Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालघरमध्ये जलक्रांती! 18 गावांतील 1800 शेतकरी कुटुंबांसाठी रुस्तमजी आणि रोटरी क्लबचा मोठा पुढाकार

मुंबईतील सर्वाधिक विश्वासार्ह रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या रुस्तमजी ग्रुपने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टसोबत भागीदारी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 05, 2026 | 06:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मुंबईतील सर्वाधिक विश्वासार्ह रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या रुस्तमजी ग्रुपने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टसोबत भागीदारी केली आहे. दि. 7 जून 2026 रोजी उद्घाटन होणाऱ्या या प्रकल्पामुळे जलसुरक्षेत सुधारणा होणे, कृषी उत्पादकता वाढणे आणि 18 गावांमधील जवळपास 1,800 शेतकरी कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. दीर्घकालीन पाण्याची उपलब्धता राहावी या दृष्टीने विकसित करण्यात आलेला उपाय म्हणून हा चेक डॅम पावसाचे पाणी साठवून त्याचे संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हंगामी पर्जन्यमान मुबलक असूनही या प्रदेशात सतत पाणीटंचाई उद्भवते. या समस्येला तोंड देण्यास यामुळे मदत होईल.

8th Pay Commission : पेन्शन थेट पगाराइतकी होणार? 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी केंद्र सरकारकडे मोठी मागणी

शाश्वत समाज विकासासाठीच्या आपल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा भाग म्हणून रुस्तमजी महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यातील या परिवर्तनकारी उपक्रमाला पाठिंबा देत आहे. येथे वर्षभर उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्यामुळे जीवनमान आणि कृषी विकासावर मर्यादा आल्या आहेत. या धरणामुळे वरच्या दिशेने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत पाणी साठवले जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भूजल पुनर्भरणास चालना मिळेल आणि वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढेल. समाजाच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प स्थानिक मालकीभावाला प्रोत्साहन देतो तसेच त्याची दीर्घकालीन शाश्वतता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यात मदत करतो.

सुमारे 70.58 लाख रु. च्या एकूण प्रकल्प गुंतवणुकीसह या उपक्रमातून जलविषयक शाश्वत पायाभूत सुविधांद्वारे दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी विकास क्षेत्रातील भागधारक, स्थानिक समुदाय आणि संस्थात्मक भागीदार यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्न दिसून येतात. हा प्रकल्प केवळ तत्काळ पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच नव्हे, तर या प्रदेशासाठी दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ निर्माण करण्यासाठीदेखील डिझाइन करण्यात आला आहे.

या उपक्रमाबाबत भाष्य करताना रुस्तमजी ग्रुपच्या मुख्य शाश्वतता अधिकारी श्रीमती नम्रता नुलवाला म्हणाल्या, “अर्थपूर्ण शाश्वततेचा पाया समाजासाठी दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्यात आहे यावर रुस्तमजीमध्ये आमचा विश्वास आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये उपजीविकेची साधने ही नैसर्गिक साधनसंपत्तीशी घट्टपणे जोडलेली असतात. तिथे जलसुरक्षा ही आर्थिक लवचिकता आणि सामाजिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाच्या सक्षम घटकांपैकी एक आहे. कवळे चेक डॅम प्रकल्प हा विकास आणि स्वावलंबनाच्या संधी निर्माण करत व्यवस्थेतील मूलभूत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्यपूर्ण आणि परिणामकेंद्रित हस्तक्षेपांची ताकद दाखवून देतो.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टची रोटेरियन म्हणून सहकार्यपूर्ण आणि उद्देशप्रेरित उपक्रम किती प्रभाव निर्माण करू शकतात हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देऊन रुस्तमजीचे उद्दिष्ट दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्य निर्माण करणाऱ्या लवचिक ग्रामीण परिसंस्थांच्या विकासात योगदान देणे आहे. या उपक्रमातून समाज प्रणीत, विस्तारक्षम आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्यासाठी उभारलेल्या उपाययोजनांद्वारे शाश्वत विकासासाठी असलेली आमची व्यापक बांधिलकी दिसून येते.”

