडस स्पोर्ट्स क्लबने हे आव्हान ९.५ षटकात पूर्ण केले. मयुर गोखले ३० धावा, अमित गणपुले २५ धावा आणि गिरीष कोंडे नाबाद २६ धावा यांनी संघाचा विजय सुकर केला.
Cricket: डीएसपी करंडकात Pune Cricket Club ची अंतिम फेरीत धडक; रुद्र पाबळेची आक्रमक खेळी
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ए३ करियर सोल्युशन चे संचालक अभिषेक शुक्ला आणि सीएनए क्रिकेट अकॅडमी विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या लेजेंड्स स्पोर्ट्स क्लबला आणि उपविजेत्या पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबला करंडक आणि मेडल्स् अशी पारितोषिके देण्यात आली. यावेळी स्पर्धेचे संचालक ऋषीकेश पुजारी, विवेक कुबेर, केतन पासलकर आणि अमित देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः १७.३ षटकात १० गडी बाद ११९ धावा (कौस्तुभ बाकरे २०, श्रीहर्ष पाटील २६, ऐश्वर्य खोपकर ३-१५, अच्युत मराठे ३-१२) पराभूत वि. लेजेंडस स्पोर्ट्स क्लबः ९.५ षटकात ७ गडी बाद १२३ धावा (मयुर गोखले ३०, अमित गणपुले २५, गिरीष कोंडे नाबाद २६, सुमित दिघे ४-४१); सामनावीरः ऐश्वर्य खोपकर
DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः प्रसाद कुंटे (३४७ धावा; १३ विकेट; पुणे रेंजर्स क्लब);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः रणजीत कुलकर्णी (३९१ धावा; टोरनेडोज्);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः सुमित दिघे (२१ विकेट; पुणे रेंजर्स क्लब);
सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाजः अच्युत मराठे (९६ निर्धाव चेंडू; ३२ षटके, लेजेंड्स स्पोर्ट्स);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः समीर पंचपोर (१५ बाद; लेजेंड्स स्पोर्ट्स);
सर्वोत्कृष्ट इकोनॉमी असणारा गोलंदाजः फर्श अन्सारी (७.२२ इकोनॉमी; लेजेंड्स स्पोर्ट्स);