Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Rule: 10 वर्षे जुन्या आणि बंद पडलेल्या अकाउंटमधूनही काढता येणार पैसे; पाहा काय आहे नियम

तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे असे एखादे जुने बँक खाते असेलच ना जे गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत आहे? किंवा एखाद्या विशिष्ट खात्यात जमा असलेली रक्कम बरीच वर्षे वापरलीच गेली नाहीये? पण आत पैसे काढला येतील का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 27, 2026 | 05:20 PM
(फोटो- सोशल मिडिया)

(फोटो- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

RBI Rule: तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे असे एखादे जुने बँक खाते असेलच ना जे गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत आहे? किंवा एखाद्या विशिष्ट खात्यात जमा असलेली रक्कम बरीच वर्षे वापरलीच गेली नाहीये? पण आत पैसे काढला येतील का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारच्या निष्क्रिय आणि दावा न केलेल्या बँक खात्यांच्या संदर्भात नवीन नियम लागू केला आहेत; ज्यामुळे लोकांना त्यांच्या जुन्या खात्यांमध्ये अडकलेली रक्कम पुन्हा मिळवून घेणं शक्य होणार आहे. ते कसं काय ? समजून घेऊयात.

अडचणी वाढल्या? 45 कोटींच्या गैरव्यवहाराचे दावे, HDFC Bank ने काय दिलं उत्तर?

देशभरात, अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा पडून आहेत. अनेकदा, नोकरीतील बदल, दुसऱ्या शहरात स्थलांतर किंवा केवळ माहितीचा अभाव यांमुळे लोक आपल्या जुन्या खात्यांबद्दल विसरून जातात. त्यामुळे त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी RBI ने आता बँकांना निर्देश जारी केले आहेत.

‘निष्क्रिय खाते’ म्हणजेच Inoperative Account म्हणजे काय?

जर एखाद्या बचत किंवा चालू खात्यामध्ये सलग दोन वर्षे तुम्ही वापरलेलेच नसेल किंवा त्यामध्ये कोणतेही व्यवहार झाले नसतील तर बँक त्या खात्याला ‘निष्क्रिय खाते’ म्हणून घोषित करते. पण हे खाते बंद केले जात नाही आणि त्यामध्ये जमा असलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. याउलट, जर एखाद्या खात्यात जमा असलेली रक्कम दीर्घकाळापर्यंत कोणीही दावा न केल्यामुळे तशीच पडून राहिली, तर ती ‘दावा न केलेली ठेव’ म्हणजे Unclaimed Deposit या विभागात गणल्या जातात. RBI च्या नियमांनुसार, जी रक्कम १० वर्षांपर्यंत कोणीही दावा न केल्यामुळे तशीच राहते, ती त्यानंतर आरबीआयच्या ‘DEAF’ मध्ये हस्तांतरित केली जाते.

१० वर्षे उलटून गेल्यानंतर काय?

आरबीआयने हे स्पष्ट केले आहे की, जरी एखाद्या खात्यातील रक्कम ‘DEAF’ मध्ये हस्तांतरित केली गेली असली, तरीही खातेदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस त्या रकमेवर आपला दावा सांगू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जरी १० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला, तरीही तुमचे पैसे जप्त होत नाहीत. यासाठी, ग्राहकाने संबंधित बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करणं गरजेचं आहे. बँक आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करेल आणि माहितीची अचूक आहे हा विश्वास पटल्यानंतर, ती रक्कम परत केली जाऊ शकते. जर खातेदाराचे निधन झाले असेल, तर त्यांचे nominee किंवा कायदेशीर वारस देखील त्या रकमेवर दावा सांगू शकतात.

तुमचे पैसे अडकले आहेत की नाही, हे कसे तपासावे?

जनतेच्या सोयीसाठी, आरबीआयने ‘UDGAM’ नावाचे एक पोर्टल देखील सुरू केले आहे. या पोर्टलला भेट देऊन, ग्राहक विविध बँकांमध्ये जमा असलेल्या आणि अद्याप दावा न केलेल्या ठेवींबद्दलची माहिती शोधू शकतात. ही माहिती मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि इतर काही आवश्यक तपशीलांची आवश्यकता असते. तज्ञांचा असा सल्ला आहे की, व्यक्तींनी आपल्या जुन्या बँक खात्यांशी संबंधित तपशील वेळोवेळी अपडेट करत राहिले पाहिजे. शिवाय, भविष्यात कुटुंबाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी, प्रत्येक बँक खात्यासाठी एका nominee चं नाव नोंदवणं आवश्यक आहे.

RBI च्या नावाने कोट्यवधींच्या लॉटरीचे मेसेज? केंद्र सरकारच्या PIB कडून बनावट घोटाळ्याचा Alert!

Web Title: Rbi new rule how to withdraw money from 10 year old closed bank account marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • Marathi News
  • RBI Action
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Sensex मध्ये Reliance चा धुमाकूळ! शेअर्समध्ये मोठी उसळी; पाहा मुकेश अंबानींची नेटवर्थ कुठपर्यंत पोहोचली?
1

Sensex मध्ये Reliance चा धुमाकूळ! शेअर्समध्ये मोठी उसळी; पाहा मुकेश अंबानींची नेटवर्थ कुठपर्यंत पोहोचली?

गुंतवणूकदारांची चांदी! तब्बल 100% प्रीमियमसह 3 नवे IPO बाजारात धडकणार; कोणत्या कंपनीचा किती आहे GMP?
2

गुंतवणूकदारांची चांदी! तब्बल 100% प्रीमियमसह 3 नवे IPO बाजारात धडकणार; कोणत्या कंपनीचा किती आहे GMP?

लोकांचे पैसे बुडवले अन् स्वतः स्वित्झर्लंडच्या बर्फात हनीमून… हैदराबादच्या जोडप्याचा कारनामा ऐकून थक्क व्हाल!
3

लोकांचे पैसे बुडवले अन् स्वतः स्वित्झर्लंडच्या बर्फात हनीमून… हैदराबादच्या जोडप्याचा कारनामा ऐकून थक्क व्हाल!

खराब वस्तू,सडलेली अंडी, मुदत संपलेल्या… ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ची Swiggy Instamart ला नोटीस
4

खराब वस्तू,सडलेली अंडी, मुदत संपलेल्या… ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ची Swiggy Instamart ला नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.