या भागीदारीबाबत भाष्य करताना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्ष कु. प्रज्ञा मेहता म्हणाल्या, “कवळे चेक डॅम प्रकल्प हा समाजाच्या विकासासाठी समान उद्दिष्ट आणि दीर्घकालीन दृष्टीकोन घेऊन संस्था एकत्र आल्यास काय साध्य होऊ शकते याचे एक प्रभावी उदाहरण आहे. शाश्वत परिवर्तनाची सुरुवात मूलभूत गरजांची पूर्तता करण्यापासून होते आणि जलसुरक्षा ही आरोग्य, उपजीविका, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाच्या सक्षम घटकांपैकी एक आहे यावर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टमध्ये आमचा ठाम विश्वास आहे.

या परिवर्तनकारी उपक्रमासाठी दिलेल्या सढळ, उदार आणि दूरदृष्टीपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही रुस्तमजी ग्रुपचे मनःपूर्वक आभारी आहोत. केवळ जलसंवर्धन उपायसुविधेच्या पलीकडे जात कवळे चेक डॅममध्ये स्थानिक आदिवासी आणि शेतकरी समुदायांसाठी जीवनवाहिनी बनण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प सामाजिक-आर्थिक विकासाला गती देईल, उपजीविका बळकट करेल, वर्षभर शेतीसाठी लागणाऱ्या कामाला पाठबळ देईल आणि भूजल पुनर्भरण व परिसंस्था संवर्धनाद्वारे पर्यावरणीय पुनर्संचय करणात योगदान देईल.

रुस्तमजीसोबतची आमची भागीदारी अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्याच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिक आहे. हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नाही. लवचिकता मजबूत करण्यासाठी, स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेला समाज प्रणीत प्रयत्न आहे. या उपक्रमाचे हे विशेष महत्त्व आहे.

‘सर्व्हिस अबव्ह सेल्फ’ या रोटरीच्या तत्त्वज्ञानाची आणि जबाबदार विकासासाठी असलेल्या रुस्तमजीच्या बांधिलकीची सांगड घालून या भागासाठी दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्य सादर करणारे सहकार्याचे एक आदर्श मॉडेल निर्माण करण्याचा आम्हाला विश्वास आहे. उद्देशप्रेरित भागीदारी पुढील अनेक पिढ्यांसाठी दीर्घकालीन परिवर्तन घडवू शकते हे दाखवून देत हा प्रकल्प खऱ्या अर्थाने ‘टुगेदर वी राईज’ आणि ‘युनाइट फॉर गुड’ या भावनेचे मूर्त रूप आहे.”

अशा उपक्रमांद्वारे, रुस्तमजी समाज बळकट करून, पर्यावरण विषयक जबाबदारीला प्रोत्साहन देऊन आणि भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अर्थपूर्ण योगदान देऊन बांधकाम व्यवसायाच्या पलीकडे मूल्यनिर्मिती करण्याच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेत आहे.

इव्होनिथ स्टीलकडून महाराष्ट्रातील ८५ मेगावॅट वीज प्रकल्पाचे अधिग्रहण; ऊर्जा स्वावलंबनाला चालना

Web Title: Rustomjee group rotary club kawale check dam project palghar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Income Tax Return: ३१ जुलैची वाट पाहू नका! ४ कोटी लोकांनी ITR केले दाखल, आयकर विभागाकडून करदात्यांसाठी सूचना जारी
1

Income Tax Return: ३१ जुलैची वाट पाहू नका! ४ कोटी लोकांनी ITR केले दाखल, आयकर विभागाकडून करदात्यांसाठी सूचना जारी

US Tariff Impact On India: अमेरिकन टॅरिफचा भारताला कसा होणार फायदा? समजून घ्या नेमकं काय आहे गणित?
2

US Tariff Impact On India: अमेरिकन टॅरिफचा भारताला कसा होणार फायदा? समजून घ्या नेमकं काय आहे गणित?

नेपाळला फिरायला जाताय? किती खर्च येणार? भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती? जाणून घ्या सविस्तर
3

नेपाळला फिरायला जाताय? किती खर्च येणार? भारताच्या 1 रुपयाचं तिथे मुल्य किती? जाणून घ्या सविस्तर

Job Market: तरुणांसाठी मोठी बातमी! नोकरीसाठी दिल्ली-मुंबईला जाण्याची गरज नाही; ‘या’ शहरांमध्ये मिळतोय तगडे पगार
4

Job Market: तरुणांसाठी मोठी बातमी! नोकरीसाठी दिल्ली-मुंबईला जाण्याची गरज नाही; ‘या’ शहरांमध्ये मिळतोय तगडे पगार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.