Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चाहत्यांसाठी खुशखबर! तीन नवे Galaxy स्मार्टफोन लवकरच लॉन्च

Samsung : कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सॅमसंग लवकरच Galaxy A08 4G, Galaxy M08 4G आणि Galaxy F08 4G हे तीन नवे स्मार्टफोन सादर करण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी विविध प्रमाणपत्र संकेतस्थळांवर या मॉडेल्सची नोंद दिसल्याने लॉन्च जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 30, 2026 | 04:25 PM
Samsung चाहत्यांसाठी खुशखबर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Samsung चाहत्यांसाठी खुशखबर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Samsung Galaxy A08, M08 आणि F08 4G स्मार्टफोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता.
  • तीन्ही मॉडेल्सची नोंद विविध प्रमाणपत्र संकेतस्थळांवर दिसून आली आहे.
  • फोनमध्ये जवळपास समान फीचर्स असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये सॅमसंगची स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Samsung Galaxy News: कमी बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस थांबणं फायदेशीर ठरू शकतं. कारण Samsung सॅमसंग  लवकरच आपल्या ए, एम आणि एफ मालिकेत नवीन 4G स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी विविध प्रमाणपत्र संकेतस्थळांवर या फोनची नोंद दिसू लागल्याने लॉन्चची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.

माहितीनुसार, कंपनी Galaxy A08 4G, Galaxy M08 4G आणि Galaxy F08 4G हे तीन नवीन स्मार्टफोन बाजारात आणू शकते. विशेष म्हणजे, या तिन्ही मॉडेल्समध्ये अनेक वैशिष्ट्ये जवळपास सारखी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या मालिकांमध्ये पर्याय मिळणार असला तरी वापराचा अनुभव जवळपास समान राहू शकतो.

भारतात या सिमच्या फोनला मोठी मागणी

अमेरिकेतील एफसीसी (FCC) या प्रमाणपत्र संस्थेच्या नोंदीत Galaxy A08 4G चे काही तपशील समोर आले आहेत. या फोनच्या सिंगल सिम आणि ड्युअल सिम अशा दोन्ही आवृत्त्यांची चाचणी सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतात ड्युअल सिम फोनला मोठी मागणी असल्याने हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Apple ची ऐतिहासिक झेप! 5 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप गाठणारी जगातील दुसरी कंपनी

अनेक पर्याय उपलब्ध

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही हा फोन अनेक पर्यायांसह येऊ शकतो. 4G नेटवर्कसोबत ब्लूटूथ, एफएम रेडिओ आणि ड्युअल-बँड वाय-फाय यांसारख्या सुविधा यात असतील, अशी माहिती समोर आली आहे. तसेच मागील बाजूला दोन कॅमेऱ्यांचा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे, जो सॅमसंगच्या या मालिकेची ओळख बनला आहे.

15W फास्ट चार्जिंगचा पर्यायही मिळण्याची शक्यता

या आगामी फोनमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची बॅटरी असू शकते. लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये सुमारे 6,000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. त्यामुळे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर दिवसभर सहज वापर करता येईल, अशी अपेक्षा आहे. चार्जिंगसाठी 15W फास्ट चार्जिंगचा पर्यायही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकृत लॉन्च फार दूर नाही..

भारतातील BIS या प्रमाणपत्र संस्थेच्या वेबसाइटवरही या तिन्ही फोनची नोंद आढळली आहे. सामान्यतः एखादे डिव्हाइस या टप्प्यावर पोहोचले की त्याचे अधिकृत लॉन्च फार दूर नसते. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत सॅमसंगकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन मॉडेल्समध्ये अधिक सुधारणा

हे नवीन स्मार्टफोन कंपनीच्या आधीच्या Galaxy A07, M07 आणि F07 मॉडेल्सची जागा घेतील. मागील मॉडेल्सना मोठा डिस्प्ले, चांगला कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरमुळे चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नवीन मॉडेल्समध्येही त्यापेक्षा अधिक सुधारणा पाहायला मिळू शकतात.

सॉफ्टवेअर अपडेट्स देण्यावर भर

याशिवाय, सॅमसंग आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी दीर्घकाळ सॉफ्टवेअर अपडेट्स देण्यावर भर देत आहे. त्यामुळे कमी किमतीत फोन घेणाऱ्या ग्राहकांनाही अनेक वर्षे नवीन सुरक्षा अपडेट्स आणि अँड्रॉइडची नवीन आवृत्ती वापरण्याची संधी मिळू शकते. ही बाब इतर अनेक ब्रँडच्या तुलनेत सॅमसंगला वेगळी ओळख देत आहे.

Google Apps: सावधान! फोनची बॅटरी झपाट्याने संपतेय? Google चे ‘हे’ 5 Apps कारणीभूत

सध्या कंपनीने या फोनच्या किंमती, लॉन्चची तारीख किंवा संपूर्ण स्पेसिफिकेशन अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र, प्रमाणपत्र वेबसाइटवर दिसलेल्या माहितीमुळे या फोनची एंट्री आता फार दूर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी बजेटमध्ये विश्वासार्ह ब्रँडचा स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सॅमसंगची ही नवीन मालिका चांगला पर्याय ठरू शकते.

Web Title: Samsung galaxy a08 m08 f08 4g smartphones expected to launch soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

मित्रांसोबत ट्रिपचं बिल वाटणं झालं सोपं! Paytm ने आणलं ‘Split Bills’ फीचर, कसं काम करतं ते जाणून घ्या
1

मित्रांसोबत ट्रिपचं बिल वाटणं झालं सोपं! Paytm ने आणलं ‘Split Bills’ फीचर, कसं काम करतं ते जाणून घ्या

युझर्ससाठी मोठी बातमी! Google Pay, PhonePe अन् Paytm वर दिसणार नाही ‘हा’ नंबर; NPCI चा नवीन आदेश
2

युझर्ससाठी मोठी बातमी! Google Pay, PhonePe अन् Paytm वर दिसणार नाही ‘हा’ नंबर; NPCI चा नवीन आदेश

WhatsApp Web Update: व्हॉट्सॲप कॉल करण्याासाठी ॲपची गरज नाही! आता थेट ब्राउझरवरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल
3

WhatsApp Web Update: व्हॉट्सॲप कॉल करण्याासाठी ॲपची गरज नाही! आता थेट ब्राउझरवरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर
4

WhatsApp Update: स्टेटस अपलोड करताना स्पेलिंग चुकली? चिंता करू नका, व्हॉट्सॲप लवकरच घेऊन येणार कॅप्शन एडिट फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.