Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर
मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स
सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या सर्व व्हेरिअंट्सवर ३,००० रुपयांचा ‘मल्टी-बँक आणि यूपीआई कॅशबॅक’ ऑफर उपलब्ध आहे. कंपनीच्या या ऑफरनंतर, स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत २८,९९९ रुपये झाली आहे. तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत ३१,९९९ रुपये झाली आहे. तर डिव्हाईसच्या सर्वात टॉप व्हेरिअंट ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजची किंमत ३७,४९९ रुपये झाली आहे.
गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ६.७ इंच, १२० हर्ट्झ सुपर एएमओएईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+ चे संरक्षण मिळाले आहे. उत्तम मल्टिटास्किंग आणि गेमिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ४एनएम स्नॅपड्रॅगन ६ जेन ३ मोबाईल प्लॅटफॉर्मसह यूएफएस ३.१ स्टोरेज आणि एलपीडीडीआर५एक्स रॅम दिले आहे.
स्मार्टफोनमध्ये सर्कल टू सर्च विथ गुगल फीचरसह २२ भाषांमध्ये रिअल-टाइम वॉइस ट्रान्सक्रिप्शन आणि गुगल जेमिनी व परप्लेक्सिटी सपोर्ट दिला आहे. तसेच, बिक्स्बीमुळे यूजर्स नैसर्गिक भाषेत बोलून डिवाईसची सेटिंग्स नियंत्रित करू शकतात, तर लाईइव्ह ट्रान्सक्रिप्शन इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमधील कॉल्सना सपोर्ट करते.
कंपनीच्या या नव्या डिव्हाईसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ४के रेकॉर्डिंग आणि ओआयएस सपोर्ट असलेला ५० मेगापिक्सेल मेन कॅमेरा, ५ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड लेन्स आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्याला ऑब्जेक्ट इरेझर, एडिट सजेशन्स आणि माय फिल्टर सारख्या एआय टूल्सचा सपोर्ट आहे. उच्च दर्जाचे व्हिडिओ कॉल्स आणि पोर्ट्रेट्ससाठी या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश
सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जेथे सहा वर्षांचे अँड्रॉइड ओएस आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. तसेच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग नॉक्स उपलब्ध आहे. सॅमसंग वॉलेटमुळे टॅप अँड पे, यूपीआय पेमेंट आणि डिजिटल आयडी सुरक्षितपणे स्टोअर करणे सोपे होते.






