Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक! Swap योजनेमुळे देशात तब्बल 85 अब्ज डॉलरचा परकीय निधी येण्याचा अंदाज; SBI चा अहवाल

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सवलतीच्या स्वॅप सुविधा योजनेमुळे देशात परकीय चलनाची तरलता वाढण्यास मोठा हातभार लागत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 'इकोवॅप' अहवालानुसार, या योजनेअंतर्गत भारतामध्ये तब्बल ८० ते ८५ अब्ज डॉलर्सचा परकीय निधी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 01:10 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • RBI चा मोठा मास्टरस्ट्रोक!
  • Swap योजनेमुळे देशाला होणार फायदा
  • 85 अब्ज डॉलरचा परकीय निधी येण्याचा अंदाज
RBI Foreign Exchange : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सवलतीच्या स्वॅप सुविधा योजनेअंतर्गत परकीय चलन ओघाला चालना देण्यासाठी भारताला ८० ते ८५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळू शकते, असा अंदाज सोमवारी एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘इकोवॅप’ या संशोधन अहवालानुसार, १७ जुलैपर्यंत या योजनेअंतर्गत एकूण परकीय चलन ओघामध्ये फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेंट ठेवींचे योगदान १७.४० अब्ज डॉलर्स होते. यात फॉरेन करन्सी बॉरोइंग्जचे योगदान १.९७ अब्ज डॉलर्स आणि एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्जचे योगदान १.३४ अब्ज डॉलर्स होते. आरबीआयच्या अहवालानुसार, आकडेवारीनुसार १७ जुलैपर्यंत सुमारे २० अब्ज डॉलर्सचा परकीय चलन ओघ नोंदवला गेला आहे. हे प्रामुख्याने १७.४ अब्ज डॉलर्सच्या ठेवींच्या मजबुतीमुळे आहे.

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?

अहवालात काय?

अहवालात म्हटले की, आमचा अंदाज आहे की या योजनेअंतर्गत एफसीएनआर (बी) ठेवींच्या स्वरूपात एकूण ६५-७० अब्ज डॉलर्स जमा होतील. शिवाय, ओएफसीबी आणि ईसीबी यांचा समावेश केल्यास, ही रक्कम ८०-८७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. अहवालानुसार, आरबीआयच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की १७जुलैपर्यंत एफसीएनआर (बी) ठेवींच्या स्वरूपात १७.४ अब्ज डॉलर्स जमा झालेत. हा निधीचा ओघ वाढवण्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आता देणार परकीय चलन तरलतेला पाठिंबा

भारताची व्यवहार तोल मजबूत करण्यासाठी आणि परकीय भांडवलाच्या ओघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांच्या मालिकेचा एक भाग म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ जून २०२६ रोजी स्वॅप सुविधा सुरू केली. ही सुविधा ८ जून २०२६ पासून प्रभावी झाली. ही सुविधा एफसीएनआर (बी) ठेवींसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत आणि परकीय चलन कर्ज व बाह्य व्यावसायिक कर्जासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध असेल, बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या बाहा क्षेत्रातील स्थिती मजबूत करण्यासाठी आणि परकीय चलन तरलतेला पाठिंबा देण्यासाठी आरबीआयने हे उपाय योजले आहेत.

किमतींमध्ये सततची अस्थिरता

एसबीआयच्या अहवालानुसार, आरबीआयच्या उपाययोजनांच्या घोषणेनंतर रुपयाने सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराच्या आशा मावळल्यामुळे, ऊर्जा किमतींमधील सततच्या अस्थिरतेमुळे आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे हा परिणाम लवकरच ओसरला. या अहवालात अशी अपेक्षा व्यक्त केली की, आरबीआयच्या या उपाययोजनांमुळे २०२६-२७या आर्थिक वर्षात भांडवली खात्यात अतिरिक्त ७५ ते ८५ अब्ज डॉलर्स जमा होतील. परदेशातून येणारा पैसा १५० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल.

नेपाळला फिरायला जाताय? किती खर्च येणार? भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Rbi discounted swap facility scheme expected attract 85 billion dollars report of sbi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • foreign exchange
  • Marathi News
  • RBI
  • RBI news
  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

Sawan 2026 Vastu Tips: श्रावण महिन्यात लावा ‘ही’ ५ चमत्कारी झाडे; वास्तूनुसार वाढेल पैशांचा ओघ
1

Sawan 2026 Vastu Tips: श्रावण महिन्यात लावा ‘ही’ ५ चमत्कारी झाडे; वास्तूनुसार वाढेल पैशांचा ओघ

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक,  कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?
2

Virushka Property: लंडननंतर अनुष्का-विराटची भारतात दणक्यात एन्ट्री? रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली प्रॉपर्टी?

Palghar Flood: अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर! 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत; 3.66 कोटी थेट खात्यात
3

Palghar Flood: अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर! 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत; 3.66 कोटी थेट खात्यात

Income Tax Return: ३१ जुलैची वाट पाहू नका! ४ कोटी लोकांनी ITR केले दाखल, आयकर विभागाकडून करदात्यांसाठी सूचना जारी
4

Income Tax Return: ३१ जुलैची वाट पाहू नका! ४ कोटी लोकांनी ITR केले दाखल, आयकर विभागाकडून करदात्यांसाठी सूचना जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